विभक्त भाग ४८
क्रमश : भाग ४७
सायली च्या डोळ्यातून गंगा यमुना वाहत होत्या आणि रागाने डोळे लाल झाले होते . मिहीर ला हि कळत होते कि जे झाले ते जरा जास्तच झाले होते . काल मी इतका उतावळा झालो होतो हे तिला बघवले नाही म्हणून माझ्यासाठीच तिने हा प्लॅन केला होता आणि मी प्लॅन अचानक चेंज केला . आणि वेळे आधी तिला मेसेज पण दिला नाही .. या ठिकाणी मी असतो तर मला पण खूप दुःखच झाले होते .
मिहीर ने कूस बदलली तर समोर पाठमोरी सायली .. मिहीर साहेब थोडा आता मनावर कंट्रोल करा .. आता काय आलेल्या संधीला तुम्ही नाकारले आहेत आता जरा गुड बॉय सारखे वागा नाहीतर समोर सायली मॅडम आहे .. आणि लवकर तिला मनवा नाहीतर तुमची दिवाळी चांगलेच दिवाळं काढेल ..
मिहीर ने एक चादर घेतली आणि तिच्या अंगावर टाकली .. आणि तिला उठवून बसवली . तिचा हात हातात घेऊन मिहीर " ऐक ना , मी खरच मनापासून तुला सॉरी बोलतो .. तू फक्त एकदा विचार कि मी एवढे काय काम करायला गेलो होतो .. आणि जर तुला असे वाटले कि कारण नसताना तुला सोडून गेलो होतो तर तू पाहिजे तर तुझीच स्ट्रॅटेजि वापर माझा गाल आणि तुझा हात मग तर तुझी शांती होईल .. आणि तिचे डोळे पुसू लागला ."
सायली " तुला काय वाटतं तुला मारेल का मी ? हेच तर ना बोलताना आपण काय बोलतोय हे तुला कळतच नाही ?तू माझ्या प्रेमाचा अपमान केला आहेस .. जा तू माझ्याशी बोलू नकोस .. मी बोलणार नाही "
मिहीर " मग मी स्वतःलाच मारून घेतो .. मग तर झाले .. "
सायली तुला ना मी आता फायनल सांगते " धिस टाईप ऑफ इर्रेस्पॉन्सिबल बिहेविअर विल नॉट बी ऍक्सेप्टेड अँड नॉट बी टॉलरेटेड अगेन ...अँड धिस इज माय लास्ट वॉर्निंग टू यु .."
मिहीर " युअर मेमो हॅज बिन आकसप्टेड अँड काइंडली ऍक्सेप्ट माय अपोलोजि."
मिहीर ने उठून तिला एक पॅकेट दिले . गिफ्ट नाहीये .. पण तुझ्या साठी आणलय .. ओपन कर ..
सायली तशीच बसून राहिलेली ..
मिहीर ने तिला पाणी प्यायला दिले . सॉरी बोललो ना आता .. प्लिज चेंज युअर मूड
सायली "खरं तर तू असा वागला आहेस कि तुझ्याशी चांगली महिनाभर तरी बोलली नाही पाहिजे .. पण मीच स्वतः नालायक आहे .. तुला लगेच माफ केलंय . "
मिहीर " अरे .. त्यालाच तर प्रेम म्हणतात . आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याच्यावर कधीच रागावू नाही शकत .. तुला आठवतंय कि तू मला एकदा सांगितले होतेस कि तू मला मार .. कसे वाटतं कळले ना ? असा जीव पिळवटून निघतो .. असे वाटत कि आपल्या प्रेमाला हि अशा पद्धतीने बघते .. आणि असे वाटतं कि हे हात कुठेतरी आपटून आपटून तोडून टाकावे .. "
हे ऐकून सायलीने त्याला मागून मिठी मारली .. " सॉरी "
मिहीर " मी पण सॉरी "
सायलीने ते पॅकेट उघडे तर त्यात नाईट ड्रेस होता .. ज्यात सायलीला रात्री कंफर्टेबल वाटते .
सायली ने पटकन ड्रेस घातला आणि म्हणाली " थँक यु .. फॉर धिस .. निदान आज रात्र मी चांगली झोपेन "
मिहीर " हमम.. मग काल मला कळले कि तुला साडीवर किती अनकंफोर्टेबल होते झोपताना आणि तू नाईट ड्रेस आणायला विसरलीस म्हणून नवीन घेऊन आलो . "
सायली " थँक यु .. म्हणताना पण तीच्या डोळ्यातून अश्रू टपकत होते ..
मिहीर "आता मी पण एक सांगणार आहे आज जशी साडी काढून फेकलीस ना तशी जर तू साडी काढून फेकलीस ना तर पुढे जे काही होईल त्याला मी रिस्पॉन्सिबल नाही. मला अजिबात आवडलेले नाहीये हे असे वागणे . राग व्यक्त करण्याची हि पद्धत चुकीची आहे "
सायली " तुझ्या मुळे .. तू मनस्ताप दिला होतास मला "
मिहीर " ते जाऊ दे आता .. कितीदा तुला सॉरी बोलू .. अजून एक आपण तिकडे शहरात गेलो ना कि मधली भिंतच हातोड्याने तोडून टाकणार आहे "
सायली हसायला लागते ..
मिहीर " हसतेस काय ?च्यायला कुणाचे तोंड बघून तुझ्याशी लग्न केले काय माहित ? सगळीकडूनच उपवास घडतोय माझे बाकीचे मित्र बघ त्यांच्या बायका उत्तम सुगरणी आहेत आणि ....
सायली " हेच तुला खटकतंय .. मला माहितेय .. म्हणूच मी तुला म्हटले कि यु आर कंपेअरिंग युआरसेल्फ विथ अदर्स . "
मिहीर " अरे यार दयाट वॉज अ जोक "
सायली " नाही .. हा वाटतंय इतका साधा जोक नाहीये .. यात खूप सारा अर्थ लपला आहे .हा जोक मला काट्या सारखा टोचतो .. मला वाटतं माझ्या करिअर मुळे तुला नॉर्मल मॅरीड लाईफ पण एन्जॉय करता येत नाही .. "
मिहीर " ए हॅलो .. काय हे .. आपण असे का बदलतोय .. आपण कधी पासून भांडू लागलो .. आपण तर एक टीम आहोत .आणि जो निर्णय घेतलाय तो दोघांनी मिळून घेतलाय ..उलट तुझ्यामुळे माझे करिअर किती सुधारले बघितलेस का ? कदाचित येत्या प्रोमोशन मध्ये मी डायरेक्टर रोल साठी नॉमिनेट होऊ शकतो . तू होतीस आणि तुझ्या मुळे मलाही काहीतरी करावेसे वाटते ..
नाहीतर मी आपला ९ ते ५ काम करून घरात चिल मारणारा बंदा होतो .. तुझ्यामुळे माझ्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली आणि आता हे काय तू बोलतेस .. हे बघ उगाच निगेटिव्ह विचार करून मन खराब करून घेऊ नकोस . आपल्या सारखे आपणच आहोत जे जगातल्या असंख्य जोडप्यांपेक्षा वेगळे आहोत ..
सायली " सॉरी पण तुला .. "
मिहीर " तुला काय वाटतं .. मला जे पाहिजे ते मी मला पाहिजे तेव्हा घेऊ शकत नाही का ? आणि तू मला देणार नाहीस का ?"
सायली काहीच बोलली नाही ..
मिहीर " हे बघ .. कशी महत्वाचा मुद्दा आला कि गप बसतेस "
सायली " चला झोपा आता .. बाकीचे तिकडे गेल्यावर बोलू .
मिहीर " चला .. उपवास सुरु .. आणि दोघे हसू लागतात. अजून एक मला एक विचार येतो कि जेव्हा पण मी विभक्त पण संपवायचा विचार करतो तेव्हा ते लांबणीवर का जाते? काय गमक आहे काय माहित "
सायली " हो रे .. आज तर खरं तर मी पण तयार होते .. तरी पण काहीतरी कारण घडतेच .. कोणाची तरी नजर लागलीय का आपल्याला .. हल्ली भांडतो पण आपण ? "
मिहीर " ए गप ए .. उद्याची व्हीपी हा असला कसला विचार करते "
सायली " मिहीर मी चिडते का रे जास्त ? तुला त्रास देते का रे जास्त ? " आणि त्याच्या कुशीत शिरते
मिहीर " जशी आहेस तशी रहा .. जशी आहेस तशीच मला आवडतेस ..बाकी मला काही माहित नाही .. आणि तिला कुशीत घेऊन दोघे छान झोपून जातात . "
मनात मिहीर विचार करू लागला .. कारण न विचारताच झोपली .. तसेही एक प्रकारे बरेच झाले .. मला माहित नाही मी ज्या काम साठी गेलो ते काम जर तिला आवडले नाही तर ती ला वाटेल कि ह्या कामासाठी तू मला सोडून गेलास आणि मग कदाचित नाराज होईल .. मी हिला सांगतो… आणि मीच निगेटिव्ह विचार कशाला करतोय .
त्याचे झाले असे मिहीर पण सायलीची उत्सुकतेने वाट बघत होता . तो वरच्या खोलीत गेला पण होता . वरची रूम कशी आहे हे तो बघून पण आला होता . आणि तोही आतुरतेने सायलीचे वाट बघत होता . तेवढ्यात त्याला तिकडे काही न्युज पेपर दिसले त्यातल्या एका पर्टिक्युलर जाहिरातीवर सर्कल केले होते . त्याने पुन्हा एक दोन पेपर बघितले तर त्याच जाहिरातीवर सर्कल होते . तिकडे एक मोबाईल नंबर पण होता त्याने कॉल केला तर तो एक ट्रॅव्हल एजन्ट होता . शिशिर ला पण त्याच्या बायकोला घेऊन बाहेरच्या देशात जायचे होते म्हणून कदाचित चौकशी करायला फोन केला होता .
मग मिहीर च्या लक्षात आले कि हा एजन्ट दादाला फसवू शकतो . मग मिहीर ने तो ज्या टूर ने सिंगापूर ला गेला होता त्यांना कॉल केला . तर त्याने सांगितले कि आज जर बुकिंग केलेत तर नोव्हेबंर मध्ये जाणाऱ्या ट्रिप मध्ये जाऊ शकता .
नोव्हेबंर मध्ये दादाची अनिव्हर्सरी असते .. त्याला वाटले हे बुकिंग जर केले तर त्यांना अनिव्हर्सरी गिफ्ट देता येईल . .. त्याने ठरवले कि आजच बुकिंग करावे दुपार नंतर तो जाईल . आणि शेतघरातल्या खिडकीतून बाहेर बघत बसला होता . तर त्यांच्या खिडकीतून ते आंब्यांचे झाड आणि त्या झाडाला बांधलेले झोपाळे दिसले . त्याला मनातून असे वाटत होते कि या इथंल्या लहान मुलांसाठी काहीतरी करावे . असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याला बेचैनी आली .. करू करू म्हणतो आणि राहून जाते .. तो लगेच बाहेर पडला आणि त्याने त्या आंब्याच्या झाडाखाली मुलासाठी एक प्ले एरिया बनवायचं ठरवले . इंटरनेट वर बघून त्याने गावा बाहेर च्या एका कॉन्ट्रॅक्ट दाराला फोन केला आणि त्याला सांगितले कि असे असे झाडाखाली रबर मॅट असलेले असा एक प्ले एरिया बनवायचाय .. तर तो माणूस पण त्याला म्हणाला कि तुम्ही आज आलात आणि डिझाईन फायनल केलीत ना तरच काम सुरु होईल नाहीतर आमची पण दिवाळी सुट्टी सुरु होतेय . एकदा कामगार गावाला गेले कि मग थोडा उशीर होईल .. मिहीर त्या विचारताच तिकडून लगेच बाहेर पडला .. एक क्षण त्याला सायली आज त्याच्यासाठी डबा घेऊन येणार आहे याच वर पडला आणि जसा तो निघाला तसे त्याला आठवले कि सायली च काय .. आणि तो तिला कॉल करताच राहिला .. कॉल करतच राहिला
मग बाहेर पडलाच होता तर दोन्ही काम करून आला होता एक म्हणजे वाहिनी आणि दादाचे सिंगापूर चे बुकिंग आणि आंब्याच्या झाडाखाली मुलांना खेळायला प्ले एरिया चे डिझाईन फायनल करून आला .
मिहीर ला मनातून आता खूप छान वाटत होते कि त्याला जे काही करायचे होते ते तो पूर्ण करूनच आला होता . पण या सगळ्यात सायली ला त्याने जरा दुखावलेच होते . कदाचित सायली ला हे कळल्यावर ती कशी रिऍक्ट होईल काय माहित
मिहीर च्या जवळ सायली खूप शांत पण झोपली होती पण मिहीर आज पुन्हा अस्वस्थ होता . त्याला मनातून आज सायली बरोबर मी खूप चुकीचा वागलोय ह्याचे गिल्ट आले होते . शिवाय तो पुन्हा स्वपरीक्षण करू लागला कि मी सायली म्हणते तसं माझी लाईफ दुसऱ्यांबरोबर कंपेअर करतोय का ? हिला असे का वाटले असावे ? का मी नकळत तेच करतोय हे तिच्या लक्षात आलेय . तिचे मार्किंग नॉर्मली एकदम करेक्ट असते .
एखादी दुसरी कोण असती तर नवरा कुठे झक मारून आलाय यात तिला जास्त इंटरेस्ट असता पण हिला सोडून मी कुणीकडे गेलो होतो किंवा असे काय एवढे मोठे काम होते ते जाणून घ्यायचेच नव्हते . तिला फक्त मी न सांगता गेलो त्याचे दुःख होते .. यार खरच मनातून ती ग्रेट आहे . मी पण ना तिला दोन दिवस जा म टॉर्चर केलेय . माझ्या घरातल्यांना खुश ठेवण्यासाठी ती स्वतःला किती छान बदलतेय . सगळ्यांशी हसून खेळून राहते या वेळी तर किचन मध्ये पण काम करतेय .. तिच्या स्वभाव च्या पलीकडे जाऊन ती वागतेय आणि अशा वेळी मी तिच्या मागे तिचा सपोर्ट म्हणून खंबीर पणें उभे राहायला पाहिजे तर मी पण एक नॉर्मल नवऱ्या सारख्या तिच्या कडून अपेक्षा करतोय . मला नावाने नको हाक मारुस .. तू साडीत नीट वावरत नाहीस .. वगैरे वगैरे .. माझी प्रिंसेस या जगातल्या सगळ्यांपेक्षा वेगळी आहे तिला सर्व सामान्य लोकांच्या बायको बरोबर मी कंपेअर कसा करू शकतो ?
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा