वेळेच्या काठावर भाग - २
मुंबई, उंच इमारती, धावणारी माणसं, आणि सतत भुर्रकन उडून जाणारा वेळ. सामायरा आता शहरातल्या प्रसिद्ध विज्ञान संस्थेत शिकत होती. ती घाबरलीसुद्धा होती आणि उत्साहातही होती.
इथे आल्यापासून तिची वेळ थांबवण्याची क्षमता स्वतःहून सक्रिय होत होती. बस पकडताना…क्लासमध्ये तणाव वाढला की…कधी कधी तर झोपेतून उठल्यावर खोलीत एक विचित्र शांतता असे, जणू हवेतले सूक्ष्म कणसुद्धा हलत नव्हते.
ती स्वतःला विचारू लागली, “मी ही शक्ती नियंत्रित करू शकते का? की एक दिवस ती माझ्यावरच नियंत्रण ठेवेल?”
ती भीतीने कोसळली नाही. तीने ठरवलं, याचा अभ्यास करायचा. प्रयोग करायचे. जसा वेळेवर संशोधन करायचा तीने ठरवलं होतं, तसंच आता स्वतःवरही.
एका संध्याकाळी तिची संस्था एका सामाजिक उपक्रमात भाग घेत होती. संपूर्ण टीम एका कम्युनिटी सायन्स फेअरमध्ये जाणार होती, जिथे लहान मुलांसाठी रोबोटिक्स, ब्रेन-मॉडेल्स, आणि शैक्षणिक डेमो होते.
हॉल भरलेला, मुले आनंदाने पळत होती, लोक फोटोज घेत होते. तेवढ्यात हॉलच्या मागच्या बाजूचा एक स्टेज दिवा कडकडला आणि तिथून छताचा एक जड भाग हळूहळू ढासळायला लागला.
खाली एक मुलांचा गट उभा होता. कोणी लक्षच दिलं नाही. सामायराच्या डोळ्यांसमोर काही सेकंदात दृश्य तयार झालं, हे असं पडलं तर जखमा होतील. कोणाला काही झालं तर?
तिचं हृदय जोरात धडधडलं आणि जणू तिच्या मनाने आदेश दिला…सगळं मंदावलं, आवाज दाबले गेले.
तिच्या सभोवतालचं जग हळू होऊ लागलं.
तिच्या सभोवतालचं जग हळू होऊ लागलं.
ती त्या मंदावलेल्या क्षणात पुढे धावली. तिच्याभोवतीचे मुलं जवळजवळ थांबलेल्या स्थितीत होती, हसण्याची हालचाल, हातातील फुगे, सगळंच हळू. छताचा मोठा तुकडा अगदी हळूहळू खाली येत होता.
सामायरा एका मुलाला हाताखाली घेत काढते…दुसऱ्याला बाजूला ढकलते…तिला माहित होतं, ही वेळ जास्त नसणार. तिची शक्ती कायम टिकत नाही.
तिने शेवटचं मूल बाहेर ओढलं आणि अचानक तिच्या आसपासचा विश्व पुन्हा जलद झालं. वेळ सामान्य वेगात परतला.
धडाम्म्म्म!!! त्या क्षणात छताचा तुकडा जमिनीवर कोसळला, पण मुलं वाचली होती.
सगळे किंचाळले, लोक घाबरले, मुलं पळाली…
पण कुणालाही कळलं नाही, ही एक मुलगी एकटी वेळेच्या विरुद्ध धावून त्यांना वाचवून गेली होती.
पण कुणालाही कळलं नाही, ही एक मुलगी एकटी वेळेच्या विरुद्ध धावून त्यांना वाचवून गेली होती.
कार्यक्रमानंतर तिच्या शेजारी उभा होता तिचा सहाध्यायी, रोनित, खूप शांत आणि निरीक्षक स्वभावाचा.
तो म्हणाला, “तू मुलांना आधीच का काढून नेलं? तुला कसं कळलं ते पडणार आहे?”
सामायरा अडखळली. “मी… मला जाणवलं फक्त.”
रोनित हसला नाही…पण त्याच्या डोळ्यात शंका चमकली. तो म्हणाला, “तू वेगळी आहेस. मी ते दिवसेंदिवस पाहतोय.”
पहिल्यांदाच कोणीतरी तिच्याजवळच्या सत्याच्या इतक्या जवळ आलं होतं. ती घाबरली.
त्या रात्री ती खूप विचारांत पडली, मी ही शक्ती कायम लपवू का? की तिला उपयोगी जागी वापरू? किंवा विज्ञानात याचा अभ्यास करून उत्तर शोधू?
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा