वणवा - भाग - 23

vanva
नशिबाचा वणवा - भाग - 23

( मागच्या भागात आपण बघितले सानिकाला गार्गी सून म्हणून पसंत असते आता पुढे )

सानिका आणी गार्गीचे आई - वडील लग्नाची बोलणी करण्यासाठी भेटायचं ठरवतात, गार्गी आणी सोहम खूप खुश होतात. सानिका मनातल्या मनात बोलते, निशा बोलत होती, ह्या वाड्यात वारस जगणारच नाही, शाप आहे तसा.... ते देवाच्या कृपेनें खोट ठरलं, सोहम ला काही झालं नाही हे माझं मोठ भाग्य आहे.

गार्गीच्या घरी गार्गी मोठी मुलगी असते, तिच्या आई - बाबांना दोन मुलीं असतात. गार्गी इंजिनिअर असते, गार्गीच्या वडिलांची सी ए ची फर्म असते. आणी तिच्या आईच फॅशन बुटीक असतं, तिची लहान बहीण पंधरावीला असते. चौकोनी कुटुंब असतं. सर्व जण सोहमच्या घरी भेटायचं ठरवतात. त्या निमित्ताने वाडा पण बघता येईल असं सर्वाचं मत होतं.

गार्गीच्या घरचे सर्व जण रविवारी भेटायचं ठरवतात. आलेले सर्व पाहुणे वाडा बघून खुप खुश होतात. गार्गी गुणी मुलगी असते. सानिकाला ती फारच आवडते. लग्नाची बोलणी होतात. पुढच्या महिन्यात साखरपुडा आणी त्या नंतर तीन दिवसांनी लग्न असा कार्यक्रम ठरतो.

एक महिना पटकन निघून जातो, सानिका आणी गार्गी मिळून लग्नाची खरेदी, दागिने घेतात. गार्गी सानिकाला सगळ्या कामात मदत करत असते. गार्गीची आई पण सानिकाला तुम्ही एकट्याच सगळी तयारी करताय मी मदतीला येऊ का असं विचारून अधून - मधून मदतीला येत होती. घरातल्या दोन कामाला असणाऱ्या मदतनीस पण तयारीसाठी मदत करत असतात.

बघता बघता साखरपुड्याचा दिवस उजाडतो, सगळेच खूप खुश असतात. साखरपुड्याचा कार्यक्रम छान होतो, दुसऱ्या दिवशी मेहंदीचा आणी हळदीचा प्रोग्रॅम ठेवला जातो. सगळं छान होतं, बघता बघता लग्नाचा दिवस येतो. सर्व जण सकाळी हॉलवर जातात. लग्नाचे विधी होतात, लग्न अगदी सुंदर पद्धतीने पार पडत.

गार्गीचा वाड्यात गृहप्रवेश होतो. दुसऱ्या दिवशी लग्नाची पूजा, हळद उतरणी असे सगळे कार्यक्रम छान होतात. गार्गी आणी सोहम पाच दिवसांसाठी कुलू - मनालीला जाऊन फिरून येतात. आठ दिवसांनी सोहम ऑफिसला जायला लागतो. गार्गी बोलते मी नवीनचं लग्न झाले आहे म्हणून एक महिना वर्क फ्रॉम होम घेतलं आहे. तेवढंचं मला मम्मीबरोबर जास्त राहता येईल.

सानिका आताशा सोहमच्या हातात सगळं सोपवून ती घरी आराम करत असे. सानिका आणी गार्गी ची छान गट्टी जमते, दोघी सासू - सुना फिरायला, शॉपिंगला जाऊ लागल्या होत्या. एक महिना पटकन निघून जातो आणी गार्गी तिच्या ऑफिसला जायला चालू करणार चं असते, तर सानिका त्या दोघांना एकत्र बसवून बोलते. गार्गी तू आपलं ऑफिस जॉईन कर ना, तू आणी सोहम मिळून सगळं छान सांभाळा.

सोहम पण गार्गीला बोलतो, अज्जीबात जबरदस्ती नाही आहे पण तू जॉईन व्हावंसं असं मला पण मनापासून वाटतंय, गार्गी बोलते बरं ठीक आहे मी उदया माझ्या ऑफिसमध्ये राजीनामा देते. तिघेही घरात छान हसून, बोलून राहत असतं. सानिका छान मिळून - मिसळून वागत असते.

दिवस भराभर निघून जातात, बघता बघता सोहमच्या लग्नाला दोन वर्ष होऊन जातात. गार्गी, सोहम बिजनेस छान सांभाळत असतात. दोन वर्षानंतर दोघे ही बाळाचा निर्णय घ्यायचं ठरवतात. पण वर्षभरातच त्यांना समजत की काहीतरी प्रॉब्लेम आहे, गार्गी गरोदर राहत नाही आहे. गार्गीच्या गर्भाशयला गाठी होऊ लागतात.

सानिका ते ऐकून खूप घाबरते, सानिकाच्या सारखं मनात येऊ लागत, काय आहे हे, निशाचं बोलणं तीला आठवत आणी तीला रडायला येत. सानिका देवाचा धावा करते आणी देवाला बोलते, माझ्या दोन्ही मुलांना सुखरूप ठेव. कसलीही अडचण येऊन देऊ नकोसं.

सानिका देवाला बोलते माझा सुखाचा संसार त्या निशाने हिरावून घेतला, निदान माझ्या मुलांचा तरी सुखाचा संसार व्हावा, घर मुलाबाळांनी भरून जावं एवढीच माफक अपेक्षा आहे. सानिका देवाजवळ जाऊन रडत बसते. ते बघून सोहम बोलतो मम्मी तू काळजी करू नकोसं, सगळं ठीक होईल लवकरच.

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - सानिका ह्या सगळ्यातून कसा मार्ग काढते ते )

🎭 Series Post

View all