वेल, तो आणि त्याची घाईगडबड.
दिवसभराच्या कामाच्या ताणने वैतागलेला तो, बरोबर सहा वाजेच्या ठोक्याला ऑफीसच्या बाहेर पडला. एरवी पाच वाजताच त्याच ऑफीस सुटत होत. पण आज खूपच कामाचा ताण आल्याने पाचचे कधी सहा वाजले तेच त्याला समजलं नव्हतं.
सहाची वेळ म्हणजे, सगळी ऑफीस रिकामी होण्याची वेळ. बस, ट्रेनला गर्दीच गर्दी. म्हणून तो त्याच्या बाईकने ऑफीसला येत जात होता.
पण संध्याकाळचा रस्ता म्हटला की त्यावरही घरी जाणा-यांची गर्दी आलीच. त्या गर्दीतून कशीतरी वाट काढत, ज्यांच्यामुळे ट्रॅफिक वाढते त्यांना भांडत शिव्या घालत तो एकदाचा घरी पोहचला. नेहमीच्या ठिकाणी त्याची बाईक लावून त्याने एक दिर्घ उसासा सोडला.
मग त्याच लक्ष गाडी लावलेल्या खिडकीकडे गेल. तर तिथे एक वेल तिच्याच लयीत पसरत चालली होती. जी आता त्याने बाईक लावलेल्या बाईकवर जरा विसावू पहात होती.
आधीच कामांच्या ताणाने, रस्त्यातल्या गर्दीने वैतागलेला तो. अशी न लावलेली पाहुणी बघून अजूनच चिडला. ती कसली वेल आहे? हे न बघताच त्याने तिला धरून जोरात ओढली आणि त्याच्या बाईक पासून वेगळी केली. तेव्हा कूठे त्याच्या जीवाला शांती मिळाली.
मग तो घरात गेला. आज खूपच थकल्याने तो लवकर जेवण करून झोपीही गेला. त्याची दुसऱ्या दिवसाची सकाळ त्याची आई आणि बायको यांची बडबड ऐकण्याने झाली. तो झोपलेल्या खोलीच्या खिडकीच्याजवळच त्या दोघी उभ्या राहून काहीतरी मोठमोठ्याने बडबड करत होत्या.
आज सुट्टी असल्याने उशीरा उठायचं म्हणून ताणलेला तो, त्यांच्या बडबडीने उठूनच बसला. तसच तोंडावर पाणी मारून तो घराच्या बाहेर जात त्या दोघी उभ्या असलेल्या ठिकाणी जाऊन उभा राहीला.
"काय झाल?" तो आळसावलेल्या आवाजात बोलला.
"बघ ना, कशी लोक असतात." आई "एवढी चांगली कारल्याची वेल कोणीतरी उपटुन टाकली. लोकांना चांगल बघवलच जात नाही."
मग त्याच लक्ष त्या वेलीकडे गेल आणि तिला बघतच राहीला.
"त्यांचे ना, हातच तुटले पाहीजेत." आता त्याची बायकोही सूरू झाली. तिच्यानंतर त्याची आई पण सूरू झाली.
त्यांचा चाललेला तोंडाचा पट्टा ऐकून आता ह्यालाच कसतरी होऊ लागलं. ते सहनच न झाल्याने तो शेवटी बोललाच.
"अरे हो, अस काही बोलू नये." तो आता जरा चाचरत बोलला. "एखाद्याला..."
मग त्या दोघी त्याच्याकडे रोखून बघू लागल्या.
त्या दिवसांपासून त्याला भले कारल्याची भाजी आवडत नव्हती. पण तो कारल्याचा वेल निट जगावा म्हणुन रोज देवाकडे प्रार्थना करत राहीला.
आता त्या वेलीला कारले आल्यावर पहीले त्यालाच वाढले असतील, यात शंकाच नव्हती.
घरातल्या महीलांपूढे आपली घाईगडबडही कोपर्यात बांधून ठेवावी..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा