अतिलघुकथा (११)
ऑफिसमध्ये सर्वजण एकमेकांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू म्हणून काय द्यायचे,ह्याचे नियोजन करत असताना त्याचा चेहरा मात्र निर्विकार होता.
त्याने हातावर पोट असलेल्या बाजूच्या इमारतीच्या कामगारांना बोलावून त्यांना काहीतरी दिले.
तिथून निघताना आपल्या कुटुंबासाठी चांगले आशीर्वाद घेवून तो घरी परतला.
अलककार:- © विद्या कुंभार
सर्व लेखनाचे हक्क माझ्याकडे राखीव आहेत. त्यामुळे युटूब किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून कथा चोरण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कारवाई करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा