वणवा - भाग - 26

vanva
नशिबाचा वणवा - भाग - 26

( मागच्या भागात आपण बघितले - श्रावणी अतीलाडामुळे खूप हट्टी होते, स्वतः चं खरं करणारी, कोणाचं जास्त न ऐकणारी अशी होते आता पुढे )


श्रावणी हळू हळू मोठी होतं असते, तिच्या शाळेतून तिच्या रोज तक्रारी येत असतं. ती बाकीच्या मुलांना तिच्यापेक्षा कमी लेखत असे. कोणालाही त्रास देत असे. वर्गात मीच कोणीतरी खूप शहाणी आहे असं तिचं वागणं असे. अभ्यासात पण ती खूप मागे होती.


ती जसजशी मोठी होतं होती तशी सानिका, गार्गी, सोहम ह्या तिघांनाही तिची काळजी वाटू लागली होती. शाळेत पण अभ्यास न करणे मित्र - मैत्रिणीबरोबर गप्पा मारत राहणे असं तिचं चालू असे. बघता बघता श्रावणी दहावीला जाते. घरात तिघांनाही तिची बोर्ड एक्साम म्हणून खूप काळजी वाटू लागते, तिच्यासाठी स्पेशल क्लास लावले जातात.


घरी सानिका, सोहम, गार्गी तीला सतत ओरडत असतं,अशी वाग, तशी वाग असं चालू असल्याने श्रावणी अजूनच संतापत असे. आणी तीला घरातली माणसं माझ्यावर ओरडत राहतात. माझ्यावर सतत चिडचिड करतात, असं समजून ती घरातल्यांचा राग राग करू लागते.


कशी बशी ती दहावीला त्रेपन्न टक्के मिळवून पास होते, घरी सगळेच तिचे टक्के बघून नाराज होतात. ती स्वतःच ठरवते मला कॉमर्स साईडला जायचं आहे आणी मी त्यालाच ऍडमिशन घेणार, तिच्या रागीट स्वभावाकडे बघता तिघेही बरं बाई तू म्हणशील तसं असं बोलतात.


श्रावणी कॉलेजला जायला लागते, रोज कॉलेजवरून उशिरा येणं, मित्र - मैत्रिणीं सोबत फिरत राहणं हे आता नित्याचंचं होऊन बसतं. एवढ्या मोठ्या मुलीला मारायचं तरी कसं आणी ओरडून ती काही कोणाचं ऐकत नसे. काय करावं असं तिघांना होतं असे.


सोहम तीला प्रेमाने पण खूप वेळा समजावत असे. पण ती म्हणतं असे आजी आणी मम्मी सतत मला ह्या ना त्या कारणावरून ओरडत राहतात. सोहमला तिची खूप काळजी वाटतं असे त्याला वाटतं असे ही वाईट मार्गाला जाऊ नये.


श्रावणी पंधरावी पास होते, सगळे खुश होतात कारण तिची लक्षण बघता ती पास होईल असं घरात कोणालाही वाटत नव्हतं. पुढे काय करणार आहेस असं विचारल्यावर ती म्हणत असे आताच तर परीक्षा झालीय मला एन्जॉय करुदेत.


श्रावणी हल्ली सतत कोणाशी तरी मोबाइलवार गुपचूप बोलत असे हे सानिकाच्या नजरेत येत होतं. गार्गी आणी सोहम ऑफिसला असतं त्यामुळे सानिका घरी असल्याने तिच्या ते दिसण्यात येत होतं.


सानिका गार्गीला सांगायचा प्रयत्न करते पण गार्गी बोलते तिचा कोण बॉयफ्रेंड असणार आहे ही हट्टी, जिद्दी मुलगी कोणाला कशी समजून घेईल. गार्गी तो विषय लाईटली घेते आणी शेवटी जे घडायला नको ते घडतं.


एके दिवशी संध्याकाळी सानिका दुपारी झोपून उठल्यावर श्रावणीला चहा पिण्यासाठी बोलवायला तिच्या रूममध्ये जाते तेव्हा तीला बेडवर एक चिट्टी सापडते....ती चिठ्ठी वाचल्यावर सानिका जागेवरच कोसळते.


श्रावणी चीट्ठी लिहून घरातून पळून जाते. चिठ्ठी मध्ये ( मी माझा निर्णय घेतला आहे, मला शोधायचा प्रयत्न करू नका, मी माझ्या एका मित्राबरोबर लिव्ह इन मध्ये रहायला जाते आहे ) एवढंच लिहिलेलं असतं.


घरातले नोकर ऑफिसमधून गार्गी,सोहमला घरी बोलावून घेतात. चीट्ठी वाचून सगळेच रडू लागतात.

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - श्रावणीचा पत्ता लागतो की नाही ते )

🎭 Series Post

View all