Login

अतिलघुकथा-३५

आवड
अतिलघुकथा -३५

तिची नृत्यकला शिकण्याची इच्छा राहूनच गेली होती.

मोठ्या माणसांचे जास्त वय असूनही त्यांचे नृत्य करतानाचे व्हिडिओ पाहत असताना तिचे डोळे,त्याला वेगळेच भासले.

मुलीच्या नावासोबतच बायकोचे नावही नृत्यवर्गात प्रवेशासाठी पाहणारी पहिलीच व्यक्ती पाहून ती शिकवणारी महिला आ वासून त्याच्याकडे पाहत होती.

अलककार © विद्या कुंभार.

🎭 Series Post

View all