Login

वाट प्रेमाची...भाग2

दीर्घकथा
हळूहळू त्याने तिची मान ओढली आणि अलगद तिच्या कानाच्या मागे ओठ टेकवत म्हणाला, "तू मला उशीर केलास, माया. मी आधीच तुझ्यावर वेडा झालोय."
आयराच्या पाठीवर त्याचे बोटं फिरू लागले, तिच्या त्वचेतून एक रोमांच उठला. तिने डोळे मिटून घेतले आणि त्याच्या मिठीत विरून गेली.
त्या रात्री पहाटेपर्यंत दोघांमध्ये एकही शब्द झाला नाही... फक्त श्वासांचा संवाद आणि त्वचांचे स्पर्श होते.

पहाटेच्या गुलाबी प्रकाशात माया हळूच उठली. श्रेयस अजूनही शांत झोपला होता, त्याचा एक हात तिच्या कंबरेवर विसावला होता. ती त्याच्याकडे पाहत राहिली… जणू काही तो एक स्वप्न होता, आणि क्षणभरात विरून जाईल.

तिला माहित होतं की हे वेड टिकणार नाही. कदाचित ही एक रात्र होती.एक जादुई, वेडसर, आणि विसरू न शकणारी रात्र. पण या रात्रीने तिचं मन आणखी गुंतवलं होतं.

ती हळूच उठून खिडकीजवळ गेली. बाहेर पाऊस पडतच होता. थंडगार वाऱ्याने तिच्या अंगावर रोमांच उठवले. पण तिच्या मनात एक गडद सावली पसरत होती.

"माया?"

श्रेयसचा आवाज ऐकताच ती वळली. तो डोळे उघडून तिच्याकडे पाहत होता. त्याच्या नजरेत अजूनही रात्रीचं वेड स्पष्ट दिसत होतं.

"काय झालं?" तो उठून तिच्या जवळ आला.

ती काही क्षण त्याच्याकडे पहात राहिली. "श्रेयस... आपण काय करतोय?"

तो तिच्या गालावर हलकासा स्पर्श करत म्हणाला, "मी फक्त तुला माझी करतोय."

"पण आपण एकमेकांना फारसं ओळखत नाही... हे असं अचानक...?"

श्रेयसने तिच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवले. "माया, प्रत्येक गोष्ट कारणाने होत नाही. काही गोष्टी फक्त घडतात… आणि त्या थांबवायच्या नसतात."

तिच्या डोळ्यात काहीतरी चमकलं. "तुला खरंच वाटतं की आपण"

तो तिच्या ओठांवर बोट ठेवत म्हणाला, "हो, मला तुझ्या डोळ्यांत माझं प्रतिबिंब दिसतं. आणि जेव्हा तू माझ्या जवळ येतेस, तेव्हा मी स्वतःला विसरतो. तेच खरं असतं, नाही का?"

ती स्तब्ध झाली. तिला वाटलं, हे असं स्वीकारायला फार लवकर होतं… पण तसं नव्हतंही.

"श्रेयस..."

"हं?"

"मी घाबरतेय."

"कशासाठी?"

ती गप्प राहिली. तिच्या मनात अनेक विचार होते.तिचा भूतकाळ, तिच्या आयुष्यातील ती एक वेदनादायक गोष्ट, जी तिला परत मागे खेचत होती.

श्रेयसने तिची हनुवटी हलकसं वर केली. "कधी कधी भीतीवर मात करणं हेच वेड असतं, माया. आपण दोघं एकत्र वेडे होऊया का?"

ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. मग हळूच हसली आणि त्याच्या मिठीत विरून गेली.

पण तिला माहित नव्हतं की, नियती त्यांच्या प्रेमासाठी काहीतरी वेगळंच लिहून ठेवत होती…

ती रात्र त्यांच्यासाठी जादूई होती, पण पहाटेच्या वेळीही श्रेयसच्या मनात एक वेगळाच गोंधळ होता. मायाच्या डोळ्यांत काहीतरी लपलेलं होतं… एक भीती, एक गूढ सावली.
त्याच्या ऑफिसमध्ये जाताना त्याच्या मनातून तिच्या डोळ्यांतला तो भाव जात नव्हता. श्रेयसच्या सवयीप्रमाणे, जेव्हा त्याला एखादी गोष्ट समजत नसेल, तेव्हा तो तिला उलगडल्याशिवाय राहू शकत नव्हता.
त्या रात्री त्याने मायाला कॉल केला.
"काय करतेयस?" तो हलक्या आवाजात म्हणाला.


🎭 Series Post

View all