वणवा - भाग - 29 ( अंतिम भाग )

vanva
नशिबाचा वणवा - भाग - 29 ( अंतिम भाग )

( मागच्या भागात आपण बघितले - श्रावणी नितेश बरोबर घर सोडून गेल्यावर पूर्णपणे फसलेली असते आता पुढे )


श्रावणी घरातून गेलेल्याला पंचवीस दिवस झालेले असतात. सानिकाने श्रावणी घरातून गेल्याचा खुपचं धसका घेतलेला असतो. त्या टेन्शन मध्ये तीला एक दिवस हार्ट अटॅक येतो, सोहम आणी गार्गी तीला त्वरित हॉस्पिटलला नेतात पण हॉस्पिटलच्या दारात पोचताच तीला अजून त्रास व्हायला लागतो आणी त्यात तिचा जीव जातो.

सोहम, गार्गी सानिका वारल्यामुळे खूप एकटे पडतात. दोघेही खूप रडत असतात. सानिका गेल्याचा धक्का त्यात श्रावणी हि अशी घर सोडून गेलेली असते. दोघेही खूप खचून जातात. श्रावणीचा काहीच पत्ता लागत नसतो. सोहम सतत दर आठ दिवसांनी पोलिसांना काही पत्ता लागला कां ते विचारत असे.
इकडे श्रावणी नितेशच्या वागण्याला कंटाळली असते. तो दिवसेंदिवस विचित्र वागत असे, सिगारेट ओढत बसे, अधून मधून ड्रिंक पण करत असे. श्रावणीकडे सतत शरीरसुखाची मागणी करत असे. ती रडकुंडीला येत असे, पण तिच्याकडे काहीच पर्याय नव्हता. तीला नितेशने जिथे ठेवलं होतं तिथून तो तीला बाहेर जाऊच देत नसे.

एके दिवशी नितेशने खूप ड्रिंक केलं आणी त्यामुळे त्याला झोप लागली त्यामुळे श्रावणीने पटकन त्याच्या मोबाईलवरून घरी सोहमला फोन केला आणी सगळं सांगितलं पण ती कुठे आहे हे मात्र तीला सांगता आले नाही. पण सोहम बोलला मी मोबाईल नंबर वरून फोन कुठून आला होता त्यावरून पत्ता शोधून तुला लगेचच सोडवतो.

सोहम लगेचं पोलिसांना कळवतो आणी मग पोलीस आणी तो जाऊन श्रावणीला सोडवून आणतात. नितेशला अटक होते. श्रावणी तीन महिन्यांनी घरी येऊन गार्गीला सांगून खूप रडते, तिची माफी मागते. घरात आल्यावर सानिकाचा भिंतीला लावलेला हार घातलेला फोटो बघून ती स्तबध होते.

आजी वारल्याचं कळल्यावर तर तीला धक्काचं बसतो. माझ्यामुळे आजी वारली ह्याच तीला वाईट वाटतं.

सोहम आणि गार्गी तीला बोलतात, झालं गेलं सगळं विसरून जाऊ आणी आपण नव्याने सुरवात करू तू सध्या आराम कर आणी पुढच्या महिन्यापासून ऑफिस जॉइन कर. श्रावणी खूप रडत असते. मम्मी पप्पा मी चुकले असं सतत बोलत असते.

श्रावणीला ह्या सगळ्या परिस्थितीतून बाहेर यायला एक महिना जातो, श्रावणी खूप बदललेली असते, तिचा माज पूर्णपणे उतरलेला असतो, तिच्या वागण्या - बोलण्यात आता नम्रता आलेली असते. ती शांत झालेली असते. पहिल्यासारखं चिडून बोलत नसते, नोकरांना अगदी कमी लेखणारी श्रावणी आता त्यांना प्रेमाने हाक मारत असे ते बघून गार्गीला बरं वाटतं असे.
श्रावणी दोन महिन्यांनी ऑफिस जॉइन करते, ऑफिसमध्ये सोहम तिचं स्वागत करण्यासाठी एक पार्टी ठेवतो त्यामुळे ती अजूनच खुश होते. ती हळू हळू सगळं समजून घेत शिकत असते. आणी वर्ष भरातच सोहमला कॅन्सर डिटेक्ट होतो. सोहमची त्यबेत सतत बिघडू लागते. केमोथेरपी चालू होते. त्यामुळे गार्गी ऑफिसला येणं बंद करते त्या काळात श्रावणी सर्व जबाबदाऱ्या छान पार पाडते.

सोहमला त्याचं मरण जवळ आलेलं दिसत असतं त्यामुळे तो श्रावणीच्या चिंतेत राहत असे, तो गार्गीला सांगत असे हिची हिस्टरी बघता हिला लग्नासाठी मुलगा शोधताना तुला कठीण पडणार आहे. तीन वर्ष ट्रीटमेंट चालू असते आणी एके दिवशी सोहम श्रावणीला जवळ बोलवून बोलतो तुला पंचवीसव वर्ष चालू आहे तुझ्या लग्नाचं बघुया आपण.

श्रावणी सरळ सांगते मम्मी , पप्पा मी कधीच लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. आणी हा निर्णय बदलणार नाही आहे. मला पुन्हा त्या प्रेमाच्या भावनेत अडकायचं नाही आहे. दोघेही तिला खूप समजावतात पण ती शेवटपर्यंत नाहींच बोलते.

आठ दिवसांनी सोहमची त्यबेत खूप बिघडते आणी त्यात तो जग सोडून जातो. आयुष्यात प्रेमात फसलेली श्रावणी पुन्हा नव्याने उभी राहते आणी बिजनेस खूप मोठा करते. ती लग्न करत नाही. एकटीने आयुष्य काढणे अवघड असतं असं गार्गी सतत तीला समजावत असते पण श्रावणी तिच्या निर्णयावर ठाम राहुन वयाच्या पस्तीशीमध्ये एका अनाथ आश्रमातून एक मुलगी दत्तक घेते आणी तिच्या सोबत आपलं पुढचं आयुष्य सुखाने जगते.

कालांतराने वयोमानानुसार गार्गी मरण पावते. श्रावणी आणी तिची मुलगी रुही सर्व ऑफिस आणी वाडा विकून कायमच्या लंडनला शिफ्ट होतात.