विवेक चंद्रकांत....
©® गावी आलो आहे ... दिवाळीचे चार दिवस.
तिच्या घराकडे चक्कर टाकल्याशिवाय दिवस जात नाही.
घर बंदच आहे. कोळीष्टके झालेली, धूळ मातीचा थर.
कितीतरी दिवस. महिने झाले असतील घर बंद करून.
न राहवून तिला फोन केला. घर साफ करू का दिवाळीचे?
कुलूपाची चावी आहे का कोणाकडे?
ती म्हणाली चावी शेजारीच आहे.पण काय करतो साफ करून?
आम्ही काही कोणी येणार नाही. कुलूपही गंजून गेले असेल. उघडते का नाही कोणास ठाऊक ? Light नाही. मीटर काढून टाकले आहे.
म्हटलं बघतो.,
शेजाऱ्याकडून चावी घेतली. खोबरेल तेल टाकून कुलूप उघडले.
आतमध्ये धुळीचा थर. कोळ्यांचे जाळे.
वरच्या गॅलरीत कबुतरांची घरे.
जूना ड्रेस घातला. नाकाला रुमाल, डोक्यावर टोपी.
झाडू, खराटा, चारपाच बादल्या पाणी, खराब कपडा घेतला.

फक्त पुढची खोली आणि व्हरांडा करायला दिवस लागला. शेजारी काही बोलले नाही. पण "कशाला लष्कराच्या भाकऱ्या भाजायच्या? "हा भाव नजरेत.
संध्याकाळी घरच्या दिवाळीची सजावट आटपून पुन्हा गेलो तिच्या घराकडे. विजेचे connection नव्हतेच. पण मी येतांनाच लॉरी वरून पणत्या आणि तेल घेऊन आलो होतो. पणत्यात वाती लावल्या, तेल टाकून व्हारांड्यात, जुन्या लाकडी कोनाड्यात, खिडक्यात, ओट्यावर ओळीने लावले. सारे घर पणत्यांच्या प्रकाशाने उजळून गेले. हा प्रकाश सौम्य होता. झगमगत नव्हता. पण खूप सुंदर होता. मी पायरीवर बसलो आणि शेजारच्या मुलाकडून छानसे दोनचार फोटो काढून घेतले.
तिला पाठवले.
तिचा तातडीने रिप्लाय आला.
किती छान रे. पण कशाला करत बसला हे सगळे?
आता राहिलंय का त्या घरात... गावात आमचे?
उगाचच मेहनत केली. काय मिळणार तुला?
तिचा तातडीने रिप्लाय आला.
किती छान रे. पण कशाला करत बसला हे सगळे?
आता राहिलंय का त्या घरात... गावात आमचे?
उगाचच मेहनत केली. काय मिळणार तुला?
म्हटलं.. खूप खूप समाधान.
त्या घरात किती वेळा आलोय मी.
तुझे आजोबा आणि माझे आजोबा यांचे प्रॉपर्टी वरून भांडण.
ते भांडण तूझ्या आणि माझ्या वडिलांपर्यंत गेले.
दोघे चुलतभाऊ एकमेकांचे तोंडही पाहत नव्हते.
पण लहान मुलांपर्यंत मात्र त्यांनी ते जाऊ दिले नाही.
तुझ्याकडे यायला जायला मला मज्जाव नव्हता.
कितीवेळा तुमच्याच कडे जेवलो.
आजी, काकू माझे लाड करायच्या. तुही मला सांभाळून घ्यायची.
मला घेऊन फिरायची. माझ्या आवडीचे पदार्थ बनवायची.
अगदी मातीत खेळून आल्यावर माझे हातपायही धुऊन द्यायची.
रक्षाबंधनाला तुमच्याकडे च मुक्काम असायचा माझा.
कसे विसरू ताई सगळे?
माझे अख्खे लहानपण तुझ्या आठवणीशिवाय? शक्यच नाही.

ताई... एक काम करतेस?
येतेस?
मी घर स्वच्छ करून घेतलंय.
माझ्याकडे उतर.
मला तूझ्या हातचा स्वयंपाक किती आवडतो तुला माहितेय न?
एकदाच करून घाल.
रात्री खूप साऱ्या जुन्या गप्पा मारू.
लहानपणी तू माझे झोपताना पाय चेपून द्यायची.
यावेळी मी तुझे पाय चेपून देईन.

भाऊबीज छान साजरी करू..
काय लागतं ग ओवाळून घ्यायला?
एक ताट, निरांजन, कुंकू अक्षदा..
सगळे माझ्याकडे आहे.
भावाबद्दलचे प्रेम तुझ्याकडे आहे
कितीतरी वर्षे झालीत भाऊबीजेला सोबत नाहीये.
येतेस न? नक्की ये...वाट पाहतो.
©® विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार.