Login

वेगळं रहायचय आम्हाला भाग दोन

वेगळं राहून संसार कसा चालवायचा हे कळेल

वेगळं रहायचय आम्हाला भाग दोन

मनालीला लवकरच नोकरी ही लागली.
सर्व छान चाललंय असं दिसत होतं.

मिलिंद फॅक्टरी च्या कामात लक्ष घालत होता, पण अधून मधून त्याचे नाटकाचे दौरे असत. मग तितके दिवस मनीष आणि बाबा यांच्यावर कामाचे प्रेशर असायचे .
या सगळ्यात बाबांची तब्येत साथ देत नव्हती त्यांचे बीपी ही वाढलेले असायचे.
मनीष वर कामाचा ताण वाढला की तो घरात वेळ देत नसे. मग त्याचे आणि सोनालीचे वाद होत असत
आताशा सोनाली आई जवळ बडबड करायची "भाऊजींच काही कामात लक्ष नाही त्यांना जर यात इंटरेस्ट नाही तर आधीच बोलायचं.

एकदा रात्री मिलिंद नाटकाच्या दौऱ्यावरून परत आला. खूप खूप खुश होता त्याच्या कामाचे खूप कौतुक होत होते त्याचा हा दौरा सफल झाला होता.

.सकाळी मनीष ने त्याला नवीन टेंडरच्या विषयी विचारले?
मिलिंद टेंडर भरुन पाठवलं?
“अरे बापरे मी तर साफ विसरलोच नाटकाच्या गडबडीत.”

एक मोठा कॉन्ट्रॅक्ट हातातून गेला त्यांचा खूप मोठा लॉस झाला. बाबा खूप नाराज झाले .
घरातले वातावरण बिघडत चालले होते,

मनीष ने मिलिंद ला स्पष्ट च विचारले "तुझ नेमकं काय करायचं नक्की आहे? दोन दगडांवर पाय ठेवून चालणार नाही एक काहीतरी नक्की कर.

मला अभिनय सोडता येणार नाही असे मिलिंद नेस्पष्ट सांगितले.

घरात आता एक वेगळा ताण जाणवू लागला. ताई मनालीशी आणि मिलिंद शी वरवर जरी नीट वागत असली तरी एक दुरावा सतत जाणवत असे.

घर खर्चाच नियोजन ह्या वरून ही मत वेगवेगळे होते.मिलींद ला नियमित असा पैसा मिळत नसे मनाली चा पगार नियमित असे पण त्यावर ही सोनाली ची कुरबुर असे.
"
एक दिवस आई आलेली असताना सोनाली बोलून गेली" फॅक्टरीचं सगळं काम मनीष ना च करायचे तर मग बाबांनी फॅक्टरी मनीष च्या नांवानें करावी."

मिलिंद च एक्टिंग मधलं करिअर पुढे आकार घेत होत त्याला एका मराठी मालिके करता ही ऑडिशनचे बोलावले होते .
पण घरात त्याची किंमत कोणालाच नव्हती.

एक बायको म्हणून मनाली ला त्याच कौतुक होतं .या फिल्डमध्ये नियमित असं काही नसतं कधी काम असतं कधी नाही पण मनाली चाजाॅब त्यांच्या संसाराला पुरेसा स्थैर्य देणारा होता.
आता घरात दोन भावांच्या दोन दिशा असे होऊ लागले.
सोनाली मोना शी एक बहीण म्हणून नीट वागत असली तरी मिलिंद शी तिच वागणे मोना ला पटत नसे.
मिलिंद तिचा नवरा होता आपल्या नवऱ्याची होणारी अवहेलना तिला जाणवत असे.
मनीष जीजू म्हणून त्यांच्या कर्तृत्वाचे तिला ही खूप कौतुक होते पण मिलिंद ही त्याच्या क्षेत्रात चमकत होता .

पण सोनाच्या बोलण्या वागण्यात होणारा सतत त्याच्या कामाचा अवमान तिला सहन होत नव्हता.
मोठी वहिनी म्हणून मिलिंद कधीही तसेच जाणवू देत नसत.
पण हे सगळं कुठेतरी थांबायला हवे असे मोनाला वाटायला लागले.


एक दिवस मिलिंद दौऱ्यावर गेले होते ऑफिसला हाफ डे पाहून मनाली माहेरी आई-बाबां कडे आली.
आई बाबांना खूप आनंद झाला' अरे वा --आज आलीच आहे तर राहणार की लगेच जाणार?
" राहणार बाबा मिलिंद दोन दिवस बाहेर गेलेत नाटकाच्या दौऱ्यावर.
"हं नेहमीच च ".
आईला फारसे कौतुक नाही हे तिच्या बोलण्यातून जाणवत होत.

रात्री जेवण झाल्यावर" चल आईस्क्रीम घेऊन येऊ" म्हणत बाबा
मोनालाबाहेरघेऊन गेले.
.
काय झालं आहे मनाली? काहीतरी बोलायचं आहे ना तुला दिसतय तुझ्या वागण्यातून.
" हो बाबा." पण--
" काय आहे ते बोल मोकळेपणानी"

बरेच दिवसांपासून बोलावंसं वाटतय,"बाबा मी व मिलिंद नी वेगळे राहायचं ठरवलं आहे. त्या मागची आपली अशी काही कारणआहेतच."

" हो नक्कीच बाबांनी तिच्या हातावर हात ठेवत म्हणाले सांग मोकळेपणे!"

मिलिंद चा पिंड मुळातच बिझनेस करण्याचा नाही त्याला अभिनयाची आवड आहे पण-- या क्षेत्रात निश्चित मिळकत नसली तरी आमच्या संसाराला पुरेल इतकी आहे.
त्याच्याशी लग्न करताना मला याची पुरेपूर जाणीव होती.

पण त्या घरात जीजूच्या यशोगाथे पुढे त्याची दखल घेतली जात नाही.

माझा नवरा म्हणून मला त्याची ही अवहेलना नाही पटत. आम्ही वेगळा संसार थाटला म्हणजे समाजात मिलिंद चीअशी एक वेगळी इमेज असेल.
त्या घरात राहिल्या ने आम्ही मोठ्या वृक्षा खालच झाडं होतो आहे.
" सावली तर मिळते पण वाढ खुंटते" अशी अवस्था मला नाही पटत.

वेगळ्या घरांत राहून संसार कसा चालवायचा हे कळेल. सुरवातीला अडचणी येतील पण तुम्ही सर्व आहात वेळोवेळी मार्गदर्शन करायला.
जवाबदारी आली की आर्थिक नियोजन ही कळेल.मुख्य म्हणजे मिलिंद ला त्यांच्या कामामुळे वेगळी अशी आयडेंटिटी मिळेल.

म्हणून "आम्हाला वेगळं राहायचं आहे."

"पण- तुझ्या घरच्यांना विशेषतः मिलिंद च्याबाबांना आवडणार नाही.

हळूहळू पटेल त्यांना, आणि आम्ही घर वेगळे केले तरी येणे जाणे असणार च.

".तुझ्या आईला ही पटणार नाही, पण मी समजावेन तिला. तू निश्चिंत रहा."

" वेगळे रहा पण आनंदाने रहा" एकोप्याने रहा म्हणत प्रमोद रावांनी मोना च्या वेगळं रहाण्या च्या प्रस्तावाला हसत मंजुरी दिली.
---------------------------------------------
संपूर्ण