विभक्त भाग ५२
क्रमश: भाग ५१
मिहीर " आता तू माझ्यावर रागावली आहेस ते माहितेय मला .. पण प्रश्न विचारण्या मागे माझा एक हेतू होता "
सायली " काय ? "
मिहीर " विभक्तपणा दोन प्रकारचा आहे एक अंतरिक आणि एक शारीरिक दुसरा जो आहे ना त्याचे मला टेन्शन नाही एक वेळी अशी येईल कि कोणाला कोणाची परमिशन घ्यायची वेळच येणार नाही .. पण अंतरिक किंवा मानसिक विभक्तपणा लोक मरून जातात पण संपत नाही . नक्की मला काय हवेय आणि नक्की तुला काय हवेय हे आरशात जसे प्रतिबिंब जसे दिसते ना तसे एकमेकांच्या डोळ्यात दिसले पाहिजे .त्यामुळे मी हे सगळे प्रश्न तुला विचारले .. तुला छळायला किंवा त्रास दयायला नाही . "
बाय द वे आज काय एकदम सेक्सि अवतार .. नाश्ता करताना प्रत्येक घास घशात अडकत होता .. तुला बघताना .. हि साडी … खोचलेला पदर.. केवढी कामात मग्न .. हे बांधलेले केस ... आणि मन लावून पोळी लाटत असलेली तू बघून मला झुलवत होतीस का ?"
सायली " ओह.. शट अप .. मी कशाला तुला झुलवू "
मिहीर " आज एकदम ३६ २४ ३६ कशी काय ?
सायली " काही पण काय ?
मिहीर " काश हाच नजरा मला तिकडे मला तिकडे बघायला मिळाला असता .. "
सायली " सपना अच्छा है mr मिहीर .. मगर थोडा मुश्किल है ।
मिहीर “ माझ्या कडे एक गुड न्युज आहे. त्याने तू खुश होशील”
सायली "ओके .. सांग मग
मिहीर "अग , काल संध्याकाळी मला मेल आलाय कि माझे नाव डायरेक्टर साठी नॉमिनेट झालेय "
सायली "वाह .. मिहीर .. ग्रेट .. सही .. थँक गॉड .. "
मिहीर " ऐक तर .. एक प्रॉब्लेम आहे मला एक वर्षा साठी कंपलसरी USA ला ट्रेनिंग साठी जावे लागणार आहे .. इथे थोडी गडबड आहे "
सायली "गडबड काय ? चांगलीच संधी आहे ना .. एक वर्षा साठी USA "
मिहीर "हो .. पण तू ला इकडे एकटीला राहावे लागेल आणि मला एकट्याला जायचं नाहीये "
सायली "अरे .. पण संधी कशाला घालवतोस .. एक वर्ष असे निघून जाईल "
मिहीर "अरे .. तुला वाटतंय इतके सोपे नाही ते ... तूला आई कडे रहावे लागेल .. किंवा मग मला आईला आणि तात्यांना तिकडे बोलवावे लागेल "
सायली "हमम.. ते ठीक आहे रे इकडचे आम्ही करू मॅनेज तू इकडचे टेन्शन नको घेऊस .. तू तुझे ट्रेनिंग छान करून ये "
मिहीर "ठीक आहे .. मग हो सांगू .. बघ हा नक्की ना .. नाहीतर म्हणशील हा मला टाकून गेला .. तू असतीस बरोबर तर मजा आली असती ग "
सायली "ठीक आहे मी सरांना विचारते काही करता येते का ते बघते ? जर मला पण ट्रान्सफर मागून घेता आली तर बघते .. "
मिहीर "ठीक आहे मग असे करू मी दोन दिवसांनी त्यांना होकार कळवतो कारण होकार कळव ला कि लगेच डोकमेंट्स मागवतील . किंवा असे करतो सध्या दोघांचे डोकमेंट्स देऊन ठेवतो आपण वीझा करून ठेवू आणि मग तुझे मॅनेज झाले तर येशील नाहीतर तू थोडे दिवस २ महिने वगैरे तशी तरी ये .. मग पण तिकडे एन्जॉय करू "
सायली "अजून एक ऑप्शन आहे कि मी तुझ्या बरोबर वर्ष भर येऊ शकते "
मिहीर " बोल .. बोल मग तेच करू "
सायली "मी रिझाईन करते "
मिहीर "फटके हवेत का तुला आता ? आता तेवढंच बाकी आहे ?"
सायली "यार खरच मला पण यायचय तुझ्या बरोबर .. हे झंझटच सगळ्या प्रॉब्लेम चे मूळ आहे "
मिहीर "नाही नको .. प्रॉब्लेम वगैरे काही नाही ... तू एक काम कर तू सरांशी डिस्कस कर कि काही होऊ शकते का आणि मी सरांशी डिस्कस करतो कि सिक्स मंथ वगैरे होतय का ?"
सायली "सही .. आय रिअली हैप्पी फॉर यु .. "
मिहीर "क्रेडिट गोज टू यु मॅडम ... चलो आज आपण तिकडे जाऊ या .. मी उद्याच सरांशी बोलतो .. तू पण बोल .. आणि तिला किस करायला जातो तर सायली त्याला दार उघडे आहे खुणेने सांगते .. तर तो तिच्या कानात हळूच सांगतो मी .. आज तुला सोडणार नाहीये काय ? आधीच सांगून ठेवतो .. "
सायली "काय रे देवा .. आधीच कशाला सांगतोस .. मागच्या वेळी पण असेच केलेस आणि मग जातोस कुठे तरी ?"
मिहीर "आज तू मला जाऊन देऊ नकोस मग "
सायली "अच्छा "
मिहीर "चल मग पॅकिंग कर .. एवढी महत्वाची बातमी तुला सांगायची होती तर तू पोळ्या बनवत होतीस .. ते माझ्याकडे बघायला पण तयार नाहीस.. याची शिक्षा तुला भोगावी लागेल बालिके "
सायली “ मिहीर .. तू ना कधी कधी अति करतोस ? तिकडे आई आणि लता वाहिनी किती हसत होत्या .. माझ्या दोनच पोळ्या राहिल्या होत्या जरा थांबला असतास ना ?"
मिहीर "तू मला इग्नोर करत होतीस म्हणून मी असे केले ..डोन्ट यु डेअर टू डू इट अगेन "
सायली " हे बरं आहे .. रात्री अपरात्री माझा इंटरव्हू घ्यायचा त्यात काहि पण प्रश्न विचारायचे आणि मी साधे इग्नोर पण करायचे नाही .
मिहीर "काही पण काय .. मी एकही प्रश्न इर रिलेवंट विचारला नव्हता ..
सायली "अरे .. मिहीर मला आईकडे जायचे होते एक रात्र तरी "
मिहीर "आता कुठे ? आता हे पुढे वाढून ठेवलय ते बघ आधी . तुझं नाहीच जमले USA चे तर तुला आई आहेच कि ? माझेच हाल आहेत एकुलती एक बायको पण माझ्या बरोबर नसणार आहे .
सायली " मी आता बाहेर कशी जाऊ ? मला जाम लाज वाटतेय ? आई काय म्हणतील ? लता वाहिनी काय म्हणतील ?"
मिहीर " तुझ्यामुळे तू मला अव्हॉइड करत होतीस ना म्हणून . डोन्ट यु डेअर टू अव्हॉइड मी अगेन .. मग मी असेच करेन."
थोड्याच वेळात तात्या आणि शिशिर जे आत्यांकडे भाऊबीजेला गेले होते ते आले .
तात्या " मिहीर तुला आणि सायलीला आत्याने बोलावलेय .. जायच्या आधी जाऊन ये "
मिहीर " ठीक आहे .. मी आजच जातोय तिकडे सिटीमध्ये .. आज दुपारी जेवलो कि आम्ही निघू "
शिशिर " अरे .. आज थांब कि .. उद्या जा "
मिहीर "थांबलो असतो पण आता दोन दिवसावर ऑफिस आहे तर जरा आधी गेलो तर बरे पडेल”
मिहीर ने घरात सांगून टाकले कि आज मी जाणार आहे .. त्यामुळे घरात जरा सगळेच नाराज झाले . सायली बाई अजून रूम मधून बाहेर आलीच नव्हती . ती ने तिचे पॅकिंग करायला सुरुवात केली होती .
मिहीर पण पॅकिंग करत होता ..
लीला बाईंनी सर्वांना जेवायला बोलावले .. सायली काही बाहेर येईना ..
मिहीर " अग चल .. जेवायला .. आता दुपारी निघायचंय आपल्याला .. "
सायली " मी बाहेर येणार नाही .. तू मला ताट आणून दे .. मला खूप ऑकवर्ड होतंय .. "
मिहीर " अग आता तर दादा आणि तात्या आलेत .. आता त्या विषयवार कोणी बोलणार पण नाही आणि तू बाहेर नाही आलीस तर तात्या विचारतील कि काय झाले ती का बाहेर येत नाही . मग आई ला सांगावे लागेल तर तू काही झालेच नाही असा विचार कर नि ये बाहेर .. मी पुढे होतो तू ये "
आणि बाहेर निघून गेला .
लीला बाई " सायली .. ए सायली" अशी हाक मारू लागल्या तशी सायली पटकन बाहेर गेली .. आणि खाली मान घालून चालू लागली
लीला बाई " जाऊ दे ग .. तू काय त्याचे मनावर घेतेस .. वेडा आहे तो .. मला माहितेय ना .. जे मनाला येईल तसाच वागतो .. त्याला असा फटका दिलाय बघितल्यास ना .
सायलीने लिलाबाईंना मिठीच मारली .. बिचारी जाम ओशाळली होती.
मग सगळे एकत्र बसून आनंदात जेवले .. सायलीने केलेल्या पोळ्या ताटात वाढल्या .. तात्या पण लगेच " वाह .. जमलीय हो पोळी .. पोळी च्या आकारा पेक्षा ती अशी खुशखशीत लागली पाहिजे . अशी पोळी जिभेवर विरघळली पाहिजे .. शाब्बास हो पोरी "
लीला बाई आणि तात्या यांना देवाने मुलगी दिली नाही पण दोन्ही सुनांना त्यांनी आई बापाचीच माया लावली . घराचे हसरे गोकुळ कसे बनवायचे हे दोघांना चांगलेच जमले होते .
तात्या " काल संध्याकाळी काय बिघडले होते तुझे ? एवढा वैतागला का होतास ?"
मिहीर " काही नाही ? कुठे काय ? "
तात्या " कुठे काय ? मी बघितले ?"
मिहीर " अहो ते .. मी तिला दुसरी साडी घालायला सांगितली होती तरी तिने हि साडी घातली म्हणून तिला विचारत होतो "
तात्या " मूर्खच आहेस ? तुला काय कळतंय साडीतले .. कधी धोतर तरी घातलंस का ?"
मिहीर आपला गप्प बसला .. सायली शिशिर लता सगळे मान खाली घालून हसत होते "
तात्या " जाताना आत्याकडे जाऊन पुढे जा पण .."
मिहीर " हो "
जेवणे झाली सगळी पॅकिंग पण झाली आणि मग सगळे बाहेर गप्पा मारत बसले . तेवढ्यात लता आरतीचे ताट घेऊन आली आणि सायलीच्या हातात देऊ लागली
लता " सायली हे घे .. ह्यांना ओवाळ .. मला यांनी कालच सांगितले होते कि सायलीला मला ओवाळायला सांग "
सायली ला खूप आनंद झाला .. तिला सख्खा असा भाऊ नव्हताच कधी .. रक्षाबंधन आणि भाऊबीज कधी साजरी केलीच नव्हती तिने .. तिने पण मोठ्या आनंदात शिशिर भाऊजींना भाऊ मानले आणि ओवाळले .. ओवाळता ओवाळता तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू निघत होते .
शिशिर ने सायलीला एक मस्त साडी गिफ्ट केली . सायलीने पण वाकून नमसकार केला. सायलीचे सासर माहेर बनायला वेळ नाही लागला .
शिशिर ने पण तिला आशीर्वाद दिला .. आनंदी रहा.. कधीही गरज पडली तर हा भाऊ तुझ्यासाठी उभा आहे हे लक्षात ठेव .. मिहीर माझ्या बहिणीला जर त्रास दिलासा ना तर तुझे कान धरू शकतो मी .. काय ?
मिहीर " हो .. आणि मला हिने त्रास दिला तर मी कोणाला सांगू ?"सगळे हसायला लागले ..
जाता जाता मिहीर ने शिशिर आणि लता चे सिंगापूरचे बुकिंग के सांगून ठेवले .
मिहीर " दादा .. मग आता तयारी करा इंटरनॅशनल ट्रिप ची "
सायली " वाहिनी तुम्ही जायच्या आधी तिकडे या साठी शॉपिंग करू ? "
निघायच्या आधी सायली सगळ्यांच्या पाया पडली .. सागर आणि सावनीला भेटली .. लता वहिनींना आणि सासू बाईंना पाया तर पडलीच पण कडकडून मिठी पण मारली .
तात्या " मिहीर .. मला तुझ्यावर गर्व आहे रे बाबा ... यावेळी शेतकऱयांच्या मुलांसाठी तू खेळणी बसवलीस .. दादासाठी सिंगापूरची तिकिट्स बुक केलीस ते सुद्धा न सांगता .. तुला गावाबद्दल आणि गावातल्या लोकं बद्दल असलेला कनवाळू पणा मला खूप धन्य झाल्या सारखे वाटतंय . "
लीला बाई " सायली आता एखादा बाळकृष्ण किंवा गौरी येऊ द्या म्हणजे ह्याचा बालिश पणा संपेल "
तात्त्यां चा शिशिर दादाचा आशीर्वाद घेऊन हे दोघे शहरात जायला निघाले . जाता जाता आत्या कडे जाऊन मग इकडे शहरात आले .
घरी आल्यावर दोघे थोडा वेळ रिलॅक्स झाले ..
मिहीर " सायली .. कॉफी करशील का ?"
सायली " दूध आणायला लागेल ?"
मिहीर " असेल फ्रीज मध्ये विमल ताईंना सांगितले होते घर साफ करा आणि दूध आणून ठेवा "
सायलीने चेक केले तर होते दूध .. आणि ती कॉफी करायला लागली . मिहीर आणलेले सामान आत ठेवत होता ..
दोघांनी मस्त कॉफी घेतली .
मिहीर " आज विमल ताईंना सुट्टी दिलीय .. त्या जेवण बनवायला येणार नाहीत .. आपण दोघे जेवायला बाहेर जाऊ "
सायली " का ? आता मी थोडे थोडे करू शकते .. आपण दोघे घरीच बनवू .. "
मिहीर " ओके .. चक्क हे तुझ्या तोंडून ऐकतोय .. तिकडे एवढे काम केलेस तर थकली असशील ना .. म्हणून म्हटले बाहेर जाऊ "
सायली " नाही .. थोडेच काहीतरी करू .. तुझ्या आवडीचे लोणचे आईंनी दिलय मग मी आमटी भात करते . "
मिहीर " चालेल .. बरं .. ऐक ना .. मी बाहेर जाऊन येतो .. आजचा प्लॅन लक्षात आहे .. मी थोडी तयारी करून येतो "
सायली " काय रे तू सगळ्या गोष्टी मला सांगत नको जाऊस मला ... “
मिहीर " मला ... काय .. लाज वाटते का ? लुक at यु .. ? यू आर ब्लशिंग .. "
सायली " शु... तू जा बघू .. "
मिहीर बाहेर गेला .. सायली कुकर लावून .. आमटीची तयारी करत होती .. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला . तिचे हात ओले होते ते पुसून येई पर्यंत फोन कट झाला . कोणाचा फोन आहे बघे पर्यंत दाराची बेल वाजली.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा