वणवा - भाग - 21

vanva
नशिबाचा वणवा - भाग - 21

( मागच्या भागात आपण बघितले - सानिकाला सत्य कळतं आता पुढे )

सकाळी दहा वाजताच्या दरम्यान सानिकाचा मित्र, दोन लेडीज पोलीस, तो ड्राइव्हर असे सगळे वाड्यात पोचतात. निशा त्यांना बघून घाबरते, ती त्या ड्राइव्हरला ओळखत असते तीला हलकासा अंदाज येतो, पोलीस बोलतात मिस निशा यु आर अंडर अरेस्ट, निशा रडायला लागते आणी सानिकाला बोलते मी काही केलं नाही आहे, का पकडताय मला. सोडा मला.... सानिका वाचव मला अशी ती जोरजोरात ओरडू लागते.

सानिका तिच्या जवळ जाऊन तिच्या एक कानाखाली मारते, आणी बोलते, माझ्या साहिलला मारलंस, माझा संसार मोडलास तू, माझ्या बाळाला त्याच्या बाबाचं प्रेम मिळू दिलं नाहीस तू, का वागलीस अशी, काय बिघडवलं होतं माझ्या साहिलने तुझं, बोल ना आता, साहिल बिचारा साधा होता त्याला वाटतं होतं, तुझा राग निवळला आहे म्हणून तो मला इथे वाड्यात रहायला घेऊन आला होता. त्याला काय माहित होतं वाड्यातच त्याची मारेकरीन आहे ते.

बिचारा साहिल ह्या तुझ्या रागात हकनाक गेला, तू माझ्यावर राग काढायचा होतास ना, साहिलला का मारलंस, माझा साहिल, अर्ध्यावर संसार सोडून गेला, बाळाला पाहू शकला नाही. तुझा एवढा कसला राग होता गं त्याच्यावर की तू त्याचा जीवच घेतलास , माझा साहिल, माझ्यावर खूप प्रेम होतं त्याचं....सानिका बोलता बोलता रडू लागली.

हे वाक्य बोलल्यावर निशा चवताळून बोलते, म्हणूनच मारलं मी त्याला. माझ्या प्रेमाचा स्वीकार त्याने केला नाही. मला आई, बाबा कोणाचंच प्रेम मिळू शकलं नाही, मी कायम प्रेमालाचं मुकत आलेय, पहिल्यादाचं कोणावरतरी मनापासून प्रेम केलं, आणी त्याने झिडकारावं, का मला प्रेम मिळू शकत नाही. माझ्या आईने मला जन्म दिला ती तिचीच चुक होती, तुझ्या बाबाची नव्हती का, का मग कायम मी शिक्षा भोगावी.

माझ्या आईने मरताना तुमच्या घराण्याला शाप दिला होता, तीला पाण्यात ढकलून मारलं ना तुझ्या आजोबानी त्याचाच हा बदला आहे, आईने शाप दिला आहे कोणीच वारस देणार नाही तुम्हाला, वारस ( मुलगा ) जगणारचं नाही ह्या वाड्यात, मी मुलगी म्हणून तुझ्या आजोबानी तेव्हा आईला नाकारलं ना, आईचा शाप आहे बघ, एकही पुरुष जगणार नाही ह्या घरात, कोणाचाच संसार सुखाचा होऊ देणार नाही माझी आई.

सानिका तुझी आई मेली,बाबा मेले, साहीलही गेला, बघ तुमचं अक्ख खानदान उध्वस्थ झालं माझ्या आईच्या शापामुळे, कोणीच सुखाने जगणार नाही ह्या वाड्यात, माझी आई बाबांशी लग्न करण्यासाठी दिवसरात्र रडत राहिली, गरोदर आहे कळल्यावर पण तुझ्या आजोबानी तीला स्वीकारलं नाही. तिचाच शाप भोगताय तुम्ही, असेच प्रेमासाठी मुकाल सगळे बघ तू.

आणी आता मी प्रेम मिळवू पाहत होती त्यात तू आड आलीस, माझं साहिलवार मनापासून प्रेम होतं म्हणून ते सांगायला मी त्याला हॉटेलवर घेऊन गेली होती, तिथे त्याला नशा येण्यासाठी मी त्याच्या कोल्डड्रिंक मध्ये औषध मिक्स केलं होतं, त्याला नशा आली पण त्याही स्थितीत तो तुझंच नाव घेत राहिला. मी त्याला जवळ करू पाहत असूनही तो मला झिडकारत राहिला, त्याच्या अशा वागण्याचीचं फळं आहेत ही. म्हणून मी मारलं त्याला, तुमच्या दोघांची जवळीक मला सहन होतं नव्हती म्हणून मी त्याचा जीव घेतला.

सानिका पोलिसांना बोलते घेऊन जा हिला आणी जास्तीत जास्त शिक्षा करा, निशाला पोलीस घेऊन जातात. सानिका खूप रडते, बाळाला जवळ घेऊन बोलते बाळा मी आहे तुझ्यासाठी आता कोणीही आपल्याला त्रास द्यायला येणार नाही.

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - सानिकाच्या बाळाला ह्या शापाचे परिणाम तर भोगावे लागणार नाहीत ना की सानिका ह्या सगळ्यातून त्याला सुखरूप बाहेर काढेल. )

🎭 Series Post

View all