वेळेच गणित
क्षणांत बदलतं
कधी सुख तर
कधी दुःख आणतं
वेदनांवर फुंकर
घालतो वेळ
खेळू नये कधी
वेळेशी खेळ
घालतो वेळ
खेळू नये कधी
वेळेशी खेळ
करून देतो काळ
वेळेची जाणीव
भरून नाही निघत
गेलेल्या वेळेची उणीव
वेळेची जाणीव
भरून नाही निघत
गेलेल्या वेळेची उणीव
भरता पापाचा
तुडुंब घडा
वेळ शिकवतो
चांगला धडा
तुडुंब घडा
वेळ शिकवतो
चांगला धडा
वेळच देतो भरता
न येणारी जखम
वेळच लावतो
त्यावर मलम
न येणारी जखम
वेळच लावतो
त्यावर मलम
वेळेत करा काम
मिळेल चांगला दाम
वेळ निघून जाता
जपावे लागे हरीनाम
मिळेल चांगला दाम
वेळ निघून जाता
जपावे लागे हरीनाम
वेळेची करावी
सदा कदर
तरच वेळ करेल
तुमचा आदर
सदा कदर
तरच वेळ करेल
तुमचा आदर
जो करेल वेळेची
खूप किंमत
संकटाशी सामना
करेल त्याची हिम्मत
खूप किंमत
संकटाशी सामना
करेल त्याची हिम्मत
वेळ सगळ्यांची
सारखी नसते
आज वाईट तर
उद्या चांगली असते
सारखी नसते
आज वाईट तर
उद्या चांगली असते
वेळ माणसाला
बनवतो फितूर
तरीही त्याची वाट
पाहे तो होऊन आतूर
बनवतो फितूर
तरीही त्याची वाट
पाहे तो होऊन आतूर
©️ जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा