Login

अतिलघुकथा-३३

भूतकाळ
अतिलघुकथा-३३

रस्त्यावर मदतीचा हात मिळण्यासाठी ती गयावया करत असताना,तिच्या दयनीय अवस्थेकडे पाहून वाटसरू त्याकडे दुर्लक्ष करत होते.

निराधार मुलींसाठी आश्रम बांधल्यावर,उद्‌घाटन सोहळ्यात तिचा परिचय दिल्यानंतर,जोरदार टाळ्यांच्या आवाजाने ती भूतकाळातून बाहेर आली.

अलककार © विद्या कुंभार

सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.


🎭 Series Post

View all