वेड मन भाग - ३

shvati Man Dekhi Khoop Vead asat Nako taya Gothicha Vichar Karat baste.
"वेड मन" - भाग ३

उषाताईला आता सासू बनायचे होते.पण सासुपण त्यांच्या रक्तातच नव्हते. फक्त प्रेमाची भाषा त्यांना समजायची.

उषाताईंनं तुझं,माझं कधीच केलच नाही म्हणूनच तर त्यांनी सावत्र मुलांना सख्ख केले आणि मुख्य म्हणजे आपली कुस उजवू दिली नव्हती.किती हा त्याग याची कल्पना मुलांना आणि नवऱ्याला याची जाणिव होती.

पण येणाऱ्या सुनेनी त्यांच्या स्वभावाची पोथी ओळखली. तसं माहेरहून येताना आईकडून शिकवणच घेऊन आली होती. ती तुझी सख्खी सासू नाही. हे आईने तिच्या मनात पुर्ण पणे बिंबवले होते.नव्याचे नऊ दिवस संपले आणि ममताने आपले रंग दाखवायला सुरूवात केली .

ममता उषाताईच्या अगदी राहणीमानापासून ते स्वयंपाकापर्यंत ती काहीतरी तरी चूक शोधायची. उषाताई सगळे सहन करायच्या.

कारण समाज काय म्हणेल, याला त्या भित होत्या.लोक सावत्र सून आहे असे बोल लावतील. असे त्याना वाटायचे.म्हणूनच शब्दांला शब्द त्या वाढवत नसत.

ममता काही अपमानास्पद बोलली तरी त्या या कानाचे त्या कानालाही कळू देत नव्हत्या.त्यामुळेच सुधाकरराव, शेखर आणि मुलगी मीरा यांना काही कळायचेच नाही.

याचाच ममता फायदा उचलत. मैत्रीणीशी बोलताना मला किती सासुरवास आहे हि माझी सावत्र सासू आहे.मी किती चांगली आहे पण सगळे पण नि परंतु याचे गुणगाण गात.

मैत्रीणी किंवा नातेवाईक घरी आल्यावर त्यांच्या समोर मानभावी पणा करत. मिच घरातले सगळे कामे करते हे दाखवत आणि सगळे श्रेय स्वतःहाकडे घेत.

उषाताईच्या सहनशक्तीचा कधी, कधी अंत होत.पण घरातलं वातावरण बिघडायला नको म्हणून त्या सहन करत.

सुधाकररावांनी खुपदा विषय काढला. उषा आपण वेगळे राहू,आता तरी स्वतःहासाठी जग.मी कायम तुझ्यावर अन्यायच करत आलो आहे.

पण उषाताईला वेगळे राहणे रूचले नाही. परत लोक काय म्हणतील? म्हातारचळ लागले वाटते यांना! शेवटी ऐके दिवशी ह्रदयविकाराच्या झटक्याचे निमित्त होऊन सुधाकररावांनी जगाचा निरोप घेतला आणि उषाताई एकट्या पडल्या.

त्यानंतर मुलगी मीरा मागे लागली आई माझ्याकडे चल राह्यला. पण जावयाच्या घरी राह्यला जाणे उषाताईंना रूचले नाही. त्यांनी शेखर बरोबर राहणे मान्य केले.ममताला मात्र आयती मोलकरीण मिळाली.पण 'आपलेच दात आपलेच ओठ' तक्रार कोणाकडे करणार.

खरच कधी कधी एखाद्याचे आयुष्य हे फक्त सुखदुःखाच्या लपंडावाने भरलेले असते. चार दिवस दु:खाचे गेले कि,सुखाचे काही दिवस येणार याची कल्पना असते. पण त्याच आशेवर तो जगत असतो.

पण समजा तेच सुख त्याच्या कधी दारी आले नाही तर,त्याची काय अवस्था होते.तो कोलमडून जातो.तशीच काही अंशी उषाताईची अवस्था झाली होती.

त्या सुधाकररावांच्या अकाली जाण्याचा दु:खाने कोलमडून गेल्या होत्या.त्याच दु:खाला छातीशी कवटाळून,शेखर सहवासात सुखाची सावली शोधत होत्या. गैर काहीच नव्हते. पण याचाच फायदा ममता उचलत.

पण जाऊ दे, शेखर तर काही बोलत नाही तो तर आपलाच आहे म्हणून सहन उषाताई सहन करत होत्या. घरातील पडेल ते काम नाही तर सगळेच घरचे काम त्या करत.

आजूबाजूचे शेजारी म्हणत उषाताई स्वतःहासाठी जगा किती दिवस हे जिणं जगणार? खुपदा आपण सासुरवास बघतो आणि अनुभवतो पण तुमच्याकडे तुम्हीतर सासूरवास पण भोगला आणि आता हा सुनवास का भोगत अहात? लोक चुकीचे बोलत नव्हते प्रत्यक्ष दिसत होते तेच तर बोलत होते.

उषाताईने खुप विचार केला आणि ठरवले,कदाचित आपली लुडबुड ममताला नको असेल,आता आपणच कोणावरही भार न होता वृध्दाश्रमाचा मार्ग स्विकारायला काय हरकत आहे? पाहूया प्रयत्न करून.

फक्त मोहमाया पासून मन अलिप्त झाले पाहिजे म्हणजे सगळे सहज शक्य आहे.

आजचा हा प्रयत्न त्याच्यासाठीच तर होता.पण मुलगा न चहा घेता ऑफिसला निघत असल्याचे त्यांच्या नजरेतून सुटले नाहीत.

नकळत त्यांची पाऊल स्वयंपाकघराकडे वळली. अंगावरच्या चादरी बरोबर
मनातलं विचार पण त्यांनी घडी घालून ठेवले.

हे सहज शक्य नाही असे त्यांना वाटले बिछाना झटकून उषाताईंनी रोजच्या कामाला सुरुवात केली. ममता मात्र साफ केलेल्या बिछान्यावर जाऊन गाढ झोपून गेली.
समाप्त
©️®️ सौ. ऊज्वला रवींद्र राहणे

🎭 Series Post

View all