Login

विभक्त भाग ४७

in this part sayali and mihir are fighting on bad behaviour of mihir

विभक्त भाग ४७

क्रमश : भाग ४६

जेवण झाल्यावर पुन्हा रूम मधे आली . तर मोबाईल वाजत होता अर्थातच कॉल मिहीर चा होता . सायलीला तो फोन खाली आपटून तोडून टाकावा असे वाटत होते . पण तिने सरळ कॉल कट केला .  बेड वर झोपून गेली . थोड्यावेळाने उठून तिने एकदा जस्ट चेक केले तर २५ एक कॉल मिस झाले होते .. आणि १० /१२ मेसेज होते .. प्लिज कॉल . प्लिज पीक अप , सॉरी असे अनेक मेसेज होते .

सायली ने झोपायचा प्रयत्न केला पण मनात जर अशांततेचं वादळ उठले असेल तर कसली झोप येणार . या कारण साठी तू रडायचे नाहीस .. य कारणासाठी  जर तू रडलीस तर तू हरवून जाशील ..  ती असे मनोमन ठरवून  भरून आलेल्या अश्रूंना मागे पिटाळून लावत होती . अपमान तो हि घरातल्यासमोर असाच फिलन्ग होता तो .. आणि तो हि अशा माणसा कडून ज्याच्यावर आपले आणि ज्याचे आपल्यावर अतोनात प्रेम आहे .. तरीही .. व्हाय .. त्याला खुश करण्यासाठी मी इकडे काय काय करतेय . आज लिटरली गरम तव्याला हात लागल्याने तिला एक चटका पण बसला होता ..

तिचे कशातच लक्ष लागेना .. तिने सरळ तिचा लॅपटॉप काढला आणि ऑफिस च्या कामात मन गुंतवण्याचा प्रयत्न करू लागली . २ तास ती मेल्स ओपन करून बसलीय पण एकही वेळ तिने वाचला नाहीये .. आज तिला कोणत्याच मेल्स चा अर्थच कळत नव्हता . ती मनात विचार करतेय कि मी इकडे येऊन माझे कामच विसरले कि काय ? मी माझ्या ध्येया पासून लांब गेले का ? मी भरकटलेय  का ? आणि उत्तर जर हो असें तर मी आता काय करायला पाहिजे ? असे सगळे विचार भेडसावत होते ..

तेवढ्यात सावनी आली " काकी .. ती मेहंदी काढणारी मुलगी आलीय आई ने तुला खाली बोलावलंय "

सायली " ठीक आहे .. सायली खाली गेली .

मग आधी सावनीच्या मग सायलीच्या दोन्ही हातावर अगदी ब्रायडल मेहंदी त्या मुलीने काढली मग लता आणि लीला बाई दोघीनी पण त्यांच्या हातावर काढून घेतली .

लीला बाई आणि लता ला पण सायली चा अंदाज येई ना .. हि मुलगी इतकी नॉर्मल कशी काय ?

मेहंदी काढून आल्यावर सायली पुन्हा तिच्या रूम मध्ये आली आणि दार लावून झोपून गेली .. दुःखात माणसाला कधी कधी  खूप गाढ झोप लागते कारण मेंदू ला पण एक प्रकारचा स्ट्रेस आलेला असतो .

बऱ्याच वेळानंतर सायली ला दरवाजा ठोकवल्याचा आवाज येत होता .. सगळे बाहेरून " सायली .. सायली .. दार उघड .. आणि दार ठोकवत होते .. मधेच रडायचं आवाज .. मधेच काकी ला काय झाले आजी .. काकी .. असे आवाज आले आणि ताडकन सायली उठली . तिने बघितले तर रात्रीचे ८ वाजले होते .. तिने पटकन आधी दार उघडले ..

सायली " सॉरी .. सॉरी.. मला गाढ झोप लागली .. सॉरी .. आय एम फाईन "

लीला बाई आधी पटकन रूम मध्ये आल्या . लग्न झाल्यास त्या मिहीर च्या रूम च्या आत आल्याच नव्हत्या .. त्यांनी सगळे ड्रॉवर चेक केले .. कि कोणत्या गोळ्या वगैरे तर नाही ना आहेत इकडे .. इतकी गाढ कशी काय झोप लागू शकते .. "

लीलाबाई " काय ग ? काही खाल्ले होतेस का ? एवढी काय झोप लागली ?"

 सायली " काही नाही हो .. मी खूप दमले होते .. सकाळ पासून किचन मध्ये होते .. त्यात सकाळी लवकर उठले .. मग शेतावर गेले तिकडे २ तास बसले .. आल्यावर मेहंदी साठी १ तास बसले .. एवढ्या कामाची मला सवय नाही म्हणून कदाचित गाढ झोप लागली .. आणि मला रात्री पण झोप नव्हती लागली काल .. ते सगळे जुळून आले .

तोपर्यंत शिशिर ने मिहीर ला कळवले कि हो .. उघडलं दार .. काही नाही दमली होती तर झोप लागली होती .. तू किती वाजे पर्यंत येशील असा त्यांचा कॉल चालू होता .

सायलीच्या हातावरची मेहंदी आता सुकली होती आणि बेडशीट वर आणि खोली मेहंदीमय झाली होती . सायली जाऊन दोन्ही हात धुवून आली . मग साफ  केली बेडशीट चेंज केली आणि किचन मध्ये जाऊन जे पाहिजे ते खायला घेऊन खाऊन त्यावर चहा बनवून चहा पियुन पुन्हा रूम मध्ये आली आणि मग ऑफिस च्या लॅपटॉप वर बसली . आता थोडे बरं वाटतं होतं . आता काम करण्यात इंटरेस्ट पण वाटत होता आणि तिने बाकीचे कोणतेही विचार न करता स्वतःला कामात झोकून दिले .. आज काय ती किचन मध्ये कामासाठी गेली नाही आणि तिला बोलवायची हिम्मत पण कोणी केली नाही .

रात्री तात्या आले ते पण शहरात गेले होते मजूर लोकांना कपडे वाटायचे ते कपडे घेऊनआले होते आणि मिठाई चे बॉक्स ची ऑर्डर देऊन आले होते .

शिशिर आणि तात्या बाहेर त्यांच्या व्यवहाराचे बोलत बसले होते . तेवढ्यात मिहीर पण आला .

शिशिर ला मिहीर ला चांगलेच झापायचे होते पण तात्या असल्या मुळे त्याने विषय वाढवला नाही .

तात्या " काय रे .. उद्या येणार होतास ना ? "

शिशिर " तुम्हला कसे काय माहित हा शहरात गेलाय तो ?"

तात्या " तो माझी परमिशन घेऊनच गेला होता "

तात्यांना वाटले कि जे तो सकाळी बोलला तेच त्याने केले . मधला गोंधळ त्यांना माहीतच नाही . आणि शिशिर ने पण विषय वाढवला नाही .

मिहीर पहिला आधी त्याच्या रूम मध्ये आला तर सायली लॅपटॉप वर काम करत होती

सायली "गीता .. अग  हे मेल खूप महत्वाचे होते .. तू मला या बद्दल आधी काही का नाही सांगितलेस "..  बरं ठीक आहे मग . त्या राहुल ने अजून काही रिप्लाय पण नाही दिलाय .. असे काय करता यार तुम्ही लोक .. हा मॅटर खूप हॉट होणार आहे .. मला त्या राहुल च नंबर दे . "

मिहीर " हाय .. "

सायली  त्याच्याकडे बघून " हाय "

मिहीर ला ती चा  चेहरा बघूनच लक्षात आले कि रडून नाक लाल झालंय .. तरीही   माझ्यावर चिडली नाही याच अर्थ खूप रागावली आहे .. त्याने कपडे चेंज केले आणि अंघोळीला गेला ..

सायलीचे काम चालूच

सायली " राहुल .. तुला आता मी एक मेल फॉरवर्ड केलाय .. त्याच्यावर तुझ ऍक्शन प्लॅन काय होता .. ? मग का नाही रिप्लाय दिला तसा ?अरे तू मेल ला रीव्हर्ट का करत नाहीस पण .. ठीक आहे पण ठीक इस लास्ट वॉर्निंग .. असे वाक्य  बोलत होती तोच मिहीर अंघोळ करून आला .

ती छेडत नाहीए तर मी कशाला उगाच आता विषय काढू ? बाहेर तात्या पण आहेत उगाच सगळंच विचका नको होयला. म्हणून गप्प बसून आवरत होता .

लीला बाईंनी सर्वांना जेवायला बोलावले आणि सर्व जण एकत्र गप्पा मारत जेवायला बसले .

लता वहिनींनी परत तेच सायलीने केलेले वांग्याचे  भरीत आणि दुपारची भाकरी मिहीरला वाढली . त्याच्या साठी तिने एवढे केले ते त्याच्या मुखी जाऊदे हाच त्यांचा हेतू . आणि दुपारी तात्या पण जेवायला नव्हते त्यामुळे वांग्याचे भरीत तात्यांना पण वाढले होते .

तात्या " अरे वाह .. भरीत एकदम झकास झालंय .. तात्यांना आणि मिहीर ला अजून माहीतच नाहीये कि ते सायलीने केलय तरीही त्याला दाद मिळाली म्हणजे ते नक्कीच चविष्ट बनले होते ."

सायली जेवली आणि  बेडरूम यामध्ये गेली .. आज काही तिला किचन नि सासू नि जाऊ बाई आणि मिहीर यात कशातच इंटरेस्ट नव्हता .

तात्या " सायली ची तब्बेत बरी नाहीये का लीला ?"

लीला बाई मिहीर कडे आणि मिहीर लीला बाईकडे बघू लागले

लीला " हो .. तिचे आज जरा डोकं दुखतय . मिहीर नव्हता तर शिशिर ने गोळी दिलीय तिला "

तात्या " नाहीच थांबले तर तिला उद्याच्या उद्या दवाखान्यात घेऊन जावा काय ?"

लीला " हो .. नक्कीच "

मिहीर पण जेवला आणि रूम मध्ये न जात बाहेर वॉक ला गेला आणि एक सिगारेट फुंकून आला आणि बेड वर आडवा पडला . सायलीला लगेच कळले कि हा स्मोक करून आलाय ..तरीही तिने दुर्लक्षच केले आणि तिचे काम करत बसली . तो झोपतोय म्हटल्यावर लाईट ऑफ केली आणि टेबल लॅम्प वर ती काम करत बसली .

मिहीर " मी तुला खूप कॉल्स केले .. तू एकही कॉल उचलला नाहीस आणि परत केला पण नाहीस "

सायली " हमम.. आय वॉज बिझी टुडे ?"

मिहीर " मला जावेच लागले .. अचानक "

सायली " इट्स ओके .. यु कॅन स्लिप .. मला  एक काम आहे  अजून एक तास तरी "

मिहीर " मी कुठे म्हणतोय मला झोप आलीय "

सायली "  नको झोपूस .. मी काय जबरदस्ती करतेय का तुझ्यावर ?"

मिहीर बेड वरून उठला आणि ती बसलेली तिथे गेला. आणि तिचे दोन्ही हात हातात घेऊन तिच्या हाताला किस केले आणि म्हणाला " वाह किती मस्त मेहंदी दिसतेय ."

मिहीर " अरे .. सिरिअसली सॉरी .. सगळे मिस मॅनेजमेंट झाले . हे बघ तू आपले काय ठरले होते  कि तू

 2 वाजता डबा घेऊन येणार .. जेव्हा मला कळले कि मला एका  कामाला बाहेर जावं लागतंय तेव्हा

१२ वाजले होते .. मी तिकडूनच तुला फोन करू लागलो कि आजचा प्लॅन पोस्टपोन करू .. तर फोनच उचलला नाहीस . मला वाटले कि तू किचन मध्ये असशील तुला फोन चा आवज येत  नाही म्हणून मी तिकडून निघालो .. तरी पण मी फोन लावतच होतो .. पण तू फोनच उचलला नाहीस .. आणि मी तिकडून तसाच गेलो .. म्हंटल २ वाजायला अजून अवकाश आहे .. अजून तू काही निघाली पण नसशील . मी हायवे ला लागलो असेल तर शिशिर दादाने मला तुझा हा फोटो टाकला आणि सांगितले कि " तुझी झाशीची राणी डबा घेऊन निघालीय .. "

मी हायवे वर गाडी साइडला घेतली आणि तुला कॉल करत राहिलो .. तू  कॉल च उचलेनास .. मग शेवटी दादाला फोन करुन सांगितले कि असे असे मी जरा बाहेर आलोय .. सायलीला प्लिज आणायला जातोस का  .

दादा ने इतका झाप झापलय आज फोन वर ..सॉरी यार सायली .. सगळा मिसमॅच झाला .

बोल बोलता त्याने असेच सहज सायलीचा पदर त्याच्या हाताने नीट केला .

आत मात्र सा यलीची सटकली .. “काय प्रॉब्लेम आहे .. सारखे इकडून तिकडे पदर नीट कर .. तिकडून पदर नीट कर ..” आणि रागाने साडी सोडून त्याच्या अंगावर फेकून दिली .. “आता उद्या  ना जीन्स घालून  अख्या गावात मिरवते .. बघते मला कोण नाव ठेवते ते .. आणि असल्याचा मला अजिबात फरक नाही पडत . “

मिहीर " अरे .. यार मी तुला इतके समजावून सांगतोय आणि तू हे काय असे वागतेस ना .. काय कळतच नाही मला आता साडीचे कुठून आले मधेच .. "

सायली " आता नाही का तू पदर सारखा केलास .. काल  म्हणलासचं ना मला  काही  येत नाही . स्वतः आपण बोलतोय काय ? वागतोय कसे ? यांच्याकडे बघ .. मी तुझ्या साठी तिथे त्या लता वहिनींच्या  मागे लागून जेवण बनवले . तुझ्या आई च्या पा या पडून पडून तिकडे शेतावर जायची परमिशन मिळवली . दादा पण गाडी आधी दयायला घाबरतच होते .. त्यांच्याकडून चावी मिळवली ..  गोल साडीत गाडी कशी चालवू म्हणून नऊवारी साडी नेसून निघाली .. तुझ्यासाठी .. आणि तू  असा वागलास माझ्याशी .. मी २ तास तिकडेच तुझी वाट बघत होते .. त्या गड्या बरोबर पण काही मेसेज नाही ठेवलास . तू परत येणार आहेस का नाही माहित नाही ? मी परत जायचंय का नाही माहित नाही . ? मी किती वेळ वाट बघायचय माहित नाही .. आणि दोन तासांनी कळतंय कि साहेब गाव बाहेर गेलेत .. तुला एवढी कसली घाई झाली होती जे की एक मिनिट मला भेटून सांगायला पण वेळ नव्हता .

घरात सगळ्यांना माहित झाले होते कि मी तुझ्यासाठी एवढी छान तयार होऊन . आणि मला जमेल तस डबा तयार करून मी तिकडे मोठ्या हौसेने तिकडे निघाले आणि तू ..

मिहीर तिचीच साडी तिच्या अंगावर टाकत बोलतोय

मिहीर " तेच तर ना .. तू मोबाइल चेक कर ना .. मी खूप ट्राय  केला तुला सांगायला .. पण आपली भेट नाही होऊ शकली ."

सायलीची होत असलेली चिडचिड त्याला दिसत होती . तिला असे झाले होते कि ह्याला आता खाऊ का गिळू .. तो तिला शांत करायला बघत होता .. अरे चिडू नकोस ना .. रिलॅक्स .. बघ किती डोकं गरम झालंय .. शांत हो .. शांत हो .. आणि तिच्या कपाळावर किस करायला जातोय तर ती त्याला हातही लावून देत नव्हती  आणि बेड वर जाऊन झोपली .. हा पण तिच्या मागे झोपायला गेला ..

सायली " मला हातही लावू नकोस आधीच सांगून ठेवते तुला .. "

मिहीर " ओके .. ओके..  रिलॅक्स ... आणि दोघे विरुद्ध दिशेला तोंड करून झोपले .

0

🎭 Series Post

View all