अतिलघुकथा -२३
"का रे तू असा वागलास ?" ती रडत होती.
"कारण हे तुझे नि माझे नाही सर्व देशवासीयांचे घर आहे. मी तर दिलेले वचन पूर्ण करतोय गं. " असे म्हणून शत्रूंची गोळी अंगावर झेलल्याने त्याचा श्वास थांबला.
अजून एका मुलाला देशाचे रक्षण करताना शहीद झालेले पाहून ती धरणीमाता हळहळली पण आपल्या पुत्राचा तिला अभिमानही वाटला.
अलककार © विद्या कुंभार
सदर साहित्याचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा