अतिलघुकथा- ५३
संध्याकाळी मंद हवा वाहत असताना खिडकीत बसून ती जवळ आलेल्या चिमण्या बघत होती.
घड्याळाचा काटा पुढे सरकत होता आणि आठवणी मनात येत होत्या.
"तेव्हाच सावध झाली असती तर आज मला ह्या चिमण्यांसारखे एकत्र कुटुंब सोडावे लागले नसते." असे म्हणून वाफाळलेल्या चहासोबत ती दुःखाचा घोट पचवत होती.
© विद्या कुंभार
फोटो सौजन्य:साभार गुगल
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा