वणवा - भाग - 22

vanva
नशिबाचा वणवा - भाग - 22

( मागच्या भागात आपण बघितले - निशाला अटक होते आता पूढे )

निशाला सजा होते, सानिका ऑफिसचा कारभार सांभाळू लागते, सोहम छोटा असल्याने ती त्याला सुद्धा ऑफिसला घेऊन जात असे. निशा ऑफिसमध्ये अनेक बदल करते, नवनवीन प्रोजेक्ट्स चालू करते, ऑफिस स्टाफसुद्धा तिच्यावर खूप खुश असतो.

असेच दिवस जात असतात. सोहम शाळेत जायला लागतो, सोहम अभ्यासात प्रचंड हुशार असतो. सानिका त्याची खूप काळजी करत असे, तीला राहुन राहुन निशाचे शब्द आठवत असतात. ( माझ्या आईचा शाप आहे वारस जगणारच नाही ह्या कुटुंबात ) असं निशा बोलली होती. तीला ह्या गोष्टीमुळे त्याची खूप काळजी वाटतं असे त्यामुळे ती सोहमला खूप जपत असे. तो जरा आजारी पडला तरी ती घाबरीघुबरी होतं असे.

निशा जेलमध्ये गेल्यावर सानिका निशा ने बोललेल चुकून पण सत्य होऊ नये म्हणून भटजींना बोलावून घरात एक शांती करून घेते. सोहम मोठा होतं असतो, सानिका आणी सोहम, आणी दोन मदतनीस असे सगळे मिळून वाड्यात चौघे राहत असतं. सोहम दहावीला चांगल्या मार्कांनी पास होतो, त्यानंतर बारावी पास होऊन एम बी ए करतो आणी सानिकाबरोबर कंपनी सांभाळायला सज्ज होतो.

निशाला अटक झाली तेव्हा सोहम खूप लहान असतो त्यामुळे निशाबद्दल सानिका त्याला कधीच काही सांगत नाही. पण सोहमच्या पंचवीसव्या वाढदिवसाच्या दिवशी ती त्याला साहिल, निशा ह्या सगळ्या प्रकरणाचं सत्य सांगायचं ठरवते. सोहमने नुकतीच आठ दिवसापूर्वी कंपनीची सगळी सूत्र त्याच्या हातात घेतलेली असतात, त्यामुळे आता योग्य वेळ आली आहे असं समजून ती त्याला सगळं सांगायचं ठरवते.

सोहमच्या वाढदिवसाच्या दिवशी सकाळी ती ऑफिसला जाताना सोहमला बोलते आज घरी तुझ्या बर्थडे ची पार्टी ठेवली आहे. तुझ्या सर्व मित्र - मैत्रिणींना आमंत्रण दे, हो बोलून सोहम ऑफिसला जायला निघतो.

सोहम दोन पावलं चालून पुन्हा पाठी येऊन सानिकाला बोलतो मम्मी मला पण तुला काहीतरी स्पेशल सांगायचं आहे, सानिका अरे बोल ना मग असं बोलते, सोहम बोलतो माझं एका मुलीवर प्रेम आहे, आणी मला तिच्याशी लग्न करायचं आहे, ती आणी मी दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. आज संध्याकाळी पार्टी च्या वेळी तुझी आणी तिची मी ओळख करून देतो. सानिका हसत हो नक्की ओळख करून दे असं बोलते.

सोहम खुश होऊन निघून जातो. संध्याकाळी पार्टीला सोहमची गर्लफ्रेंड गार्गी येते, सानिकाला सुद्धा होणारी सुनबाई खूप आवडते. दोघी छान बोलू लागतात. सोहमचा वाढदिवस संपत आलेला असतो सानिका सोहमला बोलते, गार्गीला थांबवून घे, मला तुमच्या दोघांशी बोलायचं आहे, हो चालेल असं सोहम बोलतो. गार्गी थांबते सगळे पाहुणे निघून जातात.

सानिका त्या दोघांना बेडरूम मध्ये बसवून सगळं आतापर्यंतचं सत्य सांगते. सोहम हे सर्व ऐकून हादरून जातो आणी बोलतो आई निशा मावशी जेलमधून सुटली नाही का गं अजून, तीने तिची पुरेपूर शिक्षा भोगलीय, तीला शिक्षा झाली तेव्हा ती तीस वर्षाची होती आता काळ पंचवीस वर्ष पुढे गेला आहे, माझ्या वडिलांच्या मारेकऱ्याला बघायची माझी इच्छा आहे. जिच्यामुळे माझ्या बालपणी पासून चं मला माझ्या वडिलांची साथ कधीच लाभली नाही. ती कोण आहे ते मला बघू तरी देत.
सानिका बोलते, तीला जन्मठेप झाली होती, तीला जेल झाल्यावर मी तीला बघायला एवढ्या वर्षात कधीच जेलमध्ये गेले नाही, ती सुटली की नाही ते मला माहीत नाही आहे. तिचा विचार पण मनात आणावासा वाटतं नाही.

सानिका बोलते माझं एक ऐकशील मी म्हणतेय म्हणून तू निशाला भेटू नकोसं, मला ते सगळं पुन्हा माझ्या आयुष्यात नकोय, मला त्या आठवणी, ते क्षण सगळंच नको आहे. सानिकाच्या डोळ्यात पाणी आलेलं बघून सोहम बोलतो, बरं मम्मी मी ह्या विषयावर पुन्हा कधीच बोलणार नाही. सानिका गार्गीला बोलते, बाळा तुझं काय मत आहे ह्या सगळ्यावर तुमचं लग्न करायचं ठरलं आहे म्हणून तुला पण हे सांगितलं.

गार्गी बोलते - मम्मी काहीच हरकत नाही आहे मला, सानिका बोलते बरं चालेल, तुझे आई - वडील आणी मी लवकरच तुमच्या लग्नाची तारीख ठरवतो, मी तुझ्या आई - वडिलांशी बोलून बघते. गार्गी लाजून आत निघून जाते.

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - सोहमच लग्न होतं आणी हा नशिबाच्या वणव्याचा शाप त्याला भोगावा लागतो की नाही ते )

🎭 Series Post

View all