Login

वारस 1

डॉन आणि पोलीस यांची कथा
वारस भाग 1

दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी  25-26

शहर अर्थात मुंबई...


रात्रीचे अकरा वाजले होते. मुंबई शहर तस झोपलेलं नव्हतं, पण शांत वाटत होतं. ... नेहमी प्रमाणे रस्त्यांवर पिवळ्या दिव्यांची ओळ होती आणि समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यात वेगळया च झिणझिण्या होत्या...

    मात्र दूरवर अंधेरीच्या एका गोडाऊनमध्ये गाड्यांची गर्दी जमली होती.... काळ्या SUV, Scorpio, ...त्यात सामील होते... वातावरणात ही तणाव होता... तोच थोड्याच वेळात दरवाजे उघडले आणि आतून उतरला विक्रांत भोसले...VB ..उंच, भक्कम शरीर, गडद डोळे पण  चेहऱ्यावर नेहमीसारखाच स्थिर भाव...


“आजची खेळी खूप मोठी असणार आहे ” त्याने आपल्या माणसांना सांगितलं...


" हो भाऊ , पण जरा काळजी ही यावेळी जास्त घ्यावी लागणार आहे तुम्हाला..." तो माणूस म्हणजे त्याचा उजवा हात पक्या बोलला...


" हम्म.. तू माझी काळजी करू नकोस ...बस हिच्या कडे लक्ष असू दे..." VB , त्याच्या शेजारी एक तरुण मुलगी उभी होती तिच्या कडे पाहून थोडे गंभीर होत म्हणाला ...ती होती त्याची लाडकी बहीण – मीरा भोसले. पांढऱ्या सलवारमध्ये, गळ्यात साधी चैन, चेहऱ्यावर निरागस हसू...वय वर्ष २०..कॉलेज ला जस्ट जॉईन झालेली...बी कॉम च्या पहिल्या वर्षी...

" एवढी काळजी वाटते तर नको ना जाऊ दादा यावेळी तरी..
ती आता मुलगी हात जोडून म्हणाली –


" मीरू, please हट्ट karu नको..यावेळी मला जावेच लागेल...आणि पक्या आहे ना तुझी काळजी घ्यायला..." पण इतका वेळ कठोर चेहरा करून असलेला VB तिच्या अशा बोलण्याने थोडा भावूक झाला होता पण तरी स्वतःला सावरत तो बोलला...


“बरं दादा…पण  तू परत कधी येणार? उशीर करू नकोस. मला भिती वाटते ह्या लोकांमध्ये.” तस ती समजूतदार पने बोलते...


    विक्रांतने तिच्या डोक्यावर हात ठेवला.आणि हलके हसत म्हणाला, “ बस मीरू एक आठवडा...आणि घाबरू नको, मीरा.....जोवर मी आहे, तोवर तुला कुणी स्पर्शही करू शकणार नाही.” अस बोलून तो पटकन आपल्या कार मध्ये बसला..का  माहित नाही पण त्याला ही या वेळी अस तिला एकटीला सोडून जावे वाटत नव्हते...पण तिच्यासाठी त्याला कमजोर ही नव्हते पडायचे..त्याने डोळ्याने च पक्या ला तिची काळजी घे हे जाता जाता सांगायला विसरला नाही...पक्या ने ही डोळ्यांनी च हमी भरली...


क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

0

🎭 Series Post

View all