वर्गमित्र भाग 16

मैत्रीच्या हळुवार नात्याला अलगद उलगडणारी भावस्पर्शी कथा वर्गमित्र.

वर्गमित्र-16
©®राधिका कुलकर्णी.


सकाळी घाईघाईतच सगळी कामे उरकली.
सुट्ट्यांमूळे मुलांच्या विविध मागण्या पूऱ्या करता करता जीव मेटाकुटीला येतो नुसता.
श्रीला मात्र कितीही काहीही बनवा शेवटी रोजची पोळी भाजी भात वरण लागतेच.
सगळ्यांचे सगळे पूरे करता वेळ कसा जातो कळतच नाही.
आज तर मूलांनी पिझ्झाची डिमांड केली होती.मग काय मुलांचा पिझ्झा,श्रीची पोळी भाजी असे सर्व सांग्रसंगीत कार्यक्रम उरकत मी कधी मोकळी होतेय असे झाले.कारण मला प्रसादशी बोलायला मोकळा वेळ हवा होता.खूप बोलायचे होते.माझ्या ट्रीपची मज्जा त्याच्याशी शेअर करायची होती.
त्याचेही खूप काही 'अनकही बाते' सगळ्याला वेळ तर हवाच होता.
    ## ## ## ## ## 
हूश्श!एकदाची झाली बाई सुटका सगळ्या कामातून.
मूलेही आता टिव्हीपूढे बसून कार्टुन चॅनेल बघता बघता पिझ्झा वर ताव मारत होते.
मला काही ते लचके तोडणे आवडत नाही.
हो!लचकेच तोडणे.
किती ते चिझ चिकट.नंतर वात्तड होते अन् रबर खाल्लयागत होते.एकूण काय तर पिझ्झा मला आवडत नाही.मग मीही पोळी भाजीच जेवले.
श्रीही ऑफीसला गेला होता.
प्रसादला फोन का लागत नाहीये.
कालही लागला नाही.मी काहीशा नाराजीनेच मनात खट्टू झाले.
अग बाई! किती मी बावळट.
त्याने काल दिलेल्या नंबरवर करायचा सोडून आधीच्याच नंबरला पून्हा डायल करत होते.पण हा नंबर का? नंबर का बदललाय?
असो,बोलल्यावर कळेलच.
नविन नंबरवर रींग जात होती.
"हॅलो.प्रसाद???"
"कोण बोलतेय??"इति प्रसाद.
अाॅऽऽ? मी आश्चर्यमिश्रीत प्रश्नांकीत भावनेनेच त्याला जवळपास ओरडूनच बोलले.
"अरे एऽऽ..आता माझा नंबर नाव पण विसरलास का तू?"
"मी आशू."
"अरे!!तू होय."
"सॉरी डिअर."
"तुझ्या सॉरीच्याऽऽऽऽकाय चाललेय.?"
"काय प्रकार आहे हा सगळा?"
"आणि जूना नंबर लागत का नाही? कितीदा कॉल केला मी."
जराशी वैतागूनच बोलत होते मी.
"अग माझ्या सखेऽऽतूझे फायरींग थांबव आधी."
"मला फक्त 10 मिनीट दे.
जरा एक काम हातातले उरकतो आणि तूला मीच कॉल करतो."
"You dnt know,how much I missed you.
wanna talk to you so much.just wait for some time."
असे म्हणून फोन बंद केला.मी अजूनच बुचकळ्यात पडले.एक महिन्यात किती जग बदललेय असे वाटायला लागले होते.
पण वाट पाहण्याखेरीज पर्यायही नव्हता.
       # ## ## ## ## #
ठरल्या प्रमाणे बरोबर दहाव्या मिनटाला फोन खणखणला.
हो प्रसादचाच नविन नंबर होता.
प्रसाद भेटल्या पासून मी बघत आलीय की तो खूपच प्रॉम्ट प्रत्येक बाबतीत.
त्याचा हा एक गूण मला खूप आवडायचा.
त्याने एखादी गोष्ट करतो म्हणला की तो ती करणार म्हणजे करणारच.

 भयंकर चीड येते जेव्हा लोक कॉल करतो म्हणतात अाणि करतच नाहीत.
किंवा खोटी प्रॉमिसेस,खोटे वागणे,खोटे बोलणे.
ह्या गोष्टींनी तात्पूरती वेळ निभते पण आयुष्यभराकरता लोकांचा विश्वास मात्र उडतो.
     # ## ## ## ## #
(क्रमश: 16)
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला हा भाग?
वर्गमित्र कथा आवडतेय की नाही ?
हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all