Login

अतिलघुकथा-५०

लिपस्टिक आणि ती!
अतिलघुकथा- ५०

कालचे दुःख चेहऱ्यावर दिसू नये म्हणून ती तयार होत असताना लिपस्टिक ओठांवर लावत होती कारण ऑफिसला कामासाठी
जावेच लागणार होते.

त्याने ते पाहिले आणि रागात थोबाडीत देत म्हंटला, " तुझे वय काय तरूण मुलगी एवढे आहे का अशी नटून थटून कामाला जातेस?"

घरच्यांच्या विरुद्ध जावून त्याच्याशी लग्न करून तिने सुख शोधण्याच्या प्रयत्नात फक्त तिच्या वाट्याला अश्रूचं आले होते.

© विद्या कुंभार

🎭 Series Post

View all