Login

विभक्त भाग ४६

In this part sayli cooks meal for mihir ani take him to farm

विभक्त भाग ४६

क्रमश : भाग ४५

( वाचनकांना वाट बघावी लागली त्याबद्दल क्षमस्व!)

मिहीर ने नाश्ता केला आणि आवरून शेतावर गेला . शेतावर  शिशिर दादा बसलेलाच होता . त्यांच्या शेतात १०० एक मजूर काम करत  होते .त्यांच्या शेत घराला रंग कामाचे काम चालू होते कारण दर दिवाळीत ते सर्वजण इकडे या घरात एक रात्र झोपायला येत असत . मग एरवी तात्या , शिशिर , आणि त्यांचा एक घर गडी होता . तो घर गडी सगळीकडे लक्ष  ठेवायचं आणि घराची साफ सफाई पण करायचा .

मिहीर आज बहुदा १० वर्षांनंतर शेतावर आला असेल . आधी शिक्षण आणि नंतर लगेच नोकरी त्यामुळे  गावात जास्त राहिलाच नव्हता . नाही म्हणायला असा दिवाळीत एक रात्र राहायला दर वर्षी यायचा .

मिहीर ला शेतावर आलेलं बघून शिशिर दादांना आश्यर्य वाटले .

शशीर " अरे .. मिहीर आज इकडे कुठे वाट चुकलास ?"

मिहीर " काय करू तात्यांनी मला पाठवले .. मला म्हणाले दादा ला एक दिवस पण सुट्टी नसते .. तू गेलास तर त्याला सुट्टी मिळेल . "

शिशिर " हो का ? बर झाले आलास .. चल एक राऊंड मारून येऊ शेतात .. "

दोघे त्यांच्याच शेतात फिरू लागले .. मध्ये मध्ये मजूर लोक " राम राम .. दादा .. कसे आहे दादा ?.. खूप दिवसांनी मिहीर दादांना बघितले .. काही काही लोक तर तात्यांच्या वयाचे  होते त्यांनी तर मिहीर या शेतात खेळताना पहिले होते .. शिशिर आणि मिहीर दोघे गप्पा मारत त्यांच्या लहान पणात गेले .. शेतातले  खेळ , लपाछपी , झाडावर चढणे , दगडी मारून कैऱ्या पाडणे .. एकदा मिहीर ने मारलेला दगड शिशिर च्या डोक्याला लागला होता आणि त्याला २ टाके पडले होते . मग तो किती घाबरला होता .. त्याला वाटले कि तात्या आता आपल्याला बेदम मारतील पण तोच एवढा घाबरला होता कि त्याला तात्यांनि एक मिठी मारली होती आणि त्याला म्हणाले होते " घाबरू नकोस बाळा .. दादाला आपण दवाखान्यात नेले कि सगळे ठीक होईल .. मिहीर नुसता घामाने भिजला होता .. त्याला आता कडक उन्हात फिरायची सवयच राहिली नव्हती .  चालत ते एका मोठ्या आंब्याच्या झाडाखाली बसले . खूप मोठे झाड होते आणि त्याची सावली पण खूप मोठी होती . त्या झाडाच्या फांद्यांना तिथल्या मजूर लोकांनी साड्या .. कापड बांधून त्याचे झोपाळे  केले होते . मग त्यांच्या लहान मुलांना त्यात झोपायला आणि खेळायला ते होयचे . .. बरीच लहान मुलं आजू बाजूला अनवाणी पायाने इकडून तिकडे चालत होती .. मातीत खेळत .. आई आणि वडील दोघेही इथेच काम करीत असत मग जी मुले शेतात  जात नाहीत ते कुठे जाणार तर तिकडेच दिवसभर खेळत बसायचे आपले  .

मिहीर " दादा तु जातोयस ना .. आज हाल्फ डे तरी सुट्टी घे .. "

शिशिर " नको .. रे .. तू आलास तर बसतो तुझ्या बरोबर .. आणि त्या झाडाखाली ते दोघे गप्पा मारत  उभे होते .

तेवढ्यात एक काळ्या मूर्ती इतक काळे मूल तिकडे दगडात खेळात होते .. त्याच्याही पायात चपला नव्हत्या .. खाली दगड , माती धोंडे होते .. नुकताच चालायला लागलेला कृष्ण कसा छान दिसतो तसेच पण हा विठ्ठल होता .

मिहीर  " दादा .. हि लहान मुले का आहेत इथे ?"अरे हे बघ त्याच्या पायात चपला पण नाहीयेत .. लागू शकते त्याला ?"

शिशिर " अरे आता करणार ? दोघे आई बाबा काम करतात मग पोरांना कुठे ठेवणार .. मग पोरे आपले असेच इकडे तिकडे हुंदडत असतात "

मिहीर " आपण यांच्या साठी काहीतरी करू शकतो का ? "

शिशिर " काय करायचे ? आपला व्यापच इतका मोठा आहे बाकी काही करायला वेळच नाही . ते बघ आता दिवाळीत सर्वांना कपडे वाटायचेत , मिठाई वाटायचीय .. "

मिहीर " हो ते तर आपण दर वर्षीच करतो नाही का ?"

मग मधेच शिशिर दादा म्हणाला मी गावात जाऊ येतो तू आहेस ना इथे ? मग आपण दोघे जेवायला घरी जाऊ ?"

मिहीर " नाही .. आज सायली आपल्याला डबा घेऊन येणार आहे ? तू पण इथेच ये .. तिघे एकत्र जेवू "

शिशिर " ओहो .. अच्छा तर असे प्लालिंग आहे काय ?" मी जातो मग .. तुमच्या दोघात माझे काय काम ? "

मिहीर " तसे  काही नाही .. तिला पण अजून शेत दाखवलेच नव्हते .. तर ती म्हणाली मी डबा करून आणते .. "

शिशिर " अरे तुला सांगून ठेवतो .. सायली माझी लहान बहीण आहे ..जर माझ्या बहिणीला त्रास दिलास ना तर याद राख .. काल  तू तिला जेवताना टोमणा का मारलास ?"

मिहीर " अरे .. टोमणा नाही काय ? तिला काहीच येत नाही ? मी खरं तेच बोललो "

शिशीर " अरे .. हे असे चार चोघात बायकोला मान खाली घालायला लावू नये .. तिला काय येत ते सांगावे त्या पेक्षा ?"

मिहीर " अरे अशीच गंमत केली तिची .. आणि शिकली जेवण तर माझा फायदाच  आहे ना

अशा गप्पा मारतोय मिहीर पण त्याला ते मुलं त्याच्या  आजू बाजूला वावरतंय त्याच्याकडे बघून वाईट वाटत होतं .. बिचारा .. मातीचे हात तोंडात घालतोय .. मातीत बसतोय .. तहे चित्र त्याला बघवत नव्हते .

शिशिर चल मी जातो काय ? मग सायली कशी येईल ..

मिहीर "ती बुलेट घेऊन येईल असे म्हणालीय .. तिला रस्ता माहितेय कारण मी तिला मागे इकडून दोनदा तीनदा नेली होती ".

शिशिर " मग मला जायला पाहिजे .. बुलेट माझ्याकडे आहे "

मिहीर " मग तू पण ये ना तिच्या बरोबरच .. "

शिशिर " नको चालू द्या तुमचे .. शेत घरातली वरची खोली व्यवस्थित आहे .. तुम्ही तिकडे बसू शकता ?"

मिहीर " हो .. ठीक आहे "

सायलीने मिहीर ला सांगितले होते कि ती त्याच्या साठी डबा घेऊन येईल स्वतः  जेवण करून .  आली कि आता तिला बघतोच .. असे मनात विचार करत तो शेत घरात तिची वाट बघत बसला होता .

सायली ने आज लता वहिनींना सांगितले कि आज आपण भाकरी करूया आणि आज मला भाजी पण शिकवा .. म्हणजे मी तुम्ही सांगाल तशी करेन

सायलीने लता सांगेल तसे करत करत वांग्याचे भरीत केले .. दोन भाकऱ्या केल्या .. मग भात आणि वरण पण केले .

सायली ला आज स्वतःवर विश्वास बसत नव्हता कि तिने आज जेवण केले होते .  शिशिर दादा मुद्दामून घरी आले त्यांना सायलीला बुलेट दयायची होती .

लीला बाई " शिशिर तू एकटाच आलास जेवायला .. मिहीर नाही आला का ? त्याला कशाला एकट्याला ठेवलास त्याला  जमणार नाही ते काम"

शिशिर " अग हो .. तोच स्वतःहून थम्बलाय .. सायली जाणार आहे आज त्याला डबा घेऊन शेतावर असे त्यांनी दोघांनी ठरवलंय .. मी थांबून काय करू तिकडे "

लीला बाई " हो .. का ? तरीच सायली आज  किचन मध्ये  एवढा वेळ .. मग कशी जाईल ती ..

शिशिर " ती म्हणतेय ती बुलेट वर जाणार आहे "

लीला बाई " अरे देवा .. हि पोरं पण ना .. आता साडीवर गाडी कशी चालवणार ?"

शिशिर " तू सांग तिला आज पाहिजे तर जीन्स घाल म्हणून "

तेवढ्यात सायली नऊवारी  साडी घालून बाहेर आली ..

लीला बाई " अगो बाई .. हे काय ? "

सायली " काही नाही .. मी जरा शेतावर जातेय तर गोल साडीत च्या ऐवजी हि साडी नसते .. लग्नात नाही का मी नऊवारी  वर बुलेट चालवली होती "

लीलाबाई " पण तुला नेसता आली "

सायली " नाही .. हि साडी रेडिमेड साडी आहे .. पॅन्ट सारखी घालायची .. "

लीला बाई " हुशार आहेस .. "

शिशिर " सायली , मध्ये मध्ये खड्डे आहेत काय ? जरा सावकाश च जा "

सायली  डबा आणि पाणी घेऊन हेल्मेट घालून .. नऊवारी साडी नेसून शेतावर जायला निघाली .. कधी एकदा मिहीर ला तिने केलेले जेवण ती त्याला भरवेल असे  तिला झालेले .. या सगळी गडबडीत ती तिचा मोबाईल घरी विसरली .. आता मिहीर  कसा बदला  घेईल या विचारांनीच तिच्या शरीरात रोमांच येत होता .. आता तो काही मला सोडणार नाही .. अशा विचारात मनात मिलनाची आस घेऊन ती त्यांच्या शेतावर जात होती .

सायली शेतावर आली .. तिकडेच एका झाडाखाली गाडी पार्क करून मॅडम मोठ्या ऐटीत आणि नजाकत मध्ये शेत घराकडे आली ..

तर खालीच त्यांच्या गडी धावत आला " नमस्कार .. ताई .. "

सायली " नमस्कार .. मिहीर दादा कुठे आहेत ?"

गडी " मिहीर दादा मगाशी अर्ध्या तासा  पूर्वीच गेलेत "

सायली तिचा मोबाईल चेक करू लागली .. तिच्या लक्षात आले कि आपण मोबाइल घरातच विसरलो आहोत ..

सायली " माझ्या साठी काही निरोप ठेवलाय का ?"

गडी " नाही "

सायली " तुमच्या कडे मोबाईल आहे का ?"

गडी " आहे पण फक्त कॉल उचलता येतो त्याच्या वरून कॉल करता येत नाही .. बसा  ना ताई .. मी तुमच्या साठी पाणी आणतो "

सायली " नाही नको .. मी पाणी आणलय . आणि त्या खुर्चीत बाहेरच बसली "

गडी " आत निघून गेला .. फोन आला तर देतो "

सायली " हो चालेल मी .. वाट बघते थोडा वेळ .. "

सायली एक तास  तिकडे वाट बघत बसली .. तेवढ्यात रामा गडी बाहेर आला धावत .. " ताई .. शिशिर दादांचा फोन आहे "

सायली " हा दादा .. तुम्हला गाडी हवीय का ?"

शिशिर " ऐक ना .. सायली .. तू घेरी येतेस का ? एक काम होते तुझ्याकडे ?"

सायली " नाही .. मी ते .. मिहीर ची वाट बघत बसले होते .. येईल तो .. कदाचित काहीतरी काम निघाले असेल त्याचे "

शिशीर " तेच तर .. तो आता तिकडे नाही येऊ शकणार आहे .. तू घरी ये .. मग सांगतो "

सायली " तो घरी आहे का ?"

शिशिर " नाही .. घरी नाहीये .. पण तिकडे पण नाही येणार आहे .. तू घरी ये .. आणि सावकाश ये काय .. काही काळजीचे कारण नाहीये .. मी घरी आलो कि सांगतो .. का मी येऊ का तुला घ्यायला "

सायली ने फोन कट केला आणि एका वेगळ्याच मनस्थितीत गेली .. मन भरून आले होते ..पण रडायला पण येत नव्हते ..ती तिकडून घरी आली ..

शिशिर लता बाई आणि लीला बाई तिची वाट बघत अगदी बाहेरच येऊन थांबल्या होत्या ...

 लता बाईंनी " आलीस का ? चल तू हात पाय धुवून घे .. आणि मग आपण जेवूया .. लता आणि मी थांबलोय तुझ्यासाठी "

सायली " मिहीर कुठेय ?"

लीला बाई " आहे तो .. जरा बाहेर गेलाय .. त्याच एकाहितरी काम निघाले तर तो गेलाय त्या  कामासाठी ?"

सायली " कधी ?

शिशिर " अग तो तुला कॉल करत होता .. किती तरी वेळ .. पण तू इकडेच फोन विसरलीस ना .. त्यामुळे गोधंळ झाला .. तुझा बराच वेळ काहीच कॉल नाही .. मेसेज नाही आला त्याला म्हणून त्याने शेवटी मला कॉल करून सांगतले कि सायलीला  मला कॉल करायला सांग "

सायली " ओके .. ठीक आहे .. मी आलेच ड्रेस चेंज करून "

आणि सायली तिच्या रूम मध्ये गेली आणि जी ओकसाबोक्षी रडू लागली .. तिला खूप वाईट वाटलं .. तिला मिहीर चा खूप राग येत होता .. अरे यार इतके काय महत्वाचे काम होते कि मला ना भेटता जावे लागले .. ठीक आह जेवणाचा प्रोग्रॅम कॅन्सल झाला असता तरी चालले असते पण मला एकदा भेटून सांगून जायचे होते ना ..

तेवढ्यात लीला बाई .. " सायली .. येतेस ना .. जेवायला "

सायली " हो .. आलेच "

सायलीने नऊवारी साडी बदलली आणि नॉर्मल साडी घालून बाहेर आली . लीला बाईंना कळलेच कि हि आत मध्ये रडलीय ते .. त्यांना पण मिहीर चा रागच आला होता .. एवढा पोरीने त्याच्या साठी डबा केला आणि हा निघून गेला ..

सायलीने मनातून ठरवले कि आता हा विषय घरातल्यांसमोर जास्त डिस्कस  नको करायला . जे काय बोलायच्या ते मी आणि मिहीर बघून घेईन . कदाचित या सगळ्या पेक्षाही काही महत्वाचे काम त्याचे असू शकेल असे सध्या मानते आणि नॉर्मल रूटीन चालू ठेवते .

सायली लीला बाई आणि लता तिघी मस्त छान गप्पा मारत जेवल्या . म्हणतात ना आत खवळलेला समुद्र बाहेरून शांत दिसतो कधी कधी अगदी तशीच सायलीची अवस्था झाली होती .

0

🎭 Series Post

View all