Login

अतिलघुकथा -२७

पाझर!
अतिलघुकथा-२७

हवामान खात्याने ऋतुचक्र बदलण्याचे कारण दिले आणि शेतातच बसून जगाचा पोशिंदा रडू लागला.

धरणीने त्याचे अश्रू आपल्या पोटात गोळा करत असतानाच एक मोठा आवाज झाला.

अचानक तो परतून आला होता; त्याला पाझर फुटल्याने तो अविरत कोसळत होता.

अलककार: © विद्या कुंभार

सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.