उमाच्या वाक्यावर सगळ्यांनी तिच्याकडे नजरा रोखल्या.
"बोल... काय बोलायचं आहे तुला बिनधास्त बोल. मुलाकडून तुझ्या काय अपेक्षा आहेत, तुझ्या अटी काय आहेत. तेही सांग... आणि हो... तात्या भाऊ हे सगळं आम्ही आताच ठरवून जातोय कारण आम्हाला मुलगी पसंत आहे." ललिता म्हणजेच वेदची आई म्हणाली.
"बोल... काय बोलायचं आहे तुला बिनधास्त बोल. मुलाकडून तुझ्या काय अपेक्षा आहेत, तुझ्या अटी काय आहेत. तेही सांग... आणि हो... तात्या भाऊ हे सगळं आम्ही आताच ठरवून जातोय कारण आम्हाला मुलगी पसंत आहे." ललिता म्हणजेच वेदची आई म्हणाली.
"अ... माफ करा आई... पण मला जन्मतःच गर्भाशय नाही. त्यामुळे मी कधीच आई होऊ शकणार नाही." उमा म्हणाली. सखुचे डोळे टचकन भरून आले पण शिताफीने त्या माऊलीने पदराने पुसूनही घेतले.
"काय?" .... सगळेजण ताडकन उठून उभे राहिले. सगळ्यांमधे कुजबुज सुरू झाली. वेद पण धक्क्यात होता. कूठे न कूठे त्यालाही उमा आवडली होती. पण....
"काय बोलतेय... आधीच का नाहीत सांगितलं याबद्द्ल? आता आमचा निर्णय आम्ही नंतर कळवू" ललिता तडकाफडकी बाहेर निघून गेल्या. तशी सगळी मंडळी तिच्या मागोमाग बाहेर गेली.
"अं... सॉरी... यावर काय रिॲक्ट करावं कळेना. तुम्हाला दुखवण्याचा हेतू नव्हता; पण आमचा निर्णय नंतर कळवला तर चालेल का?" वेद पहिल्यांदाच बोलला. उमाने भरल्या डोळ्यांनी होकारार्थी मान हलवली. वेदही निघून गेला मागे उरली ती नेहमीचीच वेदनारहित शांतता...
***
"अं... सॉरी... यावर काय रिॲक्ट करावं कळेना. तुम्हाला दुखवण्याचा हेतू नव्हता; पण आमचा निर्णय नंतर कळवला तर चालेल का?" वेद पहिल्यांदाच बोलला. उमाने भरल्या डोळ्यांनी होकारार्थी मान हलवली. वेदही निघून गेला मागे उरली ती नेहमीचीच वेदनारहित शांतता...
***
"अरे मूर्ख झालायस का? एकदा नाही म्हणून सांगितलेलं समजत नाही का? का त्याच गोष्टीवर अडून बसला आहेस..." ललिता वेदवर ओरडत होत्या.
"खरं तेचं बोलतेय ती... त्या मुलीला मुलं होणार नाही, वंशाला दिवा कुठून आणणार आहेस?" वेदच्या बाबांनी ललिताची री ओढली.
"आई, बाबा आजकाल मुलं होण्यासाठी कितीतरी उपाय आहेत. आपणं त्यापैकी काहितरी करु पण मला उमाशीच लग्न करायचे आहे. जर तुम्हाला हे मान्य नसेल तर मी कधीचं लग्न करणारं नाही." इतकं बोलून वेद काही न ऐकता निघून गेला.
"ऐकलंत ना... आता काय करायचं? तुम्हाला तर माहितच आहे तो किती हट्टी आहे..." ललिता डोक्याला हात लावून बसल्या.
"मी काय म्हणतो... करू देतं त्याला लग्न... जेव्हा मुल होत नाही याची जाणीव होईल ना तेव्हा आपोआप कळेल." वेदचे बाबा म्हणाले.
शेवटी वेदच्या आई बाबांनी मान्य केलं. दोनच दिवसांत पुन्हा एकदा सर्वजण उमाच्या घरी निघाले. हवं तर पुन्हा डिव्होर्स देता येईल पण लेकाच असं वाटोळं होता कामा नये हा विचार करत सगळे उमाच्या दाराशी येऊन पोहोचले.
***
***
"वाह... किती सुंदर बनवला आहेस हा ड्रेस ताई... मला खूप खूप आवडला... किती कला आहेत अजून अंगात मला पण थोड्या उसन्या दे..." उमाने नववारी साडीपासून शिवलेला ड्रेस पाहून रमा म्हणाली.
"हो उमा खूप छान शिवलाय ड्रेस... आता हाच ड्रेस तुझ्या लग्नात घालेल रमा." आई ओघाच्या भरात बोलून गेली पण उमाचा चेहरा पडला तशी आईला चूक लक्षात आली.
"अं... जाऊ दे ना आई हा ड्रेस मी परवाच्या फेअरवेल पार्टीत घालेन. हो ना ताई." उमाने हसून मान डोलावली. दुपारचे दोन वाजले होते. तिघींच्या गप्पा रंगल्या होत्या तोच दारात गाडी थांबल्याचा आवाज आला.
"कोण असेल यावेळी?" रमा उठून पाहायला गेली. मागोमाग आई देखील गेली.
बाहेर वेद आणि त्याचे आई बाबा आले होते.
"अगं बाई तुम्ही!... या आत या..." सखु म्हणाल्या. रमा धावतच उमाकडे गेली.
"काय झालं? कोण आहे बाहेर?" उमा म्हणाली.
"अगं ताई ते परवाचेच पाहुणे आहेत." रमा
"काय?" उमालाच काय सगळ्यांनाच हे अनपेक्षित होतं. दोघीही बाहेर आल्या. वेदने हसून प्रतिसाद दिला. पण उमा खजील झाली.
"बसा मी चहा ठेवते." सखु आत निघाली.
"अं... चहा वगेरे काही नको... आम्ही फक्तं आमच्याकडुन होकार कळवायला आलोय. मग कधी तारीख काढायची?" ललिता म्हणाल्या.
"अगं बाई... खरचं काय?" सखु भरल्या डोळ्यांनी म्हणाली.
"हो... आम्ही लग्न जमवायलाच आलोय." वेद म्हणाला.
"एक मिनिट... मी सांगितलेल्या माझ्या कमतरतेसह तुम्ही मला स्वीकारत आहात?" उमाने शांसकपणे विचारले.
वेदने डोळ्यांनीच होकार भरला... उमाचे बाबा आणि भाऊही आले. सगळ्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता...
***
क्रमशः...
***
क्रमशः...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा