आपण मागच्या भागात पाहिले की आयेशा अमरला भेटायला जाते. आता काय होणार अमर तिच्याशी काय बोलणार ते पाहू....
"हाय" आयेशा.
"......"अमर.
"काय झालं? तब्बेत बरी नाही का?" आयेशा.
"मला काय झालंय?" अमर.
"हा असा का बोलत आहे. मला तर काय बोलावे कळेना?" आयेशा मनात बोलते.
"काही काम आहे का?" अमर.
"काही नाही सहजच." आयेशा.
"चहा, काॅफी काही घेणार?" अमर.
"नाही नको" आयेशा थोडं अवघडूनच बोलत होती.
मग आयेशा जायला निघते. कारण काय बोलावे हेच तिला समजेना? त्याला काय झालंय हेच कळेना? ती जात असतानाच अमर तिला थांबवतो. तिला काहीच कळेना. ती मनातून खूपच घाबरली. "काय व्हायच ते होऊ दे."असं मनातून ठरवूनच तीन थांबली.
"बोल" आयेशा.
"असं का केलत तुम्ही? माझ्या भावनांशी खेळून तुम्हाला काय मिळालं?" अमर.
"म्हणजे? तुला काय म्हणायचंय?" अमर.
"तुला नक्कीच माहीत आहे की मला काय म्हणायचं आहे ते" अमर.
"......." आयेशा.
"काय मिळालं तुम्हाला असं करून? का मला खोटं सांगितलात? अस का केल?" अमर.
"अरे तस काहीच नाही. तू शांत हो." आयेशा.
"काय शांत हो. मला उत्तर हव आहे." अमर.
"......" आयेशा.
"मला सगळं समजलं आहे. तूच सिमरन आहेस. मग ही गोष्ट माझ्या पासून का लपवून ठेवलेत? मला का सांगितलं नाही की तूच सिमरन आहेस ते? मला उत्तर हव आहे. लवकर सांग." अमर.
"सांगते. सगळं सांगते. तुला हे सगळं सांगणारच होते रे." आयेशा.
"कधी?? बरं आता जास्त लांबड नको. काय ते लवकर बोल. मला वेळ नाही." अमर.
"ऐक मग. त्या दिवशी तू आमच्या ऑफिस मध्ये आलास. तुला बघून मी तुझ्या प्रेमातच पडले रे. मला तू खूप आवडलास पण...." आयेशा.
"पण काय? तेव्हाच खर सांगायच ना मग. तेव्हा का खोटं बोललीस?" अमर.
"अरे तू त्या दिवशी माझ्याकडे बघितलाच नाहीस रे. तुला तर निशाच सिमरन आहे असं वाटलं आणि तू तिच्याकडेच गेलास रे. मला खूप वाईट वाटलं. पहिल्यांदाच माझ्या रंगाचा मला किळस वाटला. मी का गोरी नाही असं वाटलं? अरे काय चूक झाली माझी सांग ना? माझा रंग आहे सावळा पण यात माझा काय दोष? मला एखादा हॅण्डसम मुलगा आवडू शकत नाही का? मी कोणाच्या प्रेमात पडू शकत नाही का? अरे मला पण मन आहे. मी पण मुलगी आहे. यात माझा काय दोष? तू निशा कडे गेलास म्हणून तुला तसं भासवल की निशाच सिमरन आहे. कारण आजकालच्या मुलांना सुंदर आणि देखनी मुलीच लागतात. म्हणून हे सगळं अस केलय?" आयेशा असे सगळं सांगून रडू लागते.
"मग तू का फोन करायचीस? ते पण तिलाच सांगायच ना?" अमर.
"मला तू खूप आवडलेलास. मला काही करून तुझ्याशी बोलायचं होतं. तू सांगितला होतास फोन करायला आणि माझं मन चलबिचल होत होतं तुला फोन करण्यासाठी. निशूला तर वेळच नव्हता. तिने मलाच बोल म्हणून सांगितले. मला पण तेच हव होत. म्हणून मी तुझ्याशी बोलू लागले. तसही मीच सिमरन होते मग खोटं काय यात म्हणून बोलत होते. पण तुला कसं कळाल?" आयेशा.
"त्या दिवशी हाॅटेलमध्ये तू माझ्या आवडीच ऑर्डर केलंस. निशाला तर माहित सुध्दा नव्हतं. तेव्हा पासून मी खरं खोटं करण्याच्या मागे लागलो. मला तेव्हाच वाटलं यात काही तरी गडबड आहे. मग मला कळाल की तूच सिमरन आहेस ते." अमर.
"आता तुला कळाल आहे तर मी काय बोलणार. मी तुमच्या दोघांच्या मार्गातून बाजूला जाते. निशा खूप चांगली आहे. लग्न कर तिच्याशी आणि सुखी रहा." असे म्हणून आयेशा जाणार इतक्यात अमर तिला थांबवतो.
"थांब. इतक्यात निघालीस? मी अजून काहीच बोललो नाही." असे म्हणत अमर तिच्या समोर जातो. तर तिच्या डोळ्यातून पाणी येत होते. तो आपला रूमाल तिला देतो. ती डोळ्यातील पाणी पुसते.
"बोल" असे म्हणते.
"मी लग्न तर करणारच आहे तेही सिमरनशीच." अमर.
"काय??" आयेशा.
"तुला काय वाटलं की मी रंग बघून प्रेम केलंय. नाही ग वेडे. मी तर खूप आधीपासून सिमरनच्या प्रेमात आहे. मग तिच रंग, रूप, भाषा, जात, पात काहीच मॅटर करत नाही. मी तिच्या आवाजावरून तिच्यावर प्रेम केलय. मला फक्त ती गोड आवाजाचीच सिमरन हवी आहे बस. बाकी काही नको." अमर असे म्हणताच सिमरन म्हणजेच आयेशा अमरच्या मिठीत जाते आणि अमरही तिच्या केसावरून हात फिरवत "वेडाबाई प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते." असे म्हणतो. त्या दोघांची प्रेमकहाणी सुरू होते.
बोलणं झाल्यावर आयेशा तिथून लगेच निघते कारण तिचा शो असतो. तिचा शो चालू होतो.
"नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. तर तुम्ही ऐकत आहात तुमचा आवडता शो ज्याच नाव आहे "वेड्या मना." आजच्या या संध्याकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पाऊस हा प्रत्येकाच्या अगदी जिव्हाळ्याचा, प्रेमाचा. पहिला पाऊस आणि पहिलं प्रेम दोन्ही येताना भावना या सेमच असतात. तर पहिल्या प्रेमात काय होतं तर मन धडधडातला लागतं आणि पहिला पाऊसात अंग शहारायला लागतं.
तर या पहिल्या वहिल्या प्रेमासाठी ऐका एक सुंदर गाणं...
टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात...
टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात
कधी जुनी कधी नवी संपते अंतर झोक्यात...
नंतर ही गोष्ट जेव्हा निशाला समजली तेव्हा तिलाही मैत्रीणी साठी खूप आनंद झाला.
आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.
*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.
©®प्रियांका पाटील.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा