भाग ४(अंतिम)
हळुहळु दिवस सरत गेले. उमाच्या सासूच्या अर्थातच ललिताच्या कुरबुरी दिवसेंदिवस वाढत चालल्या. उमाला कळून चुकलं होतं हे का आणि कशासाठी होतं आहे. पण बिचारी मूग गिळून गप्प बसायची. वेदच तिचा एकमेव आधार होता. बाळ दत्तक घेण्याचा दोघांचा निर्णय झाला होता आणि त्यांनी सर्वांना बोलूनही दाखवला होता. पण त्याआधी दोघांनाही येणाऱ्या बाळासाठी पुरेसा वेळ हवा होता आणि त्याच प्रयत्नात दोघेही होते. उमाने तर जॉब सोडायचा विचार केला होता... येणाऱ्या बाळासाठी ती खूप आनंदी होती आणि म्हणूनच सासूच्या कुरबुरीकडे दुर्लक्ष करत राहायची.
हळुहळु दिवस सरत गेले. उमाच्या सासूच्या अर्थातच ललिताच्या कुरबुरी दिवसेंदिवस वाढत चालल्या. उमाला कळून चुकलं होतं हे का आणि कशासाठी होतं आहे. पण बिचारी मूग गिळून गप्प बसायची. वेदच तिचा एकमेव आधार होता. बाळ दत्तक घेण्याचा दोघांचा निर्णय झाला होता आणि त्यांनी सर्वांना बोलूनही दाखवला होता. पण त्याआधी दोघांनाही येणाऱ्या बाळासाठी पुरेसा वेळ हवा होता आणि त्याच प्रयत्नात दोघेही होते. उमाने तर जॉब सोडायचा विचार केला होता... येणाऱ्या बाळासाठी ती खूप आनंदी होती आणि म्हणूनच सासूच्या कुरबुरीकडे दुर्लक्ष करत राहायची.
तिचा मोबाईलची रिंग वाजली. ललिताचा कॉल होता... उमाने पट्कन कॉल रिसिव्ह केला.
"हॅलो..."
"हॅलो उमा... श्रेया आज येतं आहे माझ्या नातूला घेऊन. तर तिच्या स्वागताची तयारी करून ठेव." ललिता म्हणाली आणि कॉल कट झाला. उमाला खूप आनंद झाला. तिने लागलीच सगळी तयारी करून ठेवली. श्रेयाला आज हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला होता. गेली दोन महिने ती तिथेच म्हणजे माहेरी डिलिव्हरी साठी आली होती. प्रसूती वेदनेच्या कळा असह्य झाल्याने तिला हॉस्पिटल मधे दाखल केले. तिने गोंडस मुलाला जन्म दिला होता.
हॉस्पिटल मधून ललिता श्रेयाला घेऊन आली. ओवाळणीच ताट घेऊन उमा दारातच उभी होती. तिने श्रेयाला ओवाळलं.
"द्या बाळाला ईकडे." उमा आनंदून म्हणाली.
"अं... राहू दे... मी घेईन. तोवर पाणी गरम करायला सांग." उमाने बाळाला घेण्यासाठी पूढे केलेले हात रिकामेच राहिले. ललिता बाळाला घेऊन आत निघून गेली. श्रेयाला कसंस झालं. मान खाली घालून तीही मागोमाग गेली. उमाचे तुडुंब भरलेले डोळे घळघळ वाहू लागले... तरीही तिने स्वतःला सावरलं... कारण सत्य बदलता येणारं नव्हत.
दरवेळी उमा बाळाला घेण्याचा प्रयत्न करायची पण ललिता बहाणे करुन टाळाटाळ करायच्या.
"उमा जरा बाहेर जाऊन येते. बाळासाठी कपडे घ्यायचे आहेत" म्हणून ललिता बाहेर गेल्या. दुपारची वेळ... सासू सासरे बाहेर गेलेले., वेद ऑफिसला. घरी उमा आणि श्रेया दोघीच. नोकर केव्हाच निघून गेलेले. उमाने आता जॉब सोडलाच होता. फावल्या वेळात ती आपले छंद जोपासायची. श्रेया आणि बाळ दोघे झोपले होते म्हणून ती आपल्या खोलीत आली आणि बेडवर पहुडली. ईरा ब्लॉगिंगचे ॲप उघडून ती तिच्या आवडीच्या कथा वाचू लागली. वाचन तिचा एक आवडता छंद. ईरावरच्या भन्नाट कथा वाचण्यात ती गुंग झाली तोच तिच्या कानावर बाळाच्या रडण्याचा हलका आवाज आला. तिने उठून खात्री केली तर खरचं बाळ रडत होतं. श्रेया मात्र गाढ झोपली होती. उमाने अलगद जाऊन बाळाला उचलले आणि बाहेर आली. जरावेळाने तिच्या कुशीत बाळ शांत झालं. ती त्याच्याशी खेळू लागली. त्याच्या नाजूक हातांचा स्पर्श तिच्यातल्या मातृत्वाला जागं करत होता. त्याला खेळवण्यात ती मग्न झाली होती...
"उमा...." ललिताच्या आवाजाने ती दचकून उडाली. आवाजाने श्रेया देखील जागी झाली. उमाचे हात थरथर करु लागले. तिने अलगद बाळाला श्रेयाकडे सोपवले.
" का हात लावलास तू त्याला?" तावातावाने आत येत ललिता म्हणाल्या.
"अहो आई बाळ रडत होता खूप..."
"रडत होता तर श्रेयाला उठवायच... तुझे अपशकुनी हात कशाला लावायचे?"
"अगं आई असं काय बोलतेय... मी झोपली म्हणून वहिनीने घेतलं असेल ना..." श्रेया
"खरं तेचं बोलतेय... अपशकुनी आहे ही... हिच्यामुळे आमच्या घरात अजून पाळणा हलला नाही. नकोच म्हणत होते मी वेदला पण ऐकेल तर खरा... फक्तं त्याच्यामुळे तू आज ईथे उभी आहेस. नाहीतर तुझ्यासारख्या वांझोट्या बाईला माझ्या घरात कधीचं थारा नसता..." उकळत्या तेल कानात ओतल्याप्रमाणे ललिताचे शब्द उमाच्या कानात तांडव करत होते... तिच्या अश्रूंनी ऊर भिजून केला होता. हातापायांना कंप सुटला होता. असं वाटतं होतं... आता इथेच थरणी फाटावी आणि त्यात सामावून जावं.
"रडू नको... बंद कर नाटकं तुझं... इतकंच वाईट वाटतं असतं तर माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं नसतं तू... तू तर आई होऊ शकत नाहीस... आणि आम्हाला दत्तक मुलं देखील नकोय... थोडी जरी लाज असेल तर आताच्या आता या पेपर्स वर साईन कर आणि चालती हो इथून..." कपाटात ठेवलेले डिव्होर्स पेपर तिच्या पुढ्यात भिरकावत ललिता गरजल्या.
काय आहे आपलं अस्तित्व... काहीच नाही... एका स्त्री कडून फक्तं एवढीच अपेक्षा असते का? वंश वाढवणं.... तिला स्वतःच जगणं असं काहीच नाही का? असं असेल तर तुम्ही बरोबर आहात... का मी कोणाच्या आयुष्याचं वाटोळं करु? माझ्यातल्या मातृत्वाला तर मी अपुरीच आहे पण तुमच्या पुरुषत्वाला तर मी का अधुर ठेवू?... कितीही प्रेम केलंत माझ्यावर तरी माझ्याकडून ते नेहमीच अपूर्ण राहील... त्यापेक्षा मी तुमच्या आयुष्यातून निघून जाईन... तुमच्या प्रेमात दडलेलं दुःख मलाही कळतं... हा त्याग करायला मी तयार आहे... थरथरत्या हाताने तिने डिव्होर्स पेपर वर सही केली... आणि गर्भगळीत शरीराने ती घराबाहेर पडली...
कूठे जायचं कळत नव्हत... माहेरी तर कसं जावं... तिन्ही सांजेची उन्हे पश्चिमेला कलली होती... जणू सूर्य देवाने देखील तिच्या डोक्यावरचा हात काढून घेतला... धडपडत ती चालत राहिली...
ईकडे श्रेयाने वेदला कॉल करून कळवले तसा वेद शॉकमधे ऑफिस मधून बाहेर पडला. त्याने खूप शोधाशोध केली पण उमा त्याला कुठेच दिसली नाही. शेवटी त्याने पोलिसांना कॉल करून कळवले पण मदत चोवीस तासांच्या नंतर मिळणार होती. रागाने त्याने गाडी घराच्या दिशेने घेतली.
"कोणी आहे का?..." तो आत येताच गरजला... ललिता बाहेर आल्या... "जर का उमाच काही बरं वाईट झालं तर माझही मेलेल तोंड बघावं लागेल तुम्हाला... आई... आई म्हणायची सुद्धा लाज वाटते मला... एक बाईच दुसऱ्या बाईला समजून घेतं नाही... खरचं तुमच्या विचाराची कीव येते मला..." वेद भयंकर चिढला होता.
"योग्य तेचं केलंय मी... डिव्होर्स साईन केलाय तिने तू पण कर... आणि दुसरं लग्न करुन व्यवस्थित सेटल हो... दत्तक घ्यायला निघालात मुलं... लोकं काय बोलतील? घराण्याची इज्जत वेशीवर टांगायला निघालात दोघे..." ललिता पण त्याच सुरात म्हणाल्या...
"वाह... म्हणजे मुलं दत्तक घेतल्यावर घराण्याची इज्जत जाते... डिव्होर्स देऊन दुसरं लग्न केल्यावर नाही... विचार कर तिच्या जागी तू असतीस तर..." असं म्हणून वेद घराबाहेर पडला...
सतत घालमेल सुरू होती. अंधार दाटुन आला होता. वेद सैरभैर झाला होता... अचानक त्याला आठवलं. उमाला सप्तशृंगी देवीच मंदिर खूप आवडायचं. ती नेहमी तिच्या पूजेसाठी तिथेच जायची. कदाचित... त्याने गाडी त्या रस्त्यावर घेतली. थोड्याच वेळात तो मंदिरासमोर येऊन थांबला. बूट काढून धाड धाड पायऱ्या चढत तो वरती आला पण त्याचा हिरमोड झाला. तिथे कुठेच उमा दिसत नव्हती. त्याने देवीसमोर मनोमन प्रार्थना केली आणि निराश होऊन माघारी वळत असतानाच त्याला अंगणात बाजूच्या झाडाला टेकून शून्यात नजर लावून बसलेली उमा दिसली... तो धावतच तिच्याकडे गेला.
"उमा ... उमा... मला माहित होतं तू इथेच असणारं... मी तुला न्यायला आलोय चल उठ..." त्याने तिला उठवायचा प्रयत्न केला पण त्याचाच हात ओढून ती त्याच्या गळ्यात पडली अन् धाय मोकलून रडू लागली...
"रडू नको मी आहे ना? चल उठ बरं... उद्याच आपल्या बाळाला आणायला जाऊ... मग तू आई आणि मी बाबा..." वेद तिला समजावणीच्या सुरात म्हणाला. पण तिचं मुसमुसन चालूच होतं... त्याचं आवाजात एक हलका बारीक आवाज मिसळला होता... ' ट्या...."
दोघांनी चमकून आजूबाजूला पाहिलं... तेव्हां एका झाडाच्या पारावार एक निळ्या रंगाचं बास्केट होतं. त्याची हळुहळु हालचाल होत होती. त्यातूनच आवाज येतं होता. दोघांनी एकमेकांच्या तोंडाकडे पाहिलं. उमा धावतच तिकडे गेली पाठोपाठ वेदही...
दोघांनी चमकून आजूबाजूला पाहिलं... तेव्हां एका झाडाच्या पारावार एक निळ्या रंगाचं बास्केट होतं. त्याची हळुहळु हालचाल होत होती. त्यातूनच आवाज येतं होता. दोघांनी एकमेकांच्या तोंडाकडे पाहिलं. उमा धावतच तिकडे गेली पाठोपाठ वेदही...
ते निळ्या रंगाचं बास्केट होतं. त्यात एक लहान बाळ कदाचित नुकतच जन्मल असावं... कापडात गुंडाळलेलं ते बाळ हळुहळु हालचाल करत रडण्याचा प्रयत्न करत होतं. त्याच्या बाजूलाच एक चिठ्ठी होती. उमाने डोळे पुसत त्या बाळाला दोन्ही हातावर उचललं... वेदने चिठ्ठी उघडली...
'आम्हाला माफ करा... खरचं आम्ही माफीच्या लायक नाही आहोत पण... हे बाळ सांभाळण्याची आमची क्षमता नाहीये... कारण आम्ही खूप गरीब आहोत... अगदी हातावरच पोट म्हणा... भविष्यात कधी मोठे झालोच तर या बाळाला आम्ही परत घेऊ... तोवर जे कोणी आहे त्यांनी याचा सांभाळ कराल... देवी आईला नक्कीच माहित आहे आम्ही वाईट नाही आहोत... म्हणूनच तिच्या दारी आम्ही या बाळाला सोडून जातं आहोत.' ... खरचं देवही किती निष्ठुर म्हणायचा... ज्याला मुलं हवं त्याला देतं नाही... नको असणाऱ्यांच्या पदरात मात्र भरभरून देतो.
वेद आणि उमाने अश्रूपूर्ण नयनांनी त्या बाळाला मिठी मारली. उमाने त्या गोंडस परीला छातीशी कवटाळलं... तिचं मातृत्व तिच्या अश्रूत ओसंडून वाहत होतं... आता ती 'वांझोटी' नव्हती... ती आई झाली होती.
"आईच्या आशीर्वादाने तू माझ्या पदरात पडली आणि खरचं मी पवित्र झाले..." भरून आलेला ऊर पुन्हा एकदा रिता झाला. मात्र यावेळी तो अश्रूंचा पूर आनंदाच्या लाटा घेऊन आला होता.
देवीचा आशीर्वाद घेऊन तिघे घरी आले. थोड्याच दिवसात ललिताला आपली चूक उमजली. उमाने देखील मोठ्या मनाने माफ केले. आता तिचा परिवार परिपूर्ण झाला होता... सगळे गुण्या गोविंदाने नांदू लागले.
समाप्त!
©® प्रणाली निलेश चंदनशिवे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा