वणवा - भाग - 27

vanva
नशिबाचा वणवा - भाग - 27


( मागच्या भागात आपण बघितले - श्रावणी घरातून निघून जाते आता पुढे )


गार्गी, सोहम चीट्ठी वाचूनच घाबरतात. गार्गी बोलते ह्या मुलीला तर काहीच कामंपण करता येत नाही, कुठलीही वस्तू पाहिजे असेल तर ती घरातल्या नोकरांना हाक मारते, हिला स्वतः चं ताट पण उचलून किचन मध्ये ठेवता येत नाही. ही पहिल्यापासून श्रीमंतीत वाढलीय कसलीच कमी पडू दिली नाही हिला आपण.


ही कशी अशी एखाद्या मुलाबरोबर रूम शेअर करून राहणार. काय नको ते पाऊल उचलून बसली ही, एकतर फोन बंद करून ठेवला आहे, कुठे गेलीय, कोणाबरोबर गेलीय काहीच समजत नाही आहे. कसं कळणार असं बोलून ती रडायला लागते.



सानिका तर हे सर्व ऐकून हादरूनच गेलेली असते. तीला सतत चक्कर येत असते. गार्गी नोकरांना सांगून सानिकाला रूममध्ये न्यायला सांगते. सानिका आता जाऊन रडून बोलते देवा काय वाढून ठेवलं आहेस तू हे, ह्या घरात सुखं आलं की काहीतरी अनर्थ घडतोच. त्या निशाच्या शापामुळे मी कायम चिंतीत असते त्यात आता हे अजून.



सोहम बोलतो, गार्गी काय करायचं आता ती दुपारीच गेली आहे आई झोपून उठली तेव्हा तीला कळलं म्हणजे आता दोन, तीन तास होऊन गेलेत, ही आपल्या एरिया च्या बाहेर निघूनही गेली असेल. त्यात हिला एकवीस वर्ष पूर्ण आहेत त्यामुळे पोलीस तरी काय करणार ह्यात.



सोहम तरीही त्याच्या एका पोलीस मित्राला फोन करून कल्पना देतो की ही मुलगी कुठल्या हायवे वर वैगेरे गाडीमध्ये दिसली की आम्हाला इन्फॉर्म करा. तो मित्र हो चालेल मी सगळीकडे कळवून ठेवतो असं बोलतो.


तेवढ्यात गार्गी आतून ओरडून सोहमला बोलते अरे ही मुलगी लॉकरमधले सर्व दागिने आणी पैसे घेऊन पळून गेली आहे. काय असं ओरडतंच सोहम आता जातो, गार्गी बोलते अरे हे बघ, लॉकर पूर्ण खाली करून घेऊन गेलीय ही. स्वतःच्या नशिबाची स्वतः वाट लावून घेतली हिने.


अरे देवा, तो मुलगा हिला पैश्यासाठी फसवत असणार अरे, ही श्रीमंत आहे हे त्याला माहित असणार काय होणार रे ह्या पोरीचं, मला भीती वाटतेय आता. सानिका पण तिचा आरडा - ओरडा ऐकून बाहेर येते गार्गी तीला पण सांगते मम्मी श्रावणी सगळे दागिने, पैसे घेऊन निघून गेलीय.


सानिका मटकन खालीच बसते आणी बोलते तो मुलगा हिचा गैरवापर तर करणार नाही ना, एकतर खूप पैसे घेऊन गेली आहे ही, पैसे संपत आले की तो मुलगा हिला कुठे नेवून सोडेल काय माहित ती देवाला बोलते - देवा वाचवं आमच्या श्रावणीला ह्या सगळ्यातून.


घरात दोन दिवस कोणीच जेवत नाही, तिघेही खूप चिंतेत असतात. श्रावणी चा मोबाईल सतत गार्गी लावून बघत असते पण मोबाईल ऑफ येत असतो. काय करावं कुणालाचं सूचत नसतं. गार्गीने तर रडून रडून स्वतः ची हालत करून घेतली होती.


तिसऱ्या दिवशी घरच्या फोनवर कॉल येतो, सोहम कॉल उचलतो, समोरून श्रावणी बोलत असते, पप्पा मी खुश आहे, मला शोधायचा प्रयत्न प्लिज करू नकां.


मम्मी, आजीला सांगा मी बरी आहे, एवढं घाई घाई मध्ये ती बोलून जाते, सोहम श्रावणी बाळा तू कुठे आहेस काहीतरी सांग असं रडून बोलत असतानाचं श्रावणी फोन कट करते.

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - श्रावणी कुठे असते ते )

🎭 Series Post

View all