Login

वेड मन भाग - १

Kahi Kahi Vastichya Auyush fakt Katch Lihile Ashat
"वेड मन" भाग - १

"शेखर चहा घेतलास कारे!"उषाताई पांघरूणातून तोंड बाहेर काढून कातरलेल्या आवाजात शेखरला म्हणजेच मुलाला विचारत होत्या.

" हो आई,मी आज लवकरच निघतोय, आॉफीसमध्येच घेईल चहा आता!"आईची नजर चुकवत शेखरने उत्तर दिले.

इकडे ममताने म्हणजेच सुनबाईंने कुस बदलत स्वतःहाच्या अंगावरची चादर व्यवस्थित केली. ती जागीच होती ती पण झोपेचे सोंग मात्र घेतले होते.

उषाताईंना हे सहन होत नव्हते आणि बोलताही येत नव्हते म्हणुनच घेतलेला निर्णयाशी त्याची धरसोड चालू होती.

बोलणार तरी कोणाला त्या? स्वतःहाच पायावर धोंडा मारून घेतला होता.आता जखम झाली म्हणून रडण्यात काय मतलब असणार.

शेखर अंघोळीला गेल्याची चाहूल लागताच पांघरूण बाजूला करून इच्छा नसतानाही उषाताई उठल्या.

बाजूलाच ठेवलेल्या काठीचा आधार घेत स्वयंपाकघरात गेल्या. चहाचे आधण ठेऊन, त्यांनी कांदा चिरुन बाजूच्या डब्यातील पोहे भिजवून फोडणीला टाकले.घरात पोह्याच्या वास दरवळत होता.

शेखरने बाथरूम मधून आवाज दिला. "आई अग राहू दे ग झोप थोडावेळ कशाला करतेस?" खाईल मी काहीतरी बाहेरच.

तर बाहेरच्या रूममधून आवाज आला. "आई पोहे करताय का? थोडे जास्तीचेच करा मी पण खाईल बरका चहा बरोबर."

उषाताईचा स्वर कातर झाला. नकळत डोळ्यात पाणी आले. मनावर दु:खद साया पसरवून गेले.त्या विचारात गुंतल्या.नक्की सासू कोण आणि सून कोण?

आजवर उषाताईने खुप सोसले होते म्हणूनच त्यांनी ठरवलं होते आपण आपल्याला सुन आली कि तिला फुलाप्रमाणे जपायचं.आपण जे भोगले ते तिच्या वाट्याला नाही येऊ द्यायचे.

पण प्रत्यक्षात वेगळेच घडले सुनबाई जोरात निघाल्या. सासूबाईंच्या मऊ स्वभावाचा त्यांनी चांगलाच फायदा उचलला. चार दिवस गोडीगुलाबीने राहिल्या आणि रंग दाखवायला सुरुवात केली.

नातेवाईकांत हसू नको म्हणुन नावाप्रमाणेच शांत असलेल्या उषाताई म्हणजेच सासुबाईं सुनबाईचे म्हणजेच ममताचे सगळे थेरं सहन करत.

खुप हौसमौज करत सुनेची. त्याची तिला किंमत नव्हती. तिने नवऱ्याला म्हणजेच शेखरला गुंडाळूनच ठेवले होते.

एवढेच काय तर हौसमौजेने उषाताईने केलेली दागिने सुनबाईंने म्हणजेच ममताने आईकडे ठेवले होते. कारण काय तर घर लहान आहे आणि चाळ सिस्टीम चोरी झाली तर?


घर लहान आहे प्रायव्हसी नाही मिळत म्हणून रात्री ममता स्वयंपाकघराचे बेडरूम बनवत आणि सकाळी रात्री चांगली झोप होत नाही म्हणून बाहेर येऊन कॉटवर खुशाल दहा दहा वाजेपर्यंत झोपत.

हिची बाहेरच्या रूममध्ये रात्र सुरू व्हायची तर उषाताईचा स्वयंपाकघरात दिवस सुरू व्हायचा.


एकदा दोनदा गोडीगुलाबीने उषाताईंनी तिला समजावून सांगितले.

"अग ममता काही,काही निमित्ताने आजूबाजूचे लोक येतात घरी, तु अशी झोपलेली चांगले दिसतं का? लवकर उठत जा सकाळी शेखरला डबा करून दे.

नंतरच मी करत जाईल. शेखरलला पण बरं वाटेल ग! तिचे त्यावर उत्तर ठरलेलं असे," शेखरला तुमच्याच हातचे आवडतं मग मी काय करू! "

तुम्हीच करा आणि किती दिवस तुम्ही करणार नंतर तर मलाच करायचे आहे ना! असे उर्मटपणे ममता उत्तर द्यायची.

यावर उषाताई तरी काय बोलणार,त्या बिचार्‍या गप्प बसत.

कारण यावर काही बोलायला जावे तर ती उगाच आवाज वाढवायची. म्हणून मग आजुबाजुला तमाशा नको म्हणून त्या शांत बसायचे. यामुळे तर ममताचे चांगलेच फावायचे.


ती मनाला येईल तेंव्हा ती माहेरी जात.शाॅपींग करत यासाठी तिला सासुबाईंच्या परवानगीची तिला गरज भासत नसत

पण ती जेंव्हा केंव्हा माहेरी जात तेंव्हा उषाताईला काय शेखरला देखील हायसे वाटायचे. शेवटी पदरी पडले आणि पवित्र झाले अशी गत होती.

आज उषाताईचे मन विषण्ण झाले. आपसूकच त्या भुतकाळातील प्रसंगाची वर्तमानकाळाशी सांगड घालू लागल्या.

काय असेल उषाताईचा भुतकाळ पाहूया पुढील भागात!..

क्रमशः
©️®️सौ. ऊज्वला रवींद्र राहणे
0

🎭 Series Post

View all