" गौरव, हा तुझा टिफीन." समीक्षा ने डायनिंग टेबल वर तिच्या नवऱ्याचा टिफीन ठेवला.
" यशस्वी, हा तुझा टिफीन. या छोट्या टिफीन मध्ये डाळिंबाचे दाणे आहेत."
समीक्षा यशस्वी, तिची सात वर्षांची मुलगी, तिला म्हणाली.
" समीक्षा, तू आधी नाष्टा कर. तुझी कॅब येईल." गौरव म्हणाला.
"अरे पण अजून माझं आवरायचं आहे. किचन मधे." समीक्षा बोलत होती, की गौरव ने तिला हाताला पकडुन त्याच्या शेजारी नाष्टा करायला बसवलं.
सुमन ताईंना तिच्या साठी नाष्टा आणायला सांगितला.
"अरे माझ आतल आवरून व्हायचं आहे. आणि नाष्टा," ती बोलण्याचा प्रयत्न करत होती. की गौरव ने त्याच्या ताटातील एक घास तिच्या तोंडात भरवला.
" आता आधी खाऊन घे. मला माहीत आहे. आता प्रमोशन मुळे काम वाढलं आहे. पण त्यासाठी तब्येती कडे दुर्लक्ष करायची गरज नाही."
इतक्यात सुमन ताईंनी गरम पराठा आणि लोणचं ताटात वाढून आणलं.
" ताई आधी नाष्टा करा. मी आहे आज. सगळी काम करून जाईल."
त्यांचं प्रेम बघुन भारावली होती. तिने नाष्टा करायला सुरवात केली. समीक्षा आणि गौरव यांच्या लग्नाला दहा वर्ष झाली होती. त्यांना सात वर्षांची मुलगी होती. समिक्षाचे सासू सासरे गावाकडे राहतं होते. हे तिघ घरात रहात.
यशस्वी पाच वर्षांची होई पर्यंत ती एक गृहिणी होती. त्या आधी ती एका एम एन सी मधे नोकरीला होती. नंतर मुलीच संगोपन करण्यासाठी तिने ब्रेक घेतला होता.
यशस्वी तीन वर्षांची झाल्यावर शाळेत जाऊ लागली. त्या वेळी तिची शाळा तीन तास असायची. त्यावेळी त्यावेळी तिने कॉम्प्युटरचा अडवान्स कोर्स केला. आधी नोकरी करण्याचा पाच वर्षांचा अनुभव आणि गेल्या दोन वर्षांत केलेला अडवान्स कोर्स यामुळे तिला नोकरी मिळाली होती. तिच्या परफॉर्मन्स मुळे तिला प्रमोशन मिळाले होते.
यशस्वी देखील दिवस भर शाळेत जात. नंतर तिचे ॲक्टिव्हिटी क्लास यामुळे ती देखील दिवस भर बिझी झाली होती. समिक्षा ने तिची नोकरी पुन्हा सूरू केली. सुमन ताईं तिच्या कडे वर काम आणि स्वयंपाक या कामाला येत.
संध्याकाळी यशस्वी घरी आल्यावर तिला सांभाळण्याची जबाबदारी त्यांचीच होती. समीक्षा संध्याकाळी सहा वाजता यायची. यशस्वी ची शाळा सकाळीं नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत असायची. तिला बसने यायला चार वाजत. त्यावेळी सुमन ताई तिची काळजी घेत.
" सुमन ताई पराठा छान झाला आहे." समीक्षा म्हणाली.
तिन तिचा नाष्टा संपवला. तो पर्यंत गौरव ने तिचा फोन बाजुला करून ठेवला होता. नाष्टा करून गौरव यशस्वीला बस मध्ये बसवून निघून गेला. तिची कॅब आली होती. सुमन ताईंना कामाच्या सूचना देऊन ती पण निघाली.
मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे ट्रॅफिक जॅम झालं होतं. ती लॅपटॉप उघडुन काम करत होती. इतक्यात तिच्या आईचा फोन आला.
" हॅलो आई."
" समीक्षा कशी आहेस.? नवीन काम कस सुरू आहे.?"
" मी मस्त. नवीन काम पण छान सुरू आहे. आता प्रमोशन मिळाले आहे ना! त्यामुळे वर्क लोड वाढला आहे."
" बर वाटल ऐकून. बर ऐक ना, मी तुला का फोन केला आहे? "
" बोल ग आई, काय झालं. आज पुन्हा तुझ आणि बाबांच भांडणं झालं का?"
" ए गप ग आगावू. भांडणं नाही. मी त्यांना फक्त ओरडले."
" आता काय केलं बाबांनी ?"
" सकाळीं ते फिरायला जातात ना, तर मी त्यांना भाजी आणायला सांगितली. तर त्यांनी मेथी आणली आहे."
" अग चांगलचं झालं की.मग काय झालं ?"
" अग आज मला भिशी मंडळ सोबत काशीकर काकूंच्या कडे जायचं आहे. आता हि भाजी निवडून नाही ठेवली तर खराब होईल. माझा किती वेळ वाया जातो. भाजी स्वच्छ करण्यात , यांना माझ्या वेळेची किंमतच नाही. मला जायला उशीर होणार आहे ग. फक्त नी फक्त यांच्या मुळेच."
" बर. हे सांगायला तू फोन केला आहेस ?."
" नाही ग. मी तुला.." आई अडखळली.
" आठवल्यावर सांग." तिने मस्करी केली.
" मी विसराळू नाही."आई चिडून म्हणाली.
" हो ग तू विसराळू नाही. बर मला सांग मीनल ताईच्या लग्नाची तयारी कशी चालु आहे." समीक्षा ने विषय बदलला.
" हो चालु आहे. तेच तुला सांगायचं होत. अग काका काकू पुढच्या आठवड्यात पुण्याला येणार आहेत. तर काल ते घरी आले होते."
" मग?"
तिला समजेना आई अस का सांगत आहे. आईचा आवज का बदलला ?
" तर ते दोघ घरी आले होते. तेव्हा ते म्हणाले मीनल च्या लग्नाची शॉपिंग मुंबईला करायची आहे. चांगली व्हरायटी मिळेल. तर आपले बाबा म्हणाले,
" मुंबईला जात आहात ना तर समिक्षाच्या घरी राहा.ती तुम्हाला चांगली शॉपिंग करून देईल."
मी काही बोलायच्या अगोदर तुझे बाबा त्यांना परस्पर सांगून मोकळे झाले."
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा