विभक्त भाग ४५
क्रमश : भाग ४४
सायली मनात विचार करू लागली तरी पण त्यात एवढे चिडायचे कशाला ? एवढे मोठे प्लांनिंग आम्ही दोघे डिस्कस करून ठरवतो तर हे काय फालतू या कारणांसाठी मनशांती घालवायची कशाला माझी पण आणि स्वतःची पण . मला तर वाटतंय त्याचा हार्मोनल इम्बॅलन्स झालाय कि काय आणि मनात हसू लागली .
ठीक आहे रिस्पेक्ट पाहिजे का साहेबांना ?आता बघतेच रेस्पेक्टने
सायली आली रूम मध्ये ..तर हा लॅपटॉप वर काहीतरी टाईमपास करत होता .
सायली मनात म्हणतेय " गाल बघा कसे टोमॅटो सारखे लाल झालेत आणि टम्म फुगलेत . मगाशी बुलेट वरून आला तर कसला हँडसम दिसत होता .. काय करू याच्याशी मुद्दामून अबोला धरू का त्याला छळायला ? नको यार .. असे नको त्याच्याशी न बोलून मला पण नाही करमणार .
मिहीर ती रूम मध्ये आली तरी तिच्याकडे लक्ष पण देत नव्हता .
सायली पण आली आणि बेड वर झोपली ..
सायली " अहो .. ते जरा लाईट बंद करता का ? माझ्या डोळ्यावर उजेड येतोय .. मला झोप आलीय "
मिहीर ने लाईट बंद केला .. त्याच्या एक मिनिट लक्षात पण आले नाही कि हिने त्याला अहो असे म्हणालीय .. आणि मग साहेबांची ट्यूब पेटली .
मिहीर ने लाईट लावला तर सायली चादरीत तोंड घुसवून हसत होती.
सायली " चादरीच्या आतूनच , अहो .. काय हे सांगितले ना .. लाईट बंद करा "
झाली मिहीर ची बॅटरी चार्ज झाली ..
मिहीर आणि गाणे म्हणून लागला " रात अकेली है .. आके मेरे पास .. कानोमे मेरे .. जो भी चाहे काहीये .. "
सायली ला चक्क “अहो” म्हणताना जाम लाज वाटत होती ..
सायली " नको हो .. मला झोप येत आहे .. तुम्ही जरा लाईट बंद करा आणि झोपा बघू "
मिहीर " थांब आता तुला बघतोच .. "
शेवटी सायलीने तिचे तोंड त्याला दाखवले .इतकि लाज वाटत होती तिला .. त्याला अहो बोलायला तिच्या चेहऱ्याकडे बघूनच कळत होते "
सायली " कसला आहेस रे तू .. चिडका कांदा नुसता ? हे एवढंच होते तर हळूच कानात सांगितले असतेस तर मी काय ऐकले नसते का ?" आय मिन अहो तुम्ही मला सांगितलं नाहीत .. आणि पुन्हा दोघे हसायला लागले ..
मिहीर " ग .. या गावातल्या लोकांचे बारीक लक्ष सुनांवर असते . तुझ्या मागे तुला कोणी नावं ठेवू नये ह्याच्या साठी माझी तळमळ .. बाकी काही नाही तू आई समोर पण कशी बसली होतीस मगाशी .. सांगायला जातोय तर लक्ष पण देत नव्हतीस .. वरती मी खुणेने का सांगितले कि आईला नको कळायला कि मी काय बोलतेय ते.. तर तू तिलाच सांगितलेस कि साडी ठीक करा .. म्हणून माझी चीड चीड होत होती.
सायली " ठीक आहे यार एवढे पण अगदीच साडी विस्कटली नव्हती ..आणि खरच त्या चकलीच्या नादात नाही लक्षात आले . अरे मला त्या एवढे ट्रेनिंग देतायत आणि मी तुझ्याकडे तरी कसे बघू .. तू माझ्या ट्रेनिंग पिरियड मध्ये कशाला आलास मग ?" कंपनीत मिटिंग चालू असली तर आपण बोलतो का एकमेकांशी "
मिहीर " आयला शेवटी सगळं झाले कि चूक माझीच आणि मीच सॉरी म्हणायचे "
सायली हसायला लागते .. "मी कुठे म्हणतेय तू मला सॉरी म्हण "
मिहीर " मग काय हे रामायण कशाला माझा सत्कार करायला लावलेस का ?"
सायली " अरे... देवा .. म्हणजे अजून रामाची सीता कोण आहेच ? "
मिहीर " काय बोलतेस ते कळत नाहीये "
सायली " तुझी चिडचिड का होतेय सांगू ?"
मिहीर " बोल आता .. मला वाटतंय मीच सासुरवाडीला आलोय "
सायली पुन्हा हसू लागते .. " चिडलास ना किती छान दिसतोयस आत्ता सांगू.. आणि त्याचे केस विस्कटते
सायली " यु आर कॉम्परिंग युअरसेल्फ विथ अथर्सं "
मिहीर " ए गप ए असे काहीही नाहीये "
सायली " हो तसेच आहे .. तुला आता नाही कळणार .. पण नंतर कळेल "
मिहीर " तूच सांग कि तुझे तरी नक्की काय म्हणणं आहे "
सायली " मी अहो म्हटले काय आणि अरे म्हटले काय मी सायलीच आहे आणि माझे प्रेम तसेच राहणार आहे . हे बघ जशी मी इकडे आल्यावर मला जमत नसताना सुद्धा साडी नेसते तर मला तुला अहो म्हणायला काय प्रॉब्लेम आहे ... नक्कीच काही नाही .. पण त्या गोष्टीकडे माझे लक्षच नव्हते . मी तुला चहा दिल्यावर डोळा मारला बघ .. ते काय उगाच नाही .. म्हणजे मी चहा ट्रे मध्ये आणून सर्वांना दिलाय हि पण गोष्ट मी आऊट ऑफ ट्रॅक केली च होती ना .. तर मला वाटले कि आता मला आईंना आणि लता वहिनींना इम्प्रेस करायला पाहिजे म्हणून माझे फुल कॉन्सन्ट्रेशन मी किचन मध्ये लावले होते ."
मिहीर " बघ .. आता मला सॉरी बोलायला लावणारच तू " मला असे चिन्ह दिसतंय कि मी मॅच हरयला लागलोय "
आणि दोघे हसायला लागतात .
सायली " अजून बरेच आहे .. पण आज तुला एवढेच पुरेसे आहे रामायण .. "
मिहीर " त्याही पेक्षा माझी चीड चीड होण्याचे कारण मला थोडे कळलंय .. मी सांगू का ?"
सायली " काय ?"
मिहीर " मला आता संयम नाही पाळायचाय आणि पाळावा लागतोय हे कारण असावे बहुदा "
सायली " अहो .. लाईट बंद करता का .. मला सकाळी लवकर उठायचंय "
मिहीर " विषय बदलू नकोस ना .. आता थांबवूया का हे सेपरेशन "
सायली " मला थोडा वेळ दे.. आता आधी हे दिवाळी प्रकरण संपू तर दे मग तो मुद्दा विचारात घेण्यात येईल "
मिहीर " अरे .. डिसकंस तर करून ठेव .. तुझं काय म्हणणे आहे "
मिहीर " खरं सांगू का ?तुला त्या हॉट ड्रेस मध्ये पहिले ना तेव्हाच मला वाटत होते ... पण तू शुद्धीत नव्हतीस .. "
सायली " ठीक आहे ज्या दिवशी आपण बॅक टू सिटी होऊ तेव्हा चालेल का ?"
मिहीर " ठीक आहे .. चल उद्याच जाऊ सिटी मध्ये "
सायली " अरे .. १० दिवसांची सुट्टी घेऊन आलोय ना आपण .. ते आपला पहिला दिवाळी सण आहे ना "
मिहीर " हो मग येऊ परत अजून दिवाळीला २ दिवस आहेत ."
सायली " बघ बाबा .. तात्या काय म्हणतील ?"
मिहीर " तू मला तात्यांची भीती नको घालूस "
सायली " काय होतंय चिडायला वाक्या गणिक "
मिहीर " सांगितले तर तुला काय होतंय "
मिहीर " बरं चल सॉरी फॉर टुडेझ बिहेविअर "
सायली " प्लिज नको .. मला काय मॅच जिंकण्याची नाहीये .... मला तू खुश हवा आहेस ..... आणि शेवटी तीच उठून लाईट्स घालवते ..
दुसऱ्या दिवशी सकाळी सायली लवकर उठून आवरून तयार झाली . किचन मध्ये छोटं छोटं काम करत होती . मग लीला बाईंनी अंगण साफ करून दिले आणि तिला म्हणाल्या रांगोळी काढता येत असली तर काढू शकतेस . नाहीतर लता काढेलच . सायलीने एक शोभा मुळे रांगोळीचा क्लास केला होता त्यामुळे येत होती . ती म्हणाली मी try करतेय नाहीच जमली तर पुसून लता वाहिनी काढतील दुसरी . तिने लगेच यु ट्यूब वर दोन तीन डिझाइन बघून त्यातल्या त्यात सोपी रांगोळी बघून काढली . छान रंग भरून रांगोळी तयार . लिलाबाईंना आणि लता ला तिची रांगोळी खूप आवडली .
थोड्याच वेळात मिहीर मस्त आरामात उठला आणि बाहेर अंगणात येऊन बसला .. त्याला सायलीच्या रंगीळीची तारीफ ऐकायला आली म्हणून तर उठला तो .
मिहीर " अरे वाह .. छन रांगोळी काढलीस .. त्याने लगेच तिचा रंगोली काढताना च फोटो काढला .. रांगोळीचे फोटो काढले .
तेवढ्यात तात्या आले " काय मिहीर .. झाली का झोप ..अरे दादा बरोबर कधी तरी शेतावर जात जा .. तो बघ सकाळीच उठून गेलाय . तिकडे काय काम करायचंय का ? नुसतं आपले बसायचे म्हणजे मजूर लोक काम करतात व्यवस्थित . तू आज आवरून जा .. म्हणजे शिशिर ला सुट्टी मिळेल कधीतरी .
मिहीर " ऐका ना तात्या .. माझे एक काम राहिलंय सिटी मध्ये अजून दिवाळीला एक दिवस आहे तर मी आता जाऊन उद्या आलो तर चालेल का ?"
तात्या " आता कुठे जातोस .. असे काय एवढं राहिलय .. येताना करूनच यायचस ना .. "
सायली तिकडून आत पळाली .
मिहीर " हो .. ना ते राहिलंच .. "
तात्या " गाढव आहेस नुसता .. तुला तसेही शेतावर जायला आवडत नाही म्हणून काहीतरी काम काढतोस का ?"
मिहीर " नाही हो .. मी जाईन कि .. आल्यावर जाईन आता १० दिवस आहेच ना"
तात्या " ठीक आहे मग जा "
मिहीर ने तात्यांकडून परमिशन मिळवली ..
लीला बाई " मग तू कधी येशील..?
मिहीर " हे काय आज गेलो कि उद्या दुपारी येईन "
लीलाबाई " मग .. ठीक आहे .. मग सायलीला इकडेच राहू दे . आज आम्ही शंकरपाळ्या करणार आहोत "
मिहीर " उद्या करा कि ?त्यात काय ?
लीला बाई " तुझ्या कामासाठी तिची कशाला ओढाताण करतोस .. एक दिवस राहील ती आम्ही आहोतच कि आणि .. आज त्या मेहंदी वालीला पण बोलावलंय "
मिहीर " ठीक आहे "
मिहीर पुन्हा रूम मध्ये आला .. तर सायली जाम हसत होती त्याला .
सायली " मग .. काय मिहीर साहेब .. तुमचे राहिलेले काम येताना नाही का करायचेत .."
मिहीर " तुला तर आता .. एकदा बघणारच आहे मी .. "
सायली " जा आवरून शेतावर जा .. मी तुला आज डबा घेऊन येते "
मिहीर " च्यायला .. सगळे माझ्या लागलेत .. "
सायली ने मिहीर च्या कानात काहीतरी सांगितले
मिहीर " नक्की का ? बघ हा कन्फर्म "
सायली " हो.. "
मिहीर " ठीक आहे .. आणि सायलीच्या गालावर किस करून आवरायला गेला "
चला सध्या सिटी मध्ये जायचा विषय कॅन्सल करून मिहीर शेतावर गेला .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा