वणवा - भाग - 20

vanva
नशिबाचा वणवा - भाग - 20

( मागच्या भागात आपण बघितले - सानिकाच्या मनात निशाबद्दल शंका येते आता पुढे )

निशा संध्याकाळी ऑफिसवरून आल्यावर सानिकाला विचारते अगं तुला तिसरा महिना लागला असेल ना, आपण चेक - अप करायला हॉस्पिटल जायला हवं, सानिका बरं हो उदया जाऊ असं बोलून तिच्या रूममध्ये निघून जाते. निशा तिच्याकडे बघत ही अशी अचानक एवढी शांत का झाली असा विचार करत तिथेच उभी राहते.

सानिका रूममध्ये जाऊन विचार करू लागते, का निशाने साहिलला मारलं असेल, का तीला माझा सुखाचा संसार बघवला नाही. का माझ्या सुखाच्या आड आली ही, काय करू कोणाला विचारू असा विचार करत असताना तीला पटकन तिचा एक मित्र पोलीस असल्याच आठवत. आणी ती मनातल्या मनात बोलते, निशा उदया ऑफिसला गेली की मी त्या मित्राशी बोलून घेते.

सानिका रात्री नऊ वाजताच्या दरम्यान रूममधून बाहेर येते, आणी निशाला बोलते उदयाच चेक- अप झालं की परवा पासून मी ऑफिसला यायला चालू करते, हो जशी तुझी इच्छा असं बोलून निशा तीला जेवायला बस असं बोलते. सानिका कसेतरी दोन घास जेवते आणी पुन्हा रूममध्ये जाऊन साहीलच्या आठवणीत रडत राहते.

दुसऱ्या दिवशी सकाळी निशा सानिकाला बोलते आज मी संध्याकाळी लवकर येते आपण हॉस्पिटलला जाऊ, हूं एवढंच सानिका बोलते, सानिका काल पासून आपल्याशी नीट बोलत नाही आहे हे निशाच्या लक्षात येत आणी ती विचारते तू नाराज का आहेस माझ्यावर, काय झालं आहे, काही नाही असं बोलून सानिका तिथून निघून जाते.

निशा ऑफिसला पोचल्यावर विचार करत राहते की सानिकाला माझ्यावर संशय तर नाही ना आला ती अशी का वागते आहे. निशा मनातल्या मनात बोलते पण साहिलचा एकसिडेन्ट झाला असं पोलिसांनी पण जाहीर केलं आहे, आता काय पुरावा नाही आहे, साहिलला मारणारा ड्राइव्हर पण शहर सोडून केव्हाच निघून गेला आहे. आणी केस डिसमिस पण झाली आहे.

इकडे सानिका तिच्या पोलीस मित्राला फोन करून सर्व सांगते आणी बोलते प्लिज तू ह्या प्रकरणात लक्ष घाल, माझ्या साहिलला न्याय मिळवून दे, सानिका त्याला रडत बोलते माझा साहिल मला आणी माझ्या होणाऱ्या बाळाला अर्ध्यावर सोडून गेला आहे, त्याच्या मारेकऱ्याला शिक्षा व्हायलाच हवी, तो मित्र सानिकाला बोलतो तू मला आठ दिवस दे, मी तपास करतो, तू मला तुझ्या बहिणीचा मोबाईल नंबर मेसेज कर मी कॉल रेकॉर्ड्स चेक करून काही माहीती मिळते का बघतो. सानिका हो मी निशाचा नंबर पाठवते असं बोलून रडत फोन ठेवते.

सानिकाचा मित्र लगेचच कामाला लागतो आणी त्यांच्या एका अधिकाऱ्याशी पण ह्या केससंदर्भात बोलून घेतो. आणी मग हवालदाराला बोलावून निशाच्या मोबाईलचे गेल्या सहा महिन्याचे कॉल डिटेल्स मागवून घेतो.

संध्याकाळी निशा ऑफिसमधून लवकर येते आणी मग निशा आणी सानिका चेक अप ला जातात, डॉक्टर सर्व काही व्यवस्थित आहे असं सांगतात. निशा गाडीमध्ये सानिकाला विचारते तू एवढी गप्प गप्प का आहेस, बोलत का नाही आहेस माझ्याशी,सानिका बोलते काही नाही गं साहिलची खूप कमी जाणवतेय.

चौथ्या दिवशी सानिकाचा मित्र कॉल करून सांगतो, एका पंजाबी माणसाला निशाने साहीलच्या ऍक्सीडेन्ट च्या दिवशी सकाळी कॉल केला होता. पण त्या माणसाचा नंबर बंद येतो आहे, त्या दिवसाच्या संध्याकाळीच त्याने मोबाईल ऑफ केला आहे. आपण तो मोबाईल चालू करतो का त्याची वाट बघुयात. त्याशिवाय त्याचा पत्ता अजून कुठल्या दुसऱ्या पद्धतीने शोधता येईल का हे मी चेक करून घेतो.

असेच दिवस जात असतात, सानिका ऑफिसला रोज जायला चालू करते आणी मग नववा महिना लागल्यावर ऑफिसला जाणं बंद करते, घरी तिच्यासाठी दोन कामवाल्या ठेवलेल्या असतात. नववा महिना लागल्यावर आठ दिवसांनी सानिकाला लेबरपेन चालू होतात. तीला हॉस्पिटलला नेलं जात. तीला मुलगा होतो, सानिका बाळ बघून साहीलच्या आठवणीत खूप रडते, मुलगा दिसायला साहिलसारखाचं असतो.

सानिकाला आणी बाळाला पाचव्या दिवशी घरी आणण्यात येत. बाराव्या दिवशी बाळाचं बारसं केलं जात. सोहम नाव ठेवलं जात. बाळाला ज्या दिवशी एक महिना होतो त्या दिवशी सानिकाचा पोलिसमित्र तीला कॉल करून सांगतो, मारेकर्याचा पत्ता मिळाला आहे, तुझा संशय खरा होता, त्याला निशानेच बारा लाखाची सुपारी दिली होती.

सानिका बोलते या मग ह्या निशाला अटक करायला आणी येताना त्या माणसाला पण घेऊन ये. तो मित्र हो आम्ही एक तासात पोचतो आहे असं बोलून फोन ठेवतो. रविवार ऑफिसला सुट्टी असल्यामुळे निशा घरीच असते. सानिका तो मित्र येईपर्यंत तीला काहीच माहित नाही असे घरात वावरत असते.

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - निशा असं अचानक घरी पोलीस आणी तो ड्राइव्हर आलेला बघून काय रिऍक्ट होते ते )

🎭 Series Post

View all