तू वीणावती , सरस्वती
*************************************तू तानपुरा लावलास
आणि गाण्याला सुरुवात केलीस
शुभ्रवस्त्रावृता सरस्वतीचा,
नकळतच झाला भास
आणि गाण्याला सुरुवात केलीस
शुभ्रवस्त्रावृता सरस्वतीचा,
नकळतच झाला भास
तवा हातातून उमटू लागे
विणेचा मधुर झंकार
हरपून गेलो भान
प्रसन्न वदनी घेई संगीत आकार
विणेचा मधुर झंकार
हरपून गेलो भान
प्रसन्न वदनी घेई संगीत आकार
हळूहळू तव मुखातून
ओघळल्या शब्द माळा
जागून स्वप्ना मधुनी
गुंफियल्या त्या मी गळा
ओघळल्या शब्द माळा
जागून स्वप्ना मधुनी
गुंफियल्या त्या मी गळा
एक नवी तेजाची सरिता
तसाच तुझा आलाप होता
नवा प्प्राकार घडविणारा
अनोखा कलाविष्कार होता
तसाच तुझा आलाप होता
नवा प्प्राकार घडविणारा
अनोखा कलाविष्कार होता
........योगिता मिलिंद नाखरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा