वर्गमित्र भाग 3

मैत्रीच्या नात्याला हळुवार स्पर्श करणारी हलकी फुलकी कथा वर्गमित्र जरूर वाचा.

वर्गमित्र-3
©®राधिका कुलकर्णी.

घाईने रात्री पर्समधे कुठेतरी कोंबलेले पुडके आता शोधायला सुरवात झाली.पर्स कसली कबाडखानाच..असंख्य वस्तुंचे भांडार. लागेल असु द्यावे म्हणुन प्रत्येक खेपेला काही ना काही कोंबलेले..गरज किती पडते माहित नाही पण नेमकी हवी ती वस्तु मात्र वेळेला सापडेल तर शप्पथ.!!
हुश्श!! सापडले बाई एकदाचे.
खरेतर वरची वेष्टण केलेली कागदं मी फार जपुन काढते.तडातडा फाडणे मला आवडत नाही.आज मात्र तो नियम धाब्यावर बसला आणि कागद अगदी लहानमुल होउनच मी फाडला.
एक छोटिशी डबी होती.
डबीत एक सुंदर नाजुकसे कानातले.
बाई ग्..!! कित्ती सुंदर!!
एक उभा सोनेरी व्ही आणि त्यावर अगदी छोटे छोटे मोती जडवलेले आणि खालीही तसेच छोटेसे मोत्याचे लोलक लटकत होते.
त्याच्या चॉईसवर मी जाम फिदा झाले..
माझा आणि श्रीधरचा प्रेमविवाहच. पण बापजन्मात त्याला गिफ्ट आणणे कधी जमलेच नाही.
एकदोनदा मला सरप्राईज करायचा प्रयत्न करण्यात मला गिफ्ट आवडले नाही म्हणुन जोरदार भांडणच झाले आमचे.
मग काय श्रीने कानाला खडाच लावला.काहीही घ्यायचे तर तो मला सोबत घेऊन खरेदी करायचा.त्यामुळे कित्येक वर्षात अशा सरप्राईज गिफ्टची मला सवयच नव्हती.
पण प्रसादची ही भेट मला मनोमन खुष करून गेली. दोन कारणांनी...
एकतर माझ्या आवडीनिवडी फारशा माहित नसतानाही त्याने सरप्राईज गिफ्ट इतक्या थ्रिलिंग स्टाईलने दिले.
आणि दुसरे.....,
 मला कोणीतरी गिफ्ट तेही एका मित्राने दिले होते.

लगेच कानात घालुन बघितले.लोलक हलताना होणारी नाजुक किणकीण कानात घुमत होती.
फोनवर ईनकमिंग कॉलरट्युन ढायढाय 
वाजत होती.धावत जाऊन फोन बघितला.तर प्रसादचाच .....
"अरे कित्ती गोडऽऽ आहेत कानातले.!!!
तुझी निवड सुंदर आहे हं!! 
"खूप खूप थँक्यु !!!"
पण गिफ्टची काय गरज होती रे??
हि फॉरमॅलिटी कशासाठी?
मी धाडधाड बोलतच सुटले.नकळत ओव्हर एक्साईटमेंट!!!!!

प्रसाद : अगंंऽऽ पहिल्यांदा आयुष्यात कुठल्यातरी गोड मैत्रिणीकडे जात होतो.मग असेच कसे जाणार.?"
आणि जोरजोरात हसायला लागला.
मला म्हणतो कसा "आशु,तुला माहितीय का आज पहिल्यांदा मी कुणासाठी तरी तेही एका स्त्री साठी काहीतरी खरेदी केलीय.
अख्खे शाळा/कॉलेजचे आयुष्य गेले पण कोणी मैत्रिणी नव्हत्या गं मला.
आणि लग्नानंतर बायकोच माझ्या आणि तिच्या खरेदीचा भार वाहते.ती ड्रेस डिझायनर आहे ना,तिला हा सेन्स खूप चांगलाय की मला काय छान दिसेल?
 तिने तर सांगुनच टाकलेय मला की प्रसाद तुला ह्यातले काही कळत नाही.मला काही आणायच्या भानगडीत तु पडुच नकोस.
हाहाहाहा..!!!
त्यामुळे हे मी निवडलेले पहिले वहिले गिफ्ट.तुला आवडले हे ऐकुन बरे वाटले....

कालपासुन मला सारखे हेच वाटत होते की तु इतका उशीर लावलास म्हणजे नक्कीच तुला कानातले आवडले नसणार..
पण हे कसे सांगायचे ?
म्हणुन तु मला काहीच बोलत नाहिएस...
असो...मी खरच खुष आहे..
माझी ऩिवड कुणाला तरी आवडलीय.
म्हणजे ह्यापुढे आता मी हिंम्मत करायला हरकत नाही..हो ना..!!!"
तो पुन्हा जोरजोरात हसत होता.."

मीही हसले..मनात आले.
घरोघरी मातीच्या चुली....!
~~~~~~~~~~~~~~~~~
( क्रमश: 3)
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला भाग 3?
वर्गमित्र कथा आवडतेय की नाही ?
हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all