वर्गमित्र भाग 15

मैत्रीच्या हशुवार नात्याला अलगद उलगडणारी भावस्पर्शी कथा वर्गमित्र.

वर्गमित्र -15

गेल्या महिन्याभरापासून काही ना काही व्यापात ईतकी गुंतून पडले होते की प्रसाद ला फोन करायचे राहूनच गेले होते.
आज का कुणास ठाऊक सतत त्याचीच आठवण येत होती.काय झालेय?
कसा असेल तो?
आपण बोलत नाही ह्याचा काही वेगळा अर्थ काढून रागावला तर नसेल ना?
छे!! हे विचारांचे काहूरच माणसाला छळते सतत.
खरी कथा काहीतरी वेगळीच असते पण मन एकदा एका दिशेने विचार करायला लागले की मग मनाचा वारू त्याच दिशेने अशी बेफाम घोडदौड करू लागतो की विचारांच्या खोल गर्तेत कसे फसत जातो आपले आपल्यालाच कळत नाही.
पण आता विचार न करता कृतीच करू.
प्रसादचा फोन बंद!!!??
हे काय?
पून्हा लावला,तरी तेच.
"तूझा फोन लागत नाहीये.वेळ झाला की फोन कर." आशू.
मेसेज लिहून मी आता त्याच्या फोन किंवा मेसेजची वाट बघत बसले.
          # ## ## ## ## #
मेसेज लिहून तब्बल 2 दिवस होवून गेले होते पण कोणताच प्रतिसाद नाही.ह्या पद्धतीने तो ह्या आधी कधीच वागला नव्हता. काय करावे सुचत नव्हते.मनात भलभलत्या शंकांनी थैमान घालायला सुरवात केली होती.
काय म्हणावे ह्या मुलाला?  किती बेजावाबदार वागणे हे?
चीड,राग,संताप आणि काळजी ह्या सगळ्या भावना आलटून पालटून मनाचा कब्जा घेत होते.
काही म्हणता काहीच सुचत नव्हते.
सारखा उठसूठ मनिषला फोन करून चौकशी करणेही बरे नसते दिसले.
मग कसा संपर्क करू ह्याला?
"आई,जेंडर म्हणजे काय ग?
काऊ मेल की फिमेल?"
ऋषीच्या ह्या प्रश्नांनी मी भानावर आले.
"बाळा,काऊ फिमेल आणि बुल मेल."
थँक्यू आई.आज दादाने मला शिकवले काऊ ईज फिमेल.
आणि तू शिकवलेस की बूल ईज मेल.

तो बडबडतच गेला उड्या मारत.
आणि लगेच कल्पना आली मेल?!!
मेल करू शकते ना.
तो तर मिळेलच की.

व्वा!काय पण गोड लेक आहे माझा.जाताजाता माझ्या प्रश्नाचे उत्तरही सोपे करून गेला.
मी लगेच तोच मेसेज मेल केला.

दूपारचे चार वाजलेले.साधारणपणे ऑफीस चालू असण्याची वेळ म्हणजे अॅटलिस्ट मेल तर पोहोचेल.
बघू काय होते.

आता एक समाधानाचा सुस्कारा सोडत मी दूसऱ्या कामाला लागले.
चहा मुलांची खाणी,सोहमचा स्विमिंगचा क्लास आणि ऋशीचा स्केटींग क्लास.
सगळे उरकून सातला घरी आले.
मेल चेक केला आणि हायसे वाटले.
प्रसादने मेल केला होता,
"उद्या खाली दिलेल्या नंबरवर फोन कर."

दूसरा दिवस कधी उजाडतो ह्याचीच वाट पहात दिवस बूडाला होता.
## ## # ## ## ## ## #
(क्रमश:15)
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला हा भाग?
वर्गमित्र कथा आवडतेय की नाही ?
हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all