अतिलघुकथा (१३)
फुकट खातो म्हणून त्याला रात्रंदिवस टोमणे ऐकावे लागायचे.
अपमानाचे घोट पचवून मिळेल ते काम केल्यावर हातात दमडी पडल्यावर त्याला समाधान मात्र मिळत नव्हते.
रात्रंदिवस मेहनत करून मिळेल तसा अभ्यास करून त्याने अपयशाची वाट मागे सोडली होती कारण आताच्या कामात त्याला मोठे दाम तर मिळत होते पण सोबतच पांढरपेशा नोकरदार म्हणवणाऱ्या नामवंताच्या यादीत उच्चस्थान प्राप्त झाले होते.
अलककार:- © विद्या कुंभार
सर्व लेखनाचे हक्क माझ्याकडे राखीव आहेत. त्यामुळे युटूब किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून कथा चोरण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कारवाई करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा