वर्गमित्र भाग 14

मैत्रीच्या हळुवार नात्याला अलगद उलगडणारी हलकी फुलकी कथा वर्गमित्र..

# वर्गमित्र-14

सकाळी फोनच्या कर्ण कर्कश्श गझरने सहा वाजताच जाग आली.मला खूप कामे होती पण उठावेसेच वाटत नव्हते.
एकदा झोपमोड झाल्यावर प्रयत्न करूनही पून्हा झोप लागेना.मग उठले, तशीच काहीशा आळसावलेल्या अंगाने.पेपर पडला होता येवून.चहा घेता घेता पेपर चाळत उगीचच पाने उलट सुलट फिरवत होते.
चहा संपवून बाकीची राहीलेेली आवराआवरी करत होते.
पर्समधेही बराच पसारा झालेला साफ करावा म्हणून हातात घेतली.वेगवेगळ्या ठिकाणी खेळासाठी घेतलेले एन्ट्री टिकीट्स पासून चॉकलेटचे रॅपर्स, बडीशेपच्या पुड्या,वेळोवेळी मॅचिंग बदललेल्या काही तुटक्या बांगड्या, टुथपिक्स,सेफ्टी पिन्स, मुलांचे बदललेले मोजे पण घाईत पर्स मधेच कोंबलेले.इतके ब्रम्हांड कसे काय सामावून घेते बिचारी!!!!
आश्चर्यच वाटते.
त्यातच एका कोपऱ्यात चपट्या आकारात काहीतरी हाताला लागले.काढून बघते तर काय! माझा फोन बेवारशा सारखा निर्जीवावस्थेत पुन:रूज्जीवन कधी मिळतेय ह्या प्रतिक्षेत ध्यान लावून बसला होता बहूदा.
मी तर ह्या माझ्या जीवलगाला मागील काही दिवसात विसरूनच गेले होते.
पटापट फोन सूरू करताच फटाक्यांची आतषबाजी व्हावी किंवा मग धो धो पाऊस अचानक कोसळावा तशी मेसेजेसची बारीश होत होती.
असंख्य मेसेजेस पडलेले होते.
एक मेसेज वाचून हसायलाच आले
"धरतीवर आपण कधी प्रकट होणार आहात देवी?
स्वर्गाची सैर करता करता धरतीवर पाचरण करण्याचे आपणाला विस्मरण झालेय की काय ?
इकडे भूतलावर हाह्हाकार माजलाय देवी.
कृपया सत्वर शीघ्र पाचारण करावे"
इति नारद.
उर्फ
मुरली.
हो मुरलीच.
अगदी हटके कॅरेक्टर.
तसा मित्र तर तो श्रीचा होता पण आमच्या प्रेम प्रवासाचा हाच एकमेव दूवा होता.
म्हणजे कधी दोघांत काही वाद ,भांडण काही झाले तरी मुरली माझ्याच बाजूने उभा असायचा.
माझा भाऊ,मित्र,सखा आणि श्रीचा मित्र म्हणुन दीर अशी विविध नाती होती त्याची माझी.
श्री तर नेहमी लटक्या रागाने म्हणायचा,साला मित्र माझाय पण पक्का सवत्या झालाय आणि तूझा पिद्दू"
मला कधी मेसेज करून विचारत नाही तू कसाएस पण तूला बघ लगेच मेसेज वर मेसेज"
श्रीच्या त्या रागावरही जीव ओवाळून टाकावा वाटायचा अशा वेळी.
मुरलीचा स्वभाव असाच मस्कऱ्या नेहेमी.
पण चेष्टेचेष्टेतच कधी इतके सुचक बोलून जायचा ना की विचार करायला भाग पडावे.
तो माझा हक्काचा कोपरा होता श्रीशी नाते जुळल्या पासून.काहीही असेल तर त्याला सांगायचे की काम फत्ते झालेच म्हणून समजा.
तर त्याचा मेसेज वाचून हसायलाच आले.कारण तो एकटाच होता ज्याला मी सांगीतले होते की सिमल्याला चाललोय स्वर्गात...
त्यामूळेच असा मेसेज केला होता त्याने.
        # ## ## ## ## #
गृपचे अनेक मेसेजेस टाळून फक्त काही महत्वाचे पर्सनल मेसेजस मी वाचत होते.
प्रसादचेही तीन चार मेसेजेस होते.कूठेस विचारणारे.
आत्ता मला स्मरण झाले की निघताना मी त्याला काहीही न सांगता गेले होते.कारण तो त्याच्या घरगूती अडचणींमधे व्यस्त होता.
आता वेळ झाला की फोनच करूया ह्या विचाराने मी त्याच्या मेसेजला रिप्लाय देणे टाळले.
     # ## ## ## ## #
माझ्या किचनची अवस्था तर बघवत नव्हती.कामवालीला फोन करून बोलावून घेतले आधी.तिच्या मदतीने जरा स्वच्छता करूनच स्वैपाक सूरू होणार होता हे तर निर्विवाद सत्य होते.त्यामुळे श्रीला आजही बाहेरचेच खावे लागणार होते.
गेले आठ दिवस बाहेरचे खावून वैतागला होता त्यामूळे घरी येवूनही पून्हा बाहेरचे म्हणल्यावर तो चिडचीड करणार हे निश्चितच होते.
कसेतरी बाबापूता करून त्याला मनवावे लागणार होते मला.
चला आता "मिशन-श्री" साठी तयार व्हा आशूबाई!
असे स्वत:च स्वत:ला बजावत मी बेडरूम मधे गेले...
 ###############
(क्रमश:14)
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला हा भाग?
वर्गमित्र कथा आवडतेय की नाही ?
हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all