Login

तो,छत्री आणि ती

आधार
अतिलघुकथा- ५२

छत्री हातात घेऊन रागावलेल्या तिला तो शोधत होता; पाऊस रिमझिम बरसत होता आणि सहजच ती नजरेस पडली. त्याने मागून छत्री तिच्या डोक्यावर धरली.

"मघाशी झालेल्या भांडणात असाच आधार दिला असतास तर मला घराबाहेर पडायची गरजच लागली नसती." डोळ्यांतून अश्रू वाहत गालावर ओघळताना ती ते न पुसताच म्हणाली.

आई आणि बायकोच्या भांडणात अडकलेला तो फक्त तिच्या खांद्यावर हात ठेवून दिलासा देण्याचे काम करत होता.

© विद्या कुंभार

सदर साहित्याचे हक्क हे लेखिकेकडे राखीव आहेत.

फोटो सौजन्य साभार गुगल

🎭 Series Post

View all