अतिलघुकथा (९)
कामाचा ताण आणि भविष्याचा विचार ह्याने तो त्रस्त झालेला म्हणून वेगवेगळे मानसोपचारतज्ज्ञ आणि राहण्याची जागा बदलूनही त्याला कुठेच मनःशांती मिळत नव्हती.
एकदा आईची तब्येत बिघडली म्हणून तो गावी गेला आणि सहजच त्याने लहानपणी जसे आईच्या मांडीवर डोके ठेवले तसे पुन्हा ठेवले.
त्याच्या डोक्यावर तिचा हात फिरला आणि खूप वर्षांनी तो शांतपणे गाढ झोपी गेला होता.
अलककार: © विद्या कुंभार
सर्व लेखनाचे हक्क माझ्याकडे राखीव आहेत. त्यामुळे युटूब किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून कथा चोरण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कारवाई करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा