वणवा - भाग - 25

vanva
नशिबाचा वणवा - भाग - 25

( मागच्या भागात आपण बघितले - गार्गी डॉक्टरांचं बोलणं ऐकून खूप खचून जाते आता पुढे )

अशीच मध्ये अजून पाच वर्ष निघून जातात. गार्गी ची ट्रीटमेंट चालू असते. पण यश येत नसतं, शेवटी मग सानिका सोहमला बोलते तुम्ही दोघे एखादं मुलं दत्तक कां घेत नाही आहात. सोहम बोलतो, गार्गी त्यासाठी तयार नाही आहे.

गार्गी बोलते त्यापेक्षा मी अजून एक पर्याय सुचवू कां, आपण अशा एखाद्या महिलेला शोधलं तर, जी आपल्याला सरोगेसीद्वारे आपलं बाळ देऊ शकेल, म्हणजे मला तिच्या रूपाने आई होण्याचा अनुभव पण घेता येईल. मी सगळं सुखं अनुभवेन.

तीला पूर्ण नऊ महिने आपण आपल्या वाड्यात ठेवून घेऊ तिचे गरोदरपणात सगळे लाड पुरवू, तीला होणार बाळ आपल्या नजरेसमोर वाढेल. म्हणजे मग काळजीच राहणार नाही. आपण त्या बाईबरोबर एक कॉन्ट्रॅकट करू ती बाळ झालं की तिचे ठरलेले पैसे घेऊन इथून निघून जाईल.

सानिका बोलते अगं पण अशी बाई मिळाली पाहिजे ना, जी आपलं बाळ तिच्या पोटात वाढवून नऊ महिन्यांनी बाळ झाल्यावर ते बाळ आपल्याला देऊन निघून जाईल. गार्गी बोलते मम्मी हल्ली पैश्यांसाठी काही बायका ही काम करतात. तिघांच्या मते हा निर्णय योग्य आहे असं ठरतं.

गार्गी बोलते माझ्या दोन मैत्रिणीं डॉक्टर आहेत मी त्यांच्याशी बोलून बघते मग पुढचं कसं होतंय ते बघू.

गार्गी तिच्या चार , पाच मैत्रिणींना हे बोलून ठेवते आणी मग आठ महिन्यांनी योगायोगाने एक बाई मिळते तिची परिस्थिती गरीब असते. ती तीस वर्षाची असते. तिचा नवरा एका अपघातात वारलेला असतो. तीला दोन जुळी मुलं असतात. त्यात ही ती खूप कमी शिकलेली असते त्यामुळे तीला चांगली नोकरी नसते,मुलांच्या भविष्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी ती हे कामं केल्यावर पैसे खूप मिळणार असतात म्हणून ती तयार होते.

तिच्या घरी ती एकटीच कमावणारी असते, सासू, दोन मुलं हे सर्व तिच्या कमी पगारात सांभाळणे तीला जमतं नव्हते. म्हणून ती गार्गीला बोलते ताई मला वीस लाख पाहिजेत म्हणजे मला भविष्याची चिंता राहणार नाही. तीने सांगितलेले पैसे जास्तच असतात. पण बाई चांगली असते म्हणून गार्गी तयार होते.

डॉक्टरांच्या मदतीने सर्व ट्रीटमेंट करून रचना गरोदर राहते. ज्या दिवशी ही बातमी गार्गी ऐकते तेव्हा ती घरात अक्षरशः आनंदाने नाचायला लागते.

ती बाई ( रचना ) वाड्यात रहायला येते. रचनाला सुरवातीला होणारा त्रास आणी तिचं दिवसेंदिवस गरोदरपणामुळे बदलणार रूप हे सगळं गार्गीला जवळून अनुभवायचं असतं म्हणून ती ऑफिसला जाणं बंद करते.

रचना स्वभावाने चांगली असते, गार्गी तिची सर्वतोपरी काळजी घेत असते, तीला काही हवं नको ते सगळं स्वतः जातीने लक्ष घालून नोकरांकडून करून घेत असते. रचना तीला म्हणत असे गार्गीताई तुम्ही खूप काळजी करता सगळं नीट होईल बघा. तुम्ही निश्चिन्त रहा.

सानिका देवाला साकडं घालत असते की देवा मुलगीच होऊदेत, म्हणजे निशाचा शाप तीला लागणार नाही. देवाच्या कृपेनें सोहमला काही झाले नाही, पण तरीही सोहमबद्दल मनात सतत काळजीच असते.

रचनाला नऊ महिने पूर्ण झाल्यावर लेबर पेन चालू होतात. आणी तीला ( मुलगी ) होते. सगळे खूप खुश होतात. गार्गी आणी सोहम जेव्हा पहिल्यांदा बाळाला हातात घेतात तेव्हा दोघांच्याही डोळ्यात पाणी येत. बाळ खूप सुंदर असतं, रचनाला चार दिवसांनी हॉस्पीटल मधून सोडण्यात येत.

रचनाने आता बाळाबरोबर पुन्हा इथे घरी येऊ नये नाहीतर तीला बाळाचा लळा लागू शकतो, असं गार्गी म्हणते म्हणून रचनाला सेवेसाठी एक मदतनीस दिली जाते आणी ती मदतनीस तिच्याबरोबर थोडे दिवस रचनाच्या सेवेला ठेवली जाते. रचनाची सोय एक महिन्यासाठी गेस्ट रूममध्ये केली जाते. एक महिना आराम करून रचना तिच्या घरी जाईल. असं सगळं ठरतं.

बाळ श्रावणात जन्माला येत म्हणून तिघे मिळून बाळाचं नाव श्रावणी ठेवतात. एक महिन्यांनी रचना तिच्या घरी जाते. श्रावणीच्या बाललिलांमध्ये सगळे खुश असतात. श्रावणीचा पहिला वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला जातो.

श्रावणी हळू हळू मोठी होतं असते, तिघेही तिचे खूप लाड करत असतात. तीने एखादी गोष्ट मागितली की पुढच्या एक तासात तिच्यासमोर हजर होतं असे. ह्या सगळ्या अतिलाडामुळे ती दिवसेंदिवस हट्टी होतं जाते.

श्रीमंती भरपूर असते आणी त्यात घरात सगळ्याला नोकर - चाकर त्यात गार्गी सर्वांची लडकी त्यामुळे तिचं वागणं अजून फोफावत जातं. ह्या सगळ्याचे परिणाम काय होतात आणी श्रावणीचं हे वागण पुढे जाऊन किती नुकसानदायक ठरतं ते आपण पुढच्या भागात बघणार आहोत.

🎭 Series Post

View all