अतिलघुकथा (५)
“बाबा, मला ना तुम्ही सुंदर परीसारखे तयार करा कारण आज शाळेत वेशभूषा स्पर्धा आहे.” ती काही कपडे दाखवत म्हणाली.
“हे घे हातात शस्त्र.” बाबा तिला तयार करून झाल्यावर म्हणाले.
गोंधळलेल्या लेकीकडे पाहून त्यांनी तिला सर्वांसमोर उभे राहिल्यावर काय बोलायचे ते सांगितले, “देवीच्या हातात शस्त्र आणि लढण्याची तयारी असेल तरच ती स्वतःचे आणि इतरांचे रक्षण करू शकते.”
अलककार: © विद्या कुंभार
सर्व लेखनाचे हक्क माझ्याकडे राखीव आहेत. त्यामुळे युटूब किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून कथा चोरण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कारवाई करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा