वेड मन भाग -२

Apale Man Kitihi Chagale Asale Tari Etahrana Tachi Parva Naste.
"वेड मन" भाग - २

उषाताईच्या डोळ्यासमोर त्यांचा सगळा भुतकाळ उभा राहिला.

आपण काय होतो आणि ही कशी आहे.लग्न होऊन उषाताई सासरी आल्या त्याच मुळी घरात कामवाली बाई म्हणूनच.

घरात येताच उषाताईंना सासूबाईंच्या सुचना चालू झाल्या होत्या.पाया कसे पडावे ?येथूनच धडे सुरू झाले.लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सासरच्या पध्दतीने स्वयंपाक करायला सांगून सासूबाईं किरकोळ खरेदीसाठी बाहेर पडल्या.

उषाताईंना काहीच माहिती नव्हते.जमेल तसा त्यांनी स्वयंपाक केला आणि सासूबाईंच्या पाकशास्त्रात पुर्णत: उषाताई नापास झाल्या.

वरचेवर असेच प्रसंग घडत.कित्येक प्रसंगात उषाताईंना अपमानित केले जायचे. प्रत्येकवेळी त्यांच्या माहेरचा उध्दार करायची एकही संधी उषाताईच्या सासूबाईं सोडत नसत.

एकंदरीत अपमान उषाताईच्या पाचवीलाच पुजलेला होता.तक्रार तरी त्या कोणाकडे करणार?आईवडील नव्हते.आश्रितासारखे जिवन काका काकीच्या हाताखाली जगलेल्या उषाताईला, चार गोड शब्द कधीच कानी पडले नाहीत.

बिजवराचे स्थळ आले.पैसा खर्च न करताच, उषाताईचे लग्न झाले. देवाब्राम्हणाच्या साक्षीने झाले पण तेही देवळात.

पहिल्या बायकोचे दोन मुले लहानच चार वर्षांची मीरा आणि सहा वर्षांचा शेखर त्यांच्या समवेत उषाताईंचा संसार सुरू झाला.

आईविना लेकरं म्हणून उषाताईंनी त्यांना जिव लावला.कारण याच आगीत तर त्यापण होरपळून निघाल्या होत्या.

सतत कमीपणा घेत.ह्या लेकरांचे हाल होऊ नये म्हणून स्वत:हा मातृसुखापासून वंचित राहिल्या. या सावत्र मुलांचे पालनपोषण केले.

कालानत्समय् सासूबाईं निवर्तल्या. त्यांच्या आजारपणात पण उषाताईंनी सासुबाईंची खुप सेवा केली.पण फक्त सासूरवासा व्यतिरिक्त उषाताईला काहीच मिळाले नाही.

जो काही मुद्देमाल होता तो आधीच सासूबाईंनी मुलीला देवून टाकले होते.

शेवटीही उषाताई लंकेची पार्वतीच राहिल्या. नवऱ्याला म्हणजेच सुधाकररावांना सगळे दिसायचं.

पण तोही आईच्या शब्दाच्या बाहेर नव्हता.आईसमोर काहीही बोलायची त्याची हिंमत नव्हती.आलेला पगार त्याचा आईकडे सुपूर्द व्हायचा कारण आईची तशी सक्त ताकीदच होती.

सुधाकर ठरावांची आई म्हणायची, "सुधाकर हे बघ,हि सगळी माहेरची भरती करेल बर, कारण हिच्या माहेरी आहे अठराविश्वे दारिद्र्य." उषाताईच्या मनाला असे बोल लागायचे.

आतल्या आत त्या रडायच्या, तेंव्हा चिमुकला हा शेखर आपल्या इवल्याशा हाताने आईचे डोळे पुसायचा.कारण दोघांनाही तेवढेच प्रेम उषाताई देत होत्या.

मुले मोठी झाली.सासुबाईं गेल्यावर उषाताई आणि सुधाकररावात चांगले बॉंडींग झाले. आणि कुठे सुखाचा संसार सुरू झाला. मुलांचे शिक्षण कोडकौतुक यात कोठेही उषाताई नी कमतरता ठेवली नाही. मीराचे लग्न योग्य स्थळ येताच व्यवस्थित करून दिले.

दोन्हींही मुलांनी आईंच्या उपकाराची जाणिव ठेवली.त्यांनीही आईच्या प्रेमावर कधीच अविश्वास दाखवला नाही.सुधाकररावांना पण बायकोच्या प्रेमाची कदर होतीच.

दिवसेंदिवस उषाताईंचा आयुष्यात सुखाचे दिवस येऊ लागले.जावई पण चांगला मिळाला. मीराला सासर चांगले मिळाले.उषाताईंनी केलेल्या संस्कारामुळे नीताने पण सासरी नाव कमावले.

शेखरचे शिक्षण पुर्ण झाले.चांगला पदवीधर झाला. मग उषाताईं आणि सुधाकरराव शेखरच्या लग्नासाठी पाठी लागले. शेखर पण तसाच सुसंस्कारी, आई वडीलांच्या शब्दाच्या बाहेर नव्हता.

त्यालाही नात्यातल्या नात्याच मुलगी सांगुन आली. वरवर चौकशी करून ममताला सुन करून घेतली.
पुढे काय पाहूया पुढील भागात
क्रमशः

©️®️ सौ. ऊज्वला रवींद्र राहणे

🎭 Series Post

View all