आपण मागच्या भागात पाहिले की अमर सिमरनचा शो सुरू असतानाच आत जातो आणि पाहतो तर काय त्याला आश्चर्याचा धक्का बसतो. कोण होत आत नक्की निशाच होती ना? की आणखी कोण हे पाहूया.....
अमर सिमरनला बघतो आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते... त्याला समजेना काय करावे?.. कोणीतरी येत असल्याची जाणीव झाल्यावर तो लगेच लपून बसला.. तोपर्यंत निशा आणि आयेशा होत्या.. तो शो संपलाच होता... त्या दोघी शो विषयीच बोलत होत्या.. त्या जाणार इतक्यात अमर "माझ्याकडे खुणाचा नंबर आहे हे पण क्लियर करतो." असे मनात म्हणत तो सिमरन म्हणून जिचा नंबर असतो तिला फोन करतो...
तेव्हा त्याला आणखीनच धक्का बसतो कारण तो नंबर आयेशाचा असतो... फोन कोणाचा आहे हे बघण्यासाठी आयेशा फोन बघते तेव्हा त्याला कळते... आयेशा निशाला म्हणते "अगं अमरचा फोन आहे."
"मग उचल ना..." निशा.
"मी कशी उचलू... हा तर तुझ्याबरोबर म्हणजे सिमरन बरोबर बोलण्यासाठी फोन केला आहे." आयेशा.
"आण इकडे मी बोलते." असे म्हणून निशा आयेशाच्या हातातून फोन घेते.
तोच अमर फोन कट करतो... "असा काय हा? फोन करतो आणि लगेच कट पण करतो." निशा.
त्या दोघींच बोलणं अमर ऐकतो. त्याला खूपच वाईट वाटते... "माझ्या प्रेमाची यांनी मजा केली. माझ्या प्रेमाला धोका दिला... इतका अपमान..." असे मनात म्हणत तो रागाने निघून जातो.
त्या दिवसापासून तो एकदाही सिमरनला मेसेज केला नाही ना फोन करत नाही....
इकडे आयेशाला काहीच कळेना की "याला नक्की काय झालंय ते... एक फोन नाही की एक मेसेज नाही.. रोजच्या रोज मेसेज करणारा हा आज दोन दिवस झाले तरी एक मेसेज नाही? काही प्राॅब्लेम तर झाला नसेल ना? पण मग मला कसे कळणार? त्याचा पत्ता पण माहीत नाही? काय करू मी? निशूला सांगून बघते." असे ती मनात विचार करून निशूला फोन करते.
"हॅलो निशू.." आयेशा.
"बोल ना आयेशा. आता रात्री का फोन केलास? काही प्राॅब्लेम आहे का?" निशा.
"प्राॅब्लेम काही नाही ग. एक सांगायचं होत." आयेशा.
"बोल ना काय सांगायच आहे?" निशा.
"अगं तो अमर आज दोन दिवस झाले तरी एक मेसेज केला नाही. काही प्राॅब्लेम असेल का ग?" आयेशा.
"हो ग दोन दिवस झाले तू त्याच्याबद्दल काही बोलली नाहीस. मला पण वेळच नव्हता सोड खरं." निशा.
"अगं तो काहीच बोलला नाही. मग मी तुला काय सांगणार? बहुतेक कामात असेल म्हणून मी तिकडे दुर्लक्ष केल पण तो काहीच मेसेज करेना म्हणून वाटलं तुला विचारावं. तू काही बोलली आहेस का?" आयेशा.
"नाही ग मी काहीच नाही बोलले. त्याला रविवारीच सगळं सांगणार होते पण नंतर सांगू म्हणून काही बोलले नाही." निशा.
"अगं पण मी मेसेज केला तर त्यालाही काहीच रिप्लाय मिळाला नाही. मग काय समजायचे मी?" आयेशा.
"मग काही प्राॅब्लेम तर नसेल ना?" निशा.
"कदाचित असेल. कारण मी मेसेज केल्यावर तो लगेच रिप्लाय देतो तर आज दोन दिवस झाले तरी रिप्लाय मिळाला नाही. मग नक्कीच प्राॅब्लेम असणार. पण समजणार कस?" आयेशा.
"हो ग त्याचा पत्ता पण नाही." निशा.
"तू त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन बघतीस काय?" आयेशा.
"अगं आयेशा. मला खरंच वेळ नाही ग. नाहीतर मी नक्की गेले असते." निशा.
"अगं आपल्या ऑफिस जवळच आहे त्याच ऑफिस. मग काय अडचण आहे तुला जायला?" आयेशा.
"अगं मी चार दिवस ऑफिसलाच येणार नाही. मग कसं भेटणार?" निशा.
"बरं" आयेशा.
"हे बघ एक काम केल तर. तू जाऊन भेट ना त्याला. निदान काय प्राॅब्लेम आहे ते तर समजेल?" निशा.
"मी पण तो बोलेल का माझ्याशी." आयेशा.
"का नाही बोलणार? तू पण त्याची मैत्रिणच आहेस ना?" निशा.
"हो ग पण..." आयेशा.
"पण बिन काही नाही. उद्या तू अमरला भेटणार आहेस डन..." निशा.
"बरं निशा मॅडम...झोपा आता.." असे म्हणून दोघी हसायला लागतात..
आयेशाच्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले "कसे भेटायचे त्याला? मला भेटेल का तो? बोलेल का तो माझ्याशी? काही मेजर प्रॉब्लेम असेल का त्याचा? त्याला सगळं समजलं तर नसेल ना?" असे एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात येत होते.
शेवटी तिने निर्णय घेतला की उद्या नक्की त्याला भेटायला जायचे आणि मग ती झोपते.
सकाळी उठायला थोडा उशीरच होतो तिला. रात्री जागरण जे झालं होतं. उठून तिने लगेच आवरल. ती दुपारी अमरला भेटायला जाणार होती. मनात थोडी भीती आणि गडबड चालूच होती. तरी मन घट्ट करून ती अमरला भेटायला निघाली.
आयेशा फायनली अमरच्या ऑफिसमध्ये जाते. रिसेप्शनिस्टकडे अमरची चौकशी करते. तेव्हा रिसेप्शनिस्ट अमर केबिनमध्ये असल्याच सांगते.
"मला अमरला भेटायचं आहे." आयेशा.
"ओके मी सरांना सांगते." म्हणून रिसेप्शनिस्ट सरांना सांगते.
"सर बाहेर कोणीतरी तुम्हाला भेटायला आले आहे." रिसेप्शनिस्ट.
"ओके पाठवा त्यांना आत." अमर.
मग आयेशा आत येत "मे आय कम इन" म्हणते.
अमर "येस" म्हणून बघतो तर समोर आयेशा. तो काहीच बोलत नाही.
आयेशा अमरला भेटायला गेल्यावर काय घडते ते आपण पुढच्या लेखात पाहू.
आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.
*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.
©®प्रियांका पाटील.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा