Login

विभक्त ४३

In this part mihir and sayli reached to the village for diwali vacation

विभक्त ४३

क्रमश : भाग ४२

मिहीर आणि रवी सकाळी ऑफिस ला आले कि पहिले कॅन्टीन ला भेटायचे . इकडच्या तिकडच्या गप्पा , अपडेट्स आणि मस्त कॉफी हे त्यांचे रुटीन होते . मिहीर रोज प्रमाणे कॉफी घेत रवी शी बोलत होता इतक्यात रवीचे लक्ष मिहीर च्या हाताकडे गेले .

रवी " अरे .. काय रे तुझ्या हाताला काय झाले .. हे कसले ओरखडे आहेत ?"

मिहीर एखाद्या स्त्री ने लाजावे तसा मनात लाजला . प्रेमाची खूण  असे मनात म्हणत  होता .

मिहीर " अरे .. काही नाही रे काल आमच्या घरात एक वाइल्ड कॅट घुसली होती .. तिला बाहेर घालवत होतो तर तिने मलाच पंजा मारला "

रवी " अरे त्याचे सेफ्टीक वगैरे होईल काय ? इंजेकशन घेऊन ये "

मिहीर " हो .. का .. बघतो "

दुपारी थोडा वेळ मिळाळ्यावर मिहीर ने  ऑफिस मधून मिताली ला कॉल केला

मिहीर " हाय ,

मिताली " हॅलो .. मिहीर .. "

मिहीर " मी काय म्हणत  होतो .. मी तुला मेसेज करतो  तो नीट बघून घे .... त्या मध्ये एका इन्स्टिट्यूट ची इन्फॉर्मशन आणि कोर्स  ची डिटेल्स आहेत .. सध्या हा एक कोर्स केलास ना तर तुला नक्की लगेच चांगला जॉब मिळेल . "

मिताली " थँक्स मिहीर .. पण मला मुलांमुळे सध्या शिकायला जाता  नाही येणार "

मिहीर " अग तो पार्ट टाइम कोर्स आहे .. तू एक तास जरी रोज काढलास ना तर सहा महिन्यात कोर्स होऊन जाईल तुझा .. एकदा बघून तर घे . "

मिताली " ठीक आहे तू पाठव डिटेल्स मी बघून घेईन "

मिहीर " ठीक आहे .. लगेच पाठवतो .. आणि एक त्या इन्स्टिटयूट शी आमच्या ऑफिस चे टाय अप आहे तर त्या तुन जर ऍडमिशन झाले ना तर फक्त एक्साम फीस भरावी लागते .. त्यामुळे  काही टेन्शन नको घेऊस "

मिताली " थँक्स .. काय बोलू सुचत नाहीये .. "

मिहीर " ठीक आहे .. चल बाय .. मग मला कळव तुझे काय म्हणणे आहे ते "

मिताली " थँक यु .. "

मिताली ने ते सगळे डिटेल्स वाचले.. राज शाळेत गेल्यावर ती त्यातला एक कोर्स करू शकत होती .. तिला हि हे पटले . तिने मिहीर ला सांगून टाकले कि ठीक आहे .. आय विल डू   दयाट . "

मिताली तयार झाली .. असा मेसेज त्याने सायलीला पाठवला

सायली " ग्रेट ..थँक यु .. आणि किस वाला स्माईली तिने मिहीर ला पाठवला .

सायली ने त्या ट्रेनी अमितला बोलवून त्याला पैसे देऊन मिताली च्या नावाने ऍडमिशन करायला लावले . तिने त्याला मितालीचा फोन नंबर दिला आणि त्याला सांगितली हा तुला मी दिलेला टास्क आहे हे तिला कळता  कामा नये . तिला लगेच कॉल कर इन्स्टिट्यूट ला भेटायला बोलावं आणि ऍडमिशन करून ये .. आणि हे काम २ दिवसात झाले पाहिजे .

झाले इकडे सायलीने मितालीला कोर्स ला ऍडमिशन घेऊन दिले आणि मिताली चा  अभ्यास दिवाळी नंतर सुरु होणार होता . 

बोल बोलता दिवाळी ४ दिवसांवर आली . मिहीर ला  मस्त १० दिवस शाळे सारखी सुट्टी . मिताली ला कशी बशी ३ दिवस सुट्टी मिळत होती .. मग तिने ऍडिशनल अजून ३ दिवस वाढवून रजा टाकून ठेवली होती . शिवाय वेळ आली तर शेवटचे दोन तीन दिवस ती वर्क फ्रॉम होम करून मिहीरच्या सुट्टीही हिची सुट्टी मॅच करून घेतली

गावा  वरून तात्या सारखे फोन करून विचारत होते .. कधी येणार ते ?

मिहीर आणि सायलीने  घरातल्यांसाठी शॉपिंग केली .

या वेळी सायलीने तिच्या साठी रेडिमेड नऊवारी साड्या घेऊन ठेवल्या  . यावेळी तिला नेसायची वेळ आली तर पार्लर वाली नव्हती ना .. म्हणून .

तर आज मिहीर आणि सायली दिवाळीच्या सुट्टी साठी गावी जाणार होते . सायलीने तिच्या साड्यांची बॅग काढली . तिकडे घरात सुद्धा तिला साडीच घालावी लागत असे मग काय बघायलाच नको .  १० दिवसांचे पॅकिंग करता करता नाके नऊ आली होती तिला . सायलीचा अवतार चेंज झाला . मॅडम साडी घालून हातात हिरव्या  बांगड्या , गळ्यात , कानात , पायात घालून तयार .

मिहीर ने पण त्याची शेरवाणी , ट्रॅडिशनल वेअर , सगळे घेतले .. आणि दोघे विमल ताईंना बोनस आणि साडी देऊन गावाला निघाले .

सायली ला आता गावाला जाताना कसे जावे हे सांगायला लागत नव्हते . तिची ती न सांगता तिच्यात बदल करून जायची .

दोघे मस्त खुशीत गावी आले . मिहीर तर गावाला जायचे म्हणजे एकदम खुश असायचा हल्ली . त्यात दिवाळी म्हणजे काय बघायलाच नको . त्यात या दोघांची पहिली दिवाळी होती .

मिहीर ची गाडी बघताच .. सागर बाहेर धावतच आला .. काका आला .. काकी आली .. आणि पहिला आधी सायलीकडे गेला .. सायलीने त्याला उचलून घेतले .. मग लगेच मिहीर कडे गेला .

सगळ्यांनीच त्यांचे स्वागत केले .. लता वाहिनी , लीला बाई पण बाहेर आल्या .. शिशिर बॅगा काढायला उचलायला मदत करू लागला . यावेळी जरा सामान जास्त होते ना ..

तात्यां चा पण आनंद झळकत होता त्यांच्या चेहऱ्यावरून . घरातले सगळे मेंबर घरात असले कि घर कसे आनंदाने भरून  जाते ना .. त्यात दिवाळी सण म्हणजे काय बघायलाच नको .

सायलीने पण तिचा सुट्टी मोड ऑन केला होता . घरात आल्यावर लगेच फ्रेश होऊन चक्क किचन मध्ये गेली . लता वहिनींनी चहा केला तो ट्रे मध्ये भरून सगळ्यांना  चहा अंगणात घेऊन आली .

मिहीर  मनात म्हणू लागला .. आयला मला तिकडे एक कप कॉफी कधी मिळाली तर नशीब इकडे बघ आल्यावर लगेच सर्वांना चहा देते कशी  ? जागा बदल्यावर तिच्यात होणार बदल बघून मिहीर ला खूप मज्जा यायची . त्याला असे वाटायचे कि आता हिचे गाल हातात धरून ओढावे . पण तात्यांना बघून गप्प बसायचा बिचारा .

मिहीर ला चहा देताना मिहीर ला एक डोळा मारून आत गेली .. "अग ए..  "असे तो बोललाच पण गप्प बसला .

आता मध्ये लीला बाई आणि वाहिनी बरोबर  तिला जमतील ती कामं करायची ती . तसे तर त्या दोघींना पण तिच्याकडून फारशी अपेक्षा नसायची पण तिला सगळे माहित होयला  पाहिजे . थोड्या दिवसांनी करायची वेळ आली तर करता आले पाहिजे असे आपले लीला बाईंचे मत होते .

घरात दिवाळीच्या पदार्थांचा घम घमाट .

लीला बाईंनी सायली ला सांगितले तुझ्या साठी आम्ही काही पदार्थ करायचे ठेवलेत . तर आपण ते उद्या पासून करू . नीट बघशील तर तुला हळू हळू येईल . "ठीक आहे " असे सायली हसून बोलली . पण मनातून विचार करूनच तिला घाम फुटला  होता  ..

मिहीर आलाय म्हटल्यावर गावातले मिहीर चे मित्र लगेच त्याला भेटायला यायचे . " चल रे जाऊ .. चल रे कट्टयावर बसून गप्पा मारू . "

पण मिहीर चा पाय घरातून निघायचा नाही . सायलीला मी घरात नसलो तर जमेल का ? तिला काही हवे असेल तर ती बाकी कोणाकडे तशी मागायची नाही ? उगाच तिची अडचण नको होयला .. या अशा  सगळ्या विचारांमुळे हल्ली मिहीर गावाला आला कि घरातून बाहेरच पडायचा नाही . अगदीच तात्यांनी सांगितले तर हा जायचा .

मिहीर चा मित्र आला म्हणून त्याला चहा पाणी घेऊन सायली बाहेर आली .

मिहीर ने आपली तिची फॉर्मल ओळख करून दिली हा " दीपेश "

सायलीने त्याला आणि मिहीर ला चहा दिला .. आणि त्याला म्हणाली " हाय दीपेश "

आणि तिथेच असलेली खुर्ची मिहीर जवळ ओढली आणि त्याच्या शेजारी गप्प्पा मारत बसली . नॉर्मली शहरात जर कोण घरात आले तर आपण पण बोलायला थांबतो ना तसेच तिला वाटले आपण पण इथे बसायला पाहिजे होते .

मिहीर ला तिला तू आत गेलीस तरी चालेल असे पण बोलता येईना ..

त्या दीपेश ला काही सुचे ना हि याची बायको इकडे का गप्पा मरायला बसली ..

शिवाय  त्या दिनेश समोर ती एक दोनदा .. अरे .. मिहीर .. असे एकेरी हाक मारून गप्पा मारू लागली .

दीपेश सायलीला म्हणतोय .. मिहीर ला पाठवा आमच्यात .. ती हल्ली येत  नाही कट्टयावर .. "

मिहीर " अरे .. तसे नाही रे .. मागच्या वेळी मी खूप गडबडीत आलो होतो .. आणि या वेळी चांगली १० दिवस सुट्टी काढून आलोय .. उद्या नक्की येतो .. आज जरा काम आहे

सायली " ठीक आहे .. चालू द्या तुमच्या गप्पा .. मी आत जाते " आणि गेली निघून

बऱ्याच वेळाने तो दीपेश गेला तसा  मिहीर आता आला आणि सायलीला शोधू  लागला. तर सायली किचन मध्ये होती .. तिला सासूबाईंनी चकल्या पडायला बसवली होती . आणि सायली हे असले काम पहिल्यांदाच करत होती तर ती इतके मन लावून करत होती तिला कसले भानच नव्हते . आला किचन मध्ये आला तर ती व्यवस्थित बसली नव्हती .. तशीही तिला साडीची सवय नाही त्यात असल्या कामाची  तर नाहीच नाही .. ती ज्या  पद्धतीने बसली होती ते चित्रच मिहीर ला आवडले नाही .

तसे कोणी पुरुष मंडळी किचन मध्ये जातच नसत .

मिहीर " सायली .. जरा इकडे येतेस का ? "

सायली " थांब रे ... हे बघ माझे हात .. दोन्ही पिठात आहेत .. हे बघ मिहीर ह्या सगळ्या चकल्या मी केल्यात .. कशा आल्यात .. बोलता बोलता पहिल्यांदा केलेल्या कामाचा उत्साह तिच्या चेहऱ्यावर दिसत होता . पण या वेळेला मिहीरला तिचा जाम राग येत होता .  काय पोरगी आहे .. त्या मित्र असताना तिकडे बसायची काय गरज होती .. त्याच्या समोर नावाने हाक मारायची काय गरज होती .. आणि आता काम करतेय तर स्वतःच्या कपडे सांभाळायचे पण भान नाही  . आणि सगळ्यां समोर सारखे मिहीर मिहीर करत बसते .. त्याला जाम राग  येत होता आता ."

मिहीर " सायली , अग .. इकडे तर बघ ना .. "

सायलीने त्याच्या  कडे बघितले तर त्याने तिला खुणावून सांगितले कि नीट बस .

तर समोरच सासूबाई बसल्या होत्या तिने त्यांना सांगितले " आई .. हा पदर नीट करा हो "

लीला बाई " मिहीर .. तुझे किचेन मध्ये काय काम आहे .. तू जा बघू बाहेर "

मिहीर " काही नाही ग .. सायलीला जरा पाठव ना .. माझे काम आहे तिच्याकडे .. तिच्या ऑफिस च्या सरांचा कॉल  येतोय तिच्या मोबाइल वर "

लीला बाई " जा .. ग काय म्हणतोय ते बघून ये "

शेवटी सायली उठली आणि हात धुवून आली त्यांच्या रुम मध्ये गेली

सायली " काय ? झालंय ?चीड चीड का करतोयस "

मिहीर " अग .. तू अशी का वागतेस ? तुला कळत नाही का ? काम करताना तुझी साडी कुठे जातेय ते ? आता घरात किती माणसे आहेत ? मगाशी त्या दीपेश समोर पण गप्पा मारत बसायची काय गरज होती तुला ?"

सायली " जाऊ दे चल मी.. मी पंजाबी ड्रेसच घालते ना .. मला तरी काय साडी ची हौस अजिबात नाहीये "

मिहीर " उगाच वेड्या सारखे बोलू नकोस .. इकडे आलोय तर जरा रहा ना व्यवस्थित "

सायली " हेच मला तुला सांगायचंय ? डू यु अशेमेड ऑफ मी ? लाज वाटते का मी बायको आहे त्याची ?"

मिहीर " कुठचा विषय कुठे नेतेस ? आणि बोलायला  लागलीस ना कि काय पण बोलतेस ? हे गाव  आहे ..तिकडे पण राहतो ना तुला पाहिजे तसे ?"

सायली " सो .. माझ्यावर उपकार आहेत का ते .. तिकडे  तसे राहतो ते का तुझा कॉम्प्रोमाइज आहे ?"

मिहीर " तुला कळतच नाहीये मी काय बोलतोय ते .. "

सायली " हो खरच  नाही कळत आहे ..  कि तू तोच मिहीर आहेस ना.. या पेक्षा तुला मी काय करायला पाहिजे इकडे ते स्पष्ठ सांग आणि विषय संपव ना .. बाकीचे कशाला बोलतोस .. इकडचे आणि तिकडचे कशाला काढतोस ?

मिहीर " मी तेच सांगतोय कि जरा कपड्यांकडे लक्ष दे आणि इकडे मित्रांशी बोलत बसली नाहीस तरी चालेल . आणि बाहेरचे कोणी असले तर माझ्याशी नाही बोललीस  तरी चालेल "

सायली " ठीक आहे .. थँक यु .. फॉर एव्हरीथिंग दयात यु कॉम्प्रोमाईझ फॉर मी आणि सॉरी फॉर युअर  डीसकंफर्ट बिकॉज ऑफ मी " बोलता बोलता तिच्या डोळ्यातला  एक अश्रू ओघळलाच.

आणि सायलीने अजून दहा पिना तिला जिकडे लावता येतील तिकडे लावल्या आणि मग गेली किचन मध्ये .

0

🎭 Series Post

View all