वर्गमित्र भाग 19

मैत्रीच्या हळुवार नात्याला अलगद जपणारी उलगडणारी भावस्पर्शी कथा वर्गमित्र.

वर्गमित्र-19
®©राधिका कुलकर्णी.

"अरे,उद्या एका लग्ना निमित्त येतीय मी पुण्यात.
तू आहेस का फ्री?
शक्य असेल तर सांग.मग भेटू जरावेळ.
मी आणि श्री येतोय पण आपण भेटू शकतो.
मेसेज वाचलास की रिप्लाय दे.
बायऽऽ
गुड डे."
मेसेज तर दिला होता.बघू आता काय म्हणतोय.
उद्या लवकर निघावे लागणार होते.मुहूर्त लवकरचाच होता सकाळचा.श्री च्या कोणत्या तरी मित्राचे लग्न होते.
मूलांना मूद्दामच नेणार नव्हतो.उन्हात कूठे फरफट करा. माझ्याच एका बिल्डींग मधल्या मैत्रिणीकडे सोडणार होते.
त्यांची सोय झाली होती.आता आमचेच कधी कसे निघणे होते बघायचे.
मला एरवी जाणे टाळता आले असत पण त्या निमित्त प्रसादला भेटणे ही झाले असते.निदान काय म्हणतोय, काय बोलायचेय हे,तर कळले असते म्हणून मी चटकन जायला होकार भरला
तसा श्री पण आश्चर्यचकीत झाला.
कुठलेही आढेवेढे न घेता लगेच यायला तयार झाले म्हणून खूष होता श्री.
पण मी जेव्हा सांगीतले की मला प्रसादला भेटणे होईल त्या निमित्त तर लगेच म्हणला," हम्म् !तेच म्हणलो,आज तू एकदम कशी तयार झालीस.
"कुछ तो गडबड है दया,
तोड दोऽऽऽ दरवाजाऽऽऽ"
मलाही त्याच्या बोलण्याने हसू आवरेना.
त्या लग्नात उगीच मिरवायचा कंटाळाच येतो मला.
त्यात ते श्रीच्या मित्राचे म्हणजे सगळा फॉर्मल मामला..
बाहूली सारखे श्रीच्या मागेमागे फिरायचे त्याच्या ऑफिस कलिग्जशी तो ओळख करून देणार मग ते खोटे खोटे हसून ग्रीट करणे.
त्यांच्या त्या भडक भडक कपड्यातल्या भडक मेकअप केलेल्या बायकांशी उगीचच गप्पा मारायच्या मला ह्या सगळ्याचा भारी कंटाळा येतो.

कितीदा तरी श्रीला म्हणले तू एकटाच जात जा ना.पण ऐकेल तर तो श्री कसचा.मला म्हणतो, "अग,ते सगळे त्यांच्या बायकांना फक्त इनट्रोडक्शन म्हणून घेवून येतात दिखाव्यासाठी.तू तर एवढी सुंदर आहेस मग मी का नाही घेवून जायचे तूला.."
"फक्त दिखाव्या साठी?"
"प्रेम नाही का तुझे?"
"अग माझे राणी,प्रेम तर आहेच ना,म्हणून तर तूला सोबत रहा म्हणतो ना सारखा माझ्या" 

झालेऽऽऽऽ..असे काही डायलॉग्ज मारले की स्वारी लगेच रोमँटिक मुड मधे येणार.
कसल्याशा आवाजाने विचारांची तंद्री भंगली.
प्रसाद चा रिप्लाय आला होता...
"not possible tomorrow as am busy in one relative's marriage function.
so sorry dear."

ok म्हणून मीही दुसऱ्या कामात गुंतून गेले.
       # ## ## ## ## ## #
सकाळी सहा वाजताच आम्ही घराबाहेर पडलो.
तन्वीला चावी देवून ठेवली एक.म्हणजे ती येवून बघेल मग दिवसभर मूलांकडे.
तिची अन् माझी मूले घेवून ती मुव्हीला जाणार होती.बरेच झाले.मुलेही खूष होणार होती.
सकाळचा थंड वारा खातच आम्ही मुंबई सोडली.
9:30 पर्यंत पोहोचायला हवे होते.9:51 चा मुहूर्त होता.
      # ## ## ## ## ## #
प्रभात रोडवर कुठेशी हॉल होता.
आम्ही वेळेतच पोहोचलो होतो.
दोन तीन पाट्या लागल्या होत्या.
हुश्श!!मिळाला हॉल.वरच्या मजल्यावर लग्न होते.खालीही लग्नच होते.

हे बरे असते बाई! एकाच ठिकाणी खाली मुंज ,वरती लग्न अन् त्याहून वरच्या मजल्यावर बारसे नाहीतर लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी..मज्जाय ना!! जीवनाच्या हरएक पातळीचे दृष्य एकाचवेळी एकाच ठिकाणी.
हे म्हणजे तीन तासाच्या मुव्हीत प्रेम ते लग्न पासून ते थेट नातवंडा आणि मग मृत्यू सगऴा जीवनपट जसा उलगडावा तसेच वाटले हे मला.
हे काय बोलत बसलीय मी.
तिकडे लग्न लागतेय.
मंगलाष्टकांचा आवाज सूरू झालाय.
चला जायला हवे लवकर.
पर्स उगाच थरथरत होती.
लिफ्ट मधे फोन चेक केला.आईचा फोन होता.
उचलेपर्यंत थांबला होता.
आता लग्न लावूनच मग फोन करावा..
# ## ## ## ## #
हॉलमधे स्टेजवर सुंदरशी वधू अंतरपटात पूढील आयुष्याची स्वप्ने रंगवत वाट पहात होती कधी हा पट दूर होईल आणि ती आपल्या प्रिय साथीदाराला माळ घालते.
आणि आम्ही ही.
मी जरा जास्तच वाट बघत होते.
अशा अनोळखी भपक्यात मला उगीचच गुदमरायला होते.
भटजींनी मुहुर्ताचे ताराबलंम् चंन्द्र बलं तदैव..सुरू केले.टाळ्या वाजवून मुलामुलीने एकमेकांना हार घातले.
आणि माझी सुटका झाली.
खाली आले आईला फोन केला.तिच्याशी बोलतेय तोच मागून कोणीतरी आवाज देतेय असे वाटले.
मग लक्षात आले खालीही लग्न गडबड होती,असेल कोणीतरी कुणाला तरी आवाज देत.
मी दुर्लक्ष केले.आईचा फोन होतोय तोच प्रसादचा फोन," उभी आहेस तिकडून 45 अंशात मागे फिर."
मी आश्चर्यानेच मागे वळले.
आणि प्रसाद ऊभा होता.
आतामात्र मी खरच मुकबधीर अवस्थेत उभी होते.
ह्या अनोळख्या गर्दीत अचानक प्रसादचे भेटणे म्हणजे करकरीत उन्हात मंद वाऱ्याची झुळूक जणू.
मी खूप खूष झाले त्याला पाहून.
तो शाहरूख खानच्या फिल्म चा डायलॉग आठवला,जब शिद्दत से किसी को मिलना चाहो तो,
 पूरी कायनात तुम्हे उनसे मिलाने की कोशीश करती है" वगैरे वगैरेसा.
कदाचित त्याला भेटण्याची माझी ईच्छा इतकी तीव्र होती की देवानेच ती भेट घडवली मग.नकळत अशी आवडती व्यक्ती भेटणे म्हणजे तहानलेल्याला दूर दूर पर्यंत कुठेही पाण्याचा ठिपूस दृष्टिस पडत नसताना अचानक थंड वाळ्याचे पाणी मिळावे प्याउवर..
चला आता पुढला दिवस तर मस्त जाणार ह्यात शंका नव्हती.
     # ## ## ## ## ## #
तो माझ्या दिशेने येत होता.
माझा मात्र पुतळा झाला होता ह्या अनोख्या योगायोगाने..
(क्रमश:19)
®©राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला हा भाग?
वर्गमित्र कथा आवडतेय की नाही ?
आता फक्त चार किंवा पाच भागात कथा संपेल असे वाटतेय.तुम्ही आत्तापर्यंतचे भाग वाचले असतील तर तुमच्या विस्तृत प्रतिक्रीया ऐकायला आवडेल मला.
 तेव्हा कमेंटद्वारे जरूर कळवा ,काही सजेशन्स पण असतील तर सुचवा.तुमच्या सजेशन्समुळे लेखकांना सुधारणेला वाव मिळतो.न वाचलेल्यांनाही विनंती की हि कथा जरूर जरूर वाचा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all