वणवा - भाग - 24

vanva
नशिबाचा वणवा - भाग - 24

( मागच्या भागात आपण बघितले - गार्गीला प्रेग्नेंसिमध्ये प्रॉब्लेम्स येत असतात आता पुढे )

सानिका गार्गीचा प्रॉब्लेम ऐकून सुन्न होते, आणी देवाचा धावा करत असते.

सानिका गार्गीला बोलते तू काळजी करू नकोसं, आपण उदयाचं एका चांगल्या स्त्रीरोगतज्ञ् डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊ आणी त्यांचं ओपिनियन घेऊ. सगळं नीट होईल बघ.

दुसऱ्या दिवशी दुपारची अपॉइंटमेंट सोहम घेतो, आणी मग ( गार्गी, सोहम, सानिका ) तिघेही हॉस्पीटलला जातात.

डॉक्टर गार्गीचे सगळे रिपोर्ट्स बघतात आणी बोलतात - गर्भाशयातल्या गाठींमुळे पाळी आल्यावर अंगावरून खूप जाणं, ओटीपोटात सतत दुखणं हे त्रास तुला कधीपासून होतं आहेत, गार्गी बोलते गेल्या सहा महिन्यांपासून हा त्रास वाढला आहे.

सानिका बोलते डॉक्टर पण ह्या गाठी कशामुळे होतात, म्हणजे आमच्या गार्गी जेवणं वैगेरे सर्व वेळेवर असतं. तिचं रुटीन नीट आहे सगळं, तीला असं कां व्हावं.

डॉक्टर बोलतात - गाठी तयार होण्याचं मुख्य कारण म्हणजे हार्मोन, गर्भधारणा होऊ शकणाऱ्या कुठल्याही स्त्रीला ही समस्या येऊ शकते.

या गाठींचा आकार एक रुपया च्या नाण्याएवढा पण असू शकतो किंवा त्यापेक्षाही छोटी पण असू शकते, गाठ जेवढी मोठी तिचा त्रास तेवढाच जास्त बाईला होतो.

सानिका बोलते डॉक्टर मग आता ह्यावर उपचार काय, आमच्या गार्गीला आराम पडावा असा उपाय सांगा.
ह्या गाठीच ऑपेरेशन करावं लागत कां.

डॉक्टर बोलतात - गाठीच्या साईज वरून आपल्याला ते ठरवता येईल.
ह्यात दोन शस्त्रक्रिया असतात.

1. मायमेक्टॉमी- भविष्यात मूल व्हावं अशी इच्छा असेल तर गर्भाशय आणि गर्भाशयाच्या भिंतींवरील गाठी काढून गर्भाशय तसंच ठेवलं जातं. पण ही शस्त्रक्रिया गाठीच्या साईजनुसार ठरवली जाते. गार्गीच्या गाठीच्या साईजवर चं पुढचं सगळं अवलंबून आहे.

आणी दुसरी -

2. हेस्टरेक्टॉमी- फायब्रोइडसाठी केली जाणारी ही शस्त्रक्रिया आहे. यात महिलेचं गर्भाशय काढून टाकण्यात येतं.

गार्गीच्या डोळ्यात पाणी आलेलं बघून डॉक्टर बोलतात आपण आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करू.

सानिका, गार्गी, सोहम तिघेही हे ऐकून नाराज होतात. तिघेही घरी येताना गाडीमध्ये एकमेकांशी अज्जीबात बोलत नाहीत.

घरी आल्यावर मात्र गार्गीचा बांध फुटतो, ती सानिकाला मिठी मारून रडायला लागते, आणी बोलते मम्मी कां माझ्याचं नशिबात हे सगळं, आई होण्याची तीव्र इच्छा असताना पण मी आई होऊ शकत नाही आहे.

सोहम तीला समजावण्याच्या सुरात बोलतो - अगं अशी हरू नकोसं, आपण उपचार करतोय ना, आपल्याला बाळ होईल बघ. गार्गी रडून बोलते, डॉक्टर काय बोलल्या ऐकलेस ना, आपल्याला बाळ होण्याचे चान्सेस कमी आहेत.

सानिका बोलते, तू अशी खचून जाऊ नकोसं आपण काहीतरी मार्ग काढू, तू अशी उदास होऊ नकोसं बघ, आपण देवाला साकडं घालू तो नक्किचं ह्या सगळ्यातून मार्ग काढेल बघ....

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - ह्या सगळ्यातून भविष्यात काय मार्ग निघतो कां ते )

🎭 Series Post

View all