अतिलघुकथा (६)
तो हात धुण्यासाठी पाणी जास्तच वापरत होता; ते पाहून तिने त्याला जपून वापरण्याचा सल्ला दिला परंतु दुसऱ्या दिवशीही काहीच फरक पडला नाही.
तिने त्याच्या बँकेच्या खात्यातून पैसे खर्च केले आणि ते त्याला समजले.
“अगं, पैसे आहेत म्हणून कसाही वापर करू नकोस ते साठवून ठेवायला शिक जरा.”
त्याचा राग शांत झालेला पाहून म्हणाली,“तसेच पाण्याचा अतिवापरही तू टाळायला हवा.”
अलककार: © विद्या कुंभार
सर्व लेखनाचे हक्क माझ्याकडे राखीव आहेत. त्यामुळे युटूब किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून कथा चोरण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कारवाई करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा