शीर्षक :- वेळीच आलेले शहाणपण (भाग १)
जलद लेखन स्पर्धा, नोव्हेंबर २०२५
विषय : दुरून डोंगर साजरे.
विषय : दुरून डोंगर साजरे.
किती छान नशीब आहे साक्षीचे..! मस्त गोव्याच्या बीचवर छान छान फोटो काढलेत.मेघाने साक्षीचे म्हणजेच तिच्या खास मैत्रिणीचे फोटो पाहिले आणि कौतुकाने मनातल्या मनात म्हणाली. नाहीतर मी... बसलेय घरातली कामे करत.
अरे वा... हिने बऱ्याच दिवसांनी स्टेटसला फोटो ठेवलेय,असे स्वतःलाच सांगत मेघा तिचे एकेक फोटो पाहू लागली.मेघा बाहेरून शांत दिसत असली तरी मनात नकळत तुलना चालू झालेली तिच्यादेखील लक्षात आले नाहीच. एकाच क्लासमध्ये होतो आम्ही.पोरीने नशीब काढले. नवरा भरपूर श्रीमंत दिसतोय. आता अजूनच सुरेख दिसतेय.माझे जरा वजन कमी करावे लागेल. म्हणजे मी देखील पूर्वीसारखी थोडी तरी सुंदर दिसेल. असे अनेक विचार तिच्या मनात सतत चालू होते.
मेघाचा दिवसातील असा बराच वेळ दुसऱ्यांचे स्टेटस पाहणे, त्यांना छान, भारी अशा कमेंट करणे आणि नकळत त्यांच्याशी स्वतःची तुलना करणे ह्यातच जात असे.
मेघा एक उच्चशिक्षित स्त्री. मेघाचा नवरा, अमोल एका खाजगी कंपनीत उच्च पदावर कार्यरत असल्या कारणाने मेघाची आर्थिक परिस्थितीत चांगलीच होती.तिला सहा वर्षाचा एकुलता एक लेक, अनय. मेघाने लग्न झाल्यानंतरही गरोदरपणापर्यंत नोकरी केली. पण आर्थिक परिस्थिती चांगली असल्याकारणाने, तिने स्वतःहूनच आपल्या मुलावर चांगले संस्कार व्हावे म्हणून काही वर्ष नोकरीतून ब्रेक घेतला होता.
मेघा एक उत्तम गृहिणी म्हणून वावरत होती. सकाळी लवकर उठून घरातले सर्व कामे करून मुलाला शाळेत सोडवल्यानंतर तिला बराचसा वेळ रिकामा मिळत असे. पण इथेच तिचा थोडासा ताळमेळ चुकत होता कारण हा रिकामा वेळ ती फक्त व्हाट्सअप आणि फेसबुक बघण्यात अक्षरशः वाया घालवत होती. त्यात आपल्या मैत्रिणींचे स्टेटस बघून, अनोळखी लोकांचे रील्स पाहून, अगदी ठरवून नाही पण तिच्याही नकळत ती स्वतःची तुलना त्यांच्यासोबत करू लागली होती.
पूर्वी कधी कधी युट्युब वर पाहून चांगल्या रेसिपी बनवत होती. स्वतः सुगरण असलेल्या तिला आपल्या कुटुंबाला,नातेवाईकांना नवनवीन पदार्थ बनवून खाऊ घालायला फार आवडत असे. तिला गार्डनिंगचीही आवड होती. तिच्या बाल्कनीमध्ये अनेक प्रकारची झाडे तिने लावली होती. वरवर पाहिले तर तिचे आयुष्य खूप आनंदी आणि सुखी वाटत होते. पण तरीही अनेक दिवसांपासून काहीतरी तिला कमी जाणवत असे.तिच्या चेहऱ्यावर सतत चिंता दिसत असे.
प्रेमळ नवरा, हुशार मुलगा असे असताना आणि आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे जगता येत असूनही मेघाला अतिविचार करण्याची सवय लागली होती. काम करताना उत्साह वाटत नसे. तिची सर्व कामे ती यंत्रवत करत होती. कधी कधी उगाच चिडचिड होत असे,थकवा जाणवत होता तर कधी स्वतःचाच राग राग करत असे.
नेहमी भरभरून जगणाऱ्या मेघाला, असे बघून अमोल म्हणजेच तिचा नवराही विचारात पडला होता.कधी भाजीत मीठच विसरेल,कधी मुलावर समजून न सांगता उगीचच चिडणे, असे तिचे चालू होते.
एकदा रात्री अमोलने मेघाला विचारलं,
"काय ग मेघा एवढ काय बिनसले आहे? सतत काहीतरी विचार करत असते. बरं नसेल तर तसं सांग आपण डॉक्टर कडे जाऊन येऊ."
"काय ग मेघा एवढ काय बिनसले आहे? सतत काहीतरी विचार करत असते. बरं नसेल तर तसं सांग आपण डॉक्टर कडे जाऊन येऊ."
"का? काय झालेय माझे काही चुकले का?"
मेघाने आपल्या झोपलेल्या मुलाकडे पाहत विचारलं.
मेघाने आपल्या झोपलेल्या मुलाकडे पाहत विचारलं.
"अग, आज तू अनयला फटके दिलेत. इतका कसला राग आला तुला.केवळ अभ्यास करत नाही म्हणून इतक्या लहान मुलाला मारणे योग्य आहे??" अमोल ने जरा रागातच विचारले.
"तसं काही नाही. मला समजत नाही मला काय होतंय माझी फार चिडचिड होते.अनयसुद्धा त्यानंतर सतत किरकिर करत होता".मेघानेही मुसमूसत उत्तर दिले.
मग मनातल्या मनातच तिचा संवाद सुरु झाला.बघना अचानक वजन वाढायला लागले. असं वाटतं माझ्याबरोबरच्या माझ्या मैत्रिणी किती पुढे गेल्या आणि मी काय करते घरात बसून.
विचार करतच मेघा म्हणाली,"तुम्ही तर नेहमीच कामात व्यस्त असतात. आपला अनयही हुशार आहे. मला समजत नाहीये मला कसली चिंता सतावतेय."
मेघाचे बोलणे ऐकून समजावणीच्या स्वरात अमोल म्हणाले, "हे बघ तुला नोकरी करायची असेल तर तू करू शकतेस. नोकरीच्या सवयीमुळे तुला घरी बसण्याची सवय नाही म्हणून असे होत असेल कदाचित. तू घरीच बस असेही माझे म्हणणे नाही. फक्त काही दिवस थांब.पण आनंदी राहण्याचा प्रयत्न कर,कारण एक आई आनंदी असली ना तर तिचं मूलही आनंदीत राहतं आणि परिणामी संपूर्ण कुटुंब आनंदी राहत असते."
वरवर हसत तिने होकार दर्शवला असला तरी आता पुन्हा ती विचारात अडकली उगीचच मारले माझ्या लाडक्या अनयला. फार वाईट आई आहे मी... आता हे अतिविचार करण्याने पुन्हा तिची झोप उडाली. माझ्या मैत्रिणी नोकरी करून मुलांना छान सांभाळून घेतात.कालच मधुने तिच्या मुलाचा किती छान व्हिडिओ टाकला नाहीतर मी...विचार करता करता ती कधीतरी झोपी गेली.
क्रमश:
©️®️ प्राजक्ता कुलथे.
©️®️ प्राजक्ता कुलथे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा