विभक्त भाग ५३
क्रमश: ५२
सायलीला वाटले कि मिहीर आला .. सायलीने दार उघडले तर मिताली .. अल्मोस्ट कोलॅप्स च झालेली .. रडत रडतच घरात आली
सायली " ताई .. काय ग .. रडतेस का ? काय झालेय ?"
मिताली ने सायलीला मिठी मारली आणि रडतच होती "
सायली " अग , काय झाले ? तू एकटीच आलीस ? राज आणि रिया कुठेय ?"
मिताली " तेच तर ना .. विनय बघ मला ब्लॅकमेल करतोय .. मला म्हणतोय जर मुलांना भेटायचे असेल तर इकडे सासरी ये "
सायली " व्हॉट नॉन्सेन्स "
मिताली " बघ ना .. त्याला जायचे होते त्याच्या घरी मुलांना घेऊन तर मी जाऊन दिले तर आता माझ्या मागे सासूबाई पण लागल्यात घरी चल .. घरी चल .. पण मला कोण विचारत पण नाही ? मला नाही जायचंय त्या घरी ? आणि विनय बदलला त्याला आता माझ्या पेक्षा त्याची आई जास्त प्रिय आहे .. तो म्हणतोय कि हे भाड्याचे घर सोडून देऊ आणि आपण आपल्या घरी जाऊ .. मी नाही म्हटले तर म्हणतो .. रिया तुझी फार आठवण काढतेय .. तुला जर तिची काळजी असेल तर तू इकडे येशील ? सायली .. मला माझी मुले पाहिजेत .. सांग ना मी करू ? मी बाबांना सांगू का ? काय करू ? मला काहीच सुचत नाहीये ..
सायलीने मितालीने पाणी दिले .. शांत हो .. आपण बघू काहीतरी मार्ग काढू ? तो असा वागूच कसा शकतो ? एक आईला तिच्या मुलानं पासून तोडू कसा शकतो ? हे मात्र जरा जास्तच होतंय ?"
बोल बोलता सायलीने मितालीला कॉफी केली .. बिचारी कडे बघितल्यावर लगेच कळत होते कि दुपार पासून काही जेवली पण नाहीये ते .. तिने तिच्याकडून सगळे प्रयत्न केले .. काहीच मार्ग मिळत नाही तेव्हा आई कडे जाण्यापेक्षा सायलीकडे आली होती ..
सायलीने मितालीला कॉफी बिस्कीट खायला लावले .. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा थांबत नव्हत्या .. तिला बघून सायली पण विनय चा राग येत होता .. असे कोणाला कोंडीत पकडणे ते सुद्धा खुद्द नवऱ्याने बायकोला किती चुकीचे आहे .. तिला त्याला कॉल करून झापावेसे वाटतं होते .
मिहीर साहेब तोपर्यंत बडे अरमान लेकर घरी आले . सायली आमटी फोडणीस टाकत होती तर बेल वाजल्यावर दार उघडायला मिताली पुढे गेली .
थोडा वेळ मिहीर ला काय चाललंय ? मी कुठे आलोय ? का मला सायलीच्या त मिताली दिसतेय तेच कळे ना ...
मिहीर " हाय .. व्हॉट अ सरप्राईझ ?"
मिताली काय त्याच्याशी बोलायच्या मनस्थितीत नव्हती .
सायली " अरे .. मिहीर तू आलास .. चल जेवण झालय आपण जेवून घेऊ मग बोलू .. "
मिहीर " हमम.. "
मग तिघांनी सायलीने केलेला आमटी भात खाल्ला ?
जेवण झाल्यावर सायलीने मिहीर ला सांगितले .. कि असा असा प्रॉब्लेम झालाय म्हणून ताई इकडे आलीय .
मिहीर " मग आता .. आपण शरद काकांना सांगू .. ते सांगतील काय करायचे ते ?"
मिताली " नको .. बाबांना नको .. नाहीतर मी तिकडेच गेले असते ना "
मिहीर " मी विनय ला इकडे बोलवून घेतो .. तुम्ही दोघे समोर समोर बसून बोला मग "
मिताली " नको .. मी तुला सांगितले म्हणून तो अजून माझ्यावर भडकेल ?"
मिहीर " मग ..चल आपण जाऊ तिकडे आणि मुलांना घेऊन येऊ ?"
मिताली " ठीक आहे .. हे ठीक आहे .. मला माझी मुले माझ्या जवळ पाहिजेत .. बाकी मला काही नको .. एकदा मुलं माझ्याकडे आली ना कि मी बघतेच त्याला मग "
मिहीर " हेच तर ना .. हे त्याला माहितेय म्हणूनच त्याने तुला असे कोंडीत पकडले आहे . आणि तु मुलं तुझ्या कडे आलीस कि तू पण हेच करणार आहेस ना .. मग आता त्याला शिव्या कशाला घालता मग दोघी जणी तुम्ही "
सायली " मिहीर .. काय पण काय बोलतोस तू ?"
मिहीर " अरे .. मी खरं तेच बोलतोय .. तुम्ही लोक भांडणे मिटवण्याचा दृष्टीने बोलतच नाहीत आहात .. तुम्ही फक्त वर वर बघत आणि आतमध्ये कचरा तसाच आहे . "
मिताली " मिहीर .. प्लिज तू तरी असे बोलू नकोस .. मी निघते घरी .. उगाच माझ्यामुळे कोणाला त्रास नको .. "
सायली " थांब ग ताई .. आता कुठे निघालीस .. त्याचे म्हणणे काय ते तरी ऐकून घे .. तो काय तुला दुखवायला बोलत नाहीये .. त्याचे म्हणणे काय आहे ते तरी ऐकून घे . आणि आपण जाऊ आपल्या मुलांना आणायला आपल्याला कोणचं अडवू शकत नाही "
मिहीर " नाही .. सायली तू चुकतेस .. जेवढी मुलं मितालीची आहेत तेवढीच ती विनय ची पण आहेत च ना .. आणि मी तर म्हणतो बरं आहे ना .. नाहीतरी या दोघांना सेपरेट होयचे आहे तर मुलं बाबानं कडे आहेत ते बरेच आहे ना .. अजून हिला जॉब नाहीये हि कशी मुलांचा सांभाळ करणार आहे . त्यापेक्षा तिला पाहिजे तेव्हा मुलांना भेटायची परवानगी घ्यायची .. बाकी सगळे तो करेल .. शेवटी त्याचे ते कर्तव्य आहे .. "
सायली " मिहीर .. तू उगाच त्याच्या बाजूने बोलू नकोस .. "
मिहीर " मी त्याच्या बाजूने नाही मी मुलांच्या बाजूने बोलतोय .. मुलांचे संगोपन करण्यासाठी विनय नक्कीच त्याच्या जीवाचे रान करेल याची खात्री तर मितालीला पण असेलच .. हो ना मिताली "
मिताली " मुलांवर त्याच्या खूप जीव आहे "
मिहीर " मग .. मी म्हटले ना .. मला माहितेय . मिताली , तुला आता सासरी जायला काय प्रॉब्लेम आहे ?"
मिताली " अरे .. जेव्हा आम्हाला त्यांची गरज होती तेव्हा आम्हाला घरातून बाहेर काढली आणि आता त्या एकट्या आहेत तर त्यांना आता सून पाहिजे , नातवंडे पाहिजेत , मुलगा पाहिजे .. स्वार्थी कुठल्या "
मिहीर " तेव्हा तुम्ही लग्न त्यांना विचारून केलेत का ?"नाही ना .. त्यांनी पण त्यांच्या मुलाकडून काहीतरी अपेक्षा ठेवल्याचं असतील .. त्यांना न सांगता तुम्ही दोघे त्यांच्या समोर लग्न करून उभे राहिलात म्हणजे त्यांच्या भावनांचा तुम्ही किती विचार केला होतात . हा जर तुम्ही सांगितले आणि त्यांनी ऐकले नसले तर तुम्ही पळून असतात असतात तर गोष्ट वेगळी होती . "
सायली " मिहीर तुझे मुद्दे कदाचित बरोबर असतील पण ताईचे मुद्दे पण काही चुकीचे नाहीत .. गरजे नुसार बदलणे हा त्यांचा स्वार्थच आहे . "
मिहीर " हे बघ .. माझे काय म्हणणे आहे .. थोडं तुम्ही चुकलात.. थोडे ते चुकले ? तेव्हा जर आनंदात एकत्र राहायचे असेल तर एकमेकांना माफ करणे च योग्य आहे.. त्याच पेक्षा विनय ची कृती चुकीची असली तरी त्याच्या कृती मागे त्याचा हेतू काय आहे हे बघितलात का ?"
मिताली " मला त्रास द्यायचा दुसरा काय ?"
मिहीर "तुला खरच असे वाटते का ? तू तुझ्या अंतर्मनांला विचार एकदा ?"
मिताली " हो म्हणजे दुसरे काही कारणच नसणार ?"
मिहीर " अग मूर्ख मुली .. सॉरी आय मिन त्याला तू पाहिजेस त्याच्या बरोबर म्हणून तो तुझा वीक पॉईंट पकडून बसलाय .म्हणजे तो तुला किती ओळखतो बघ .. त्याला माहितेय आणि हा लास्ट चान्स तो तुला आणि तुमच्या नात्याला देण्याचा प्रयत्न करतोय .. त्याला तू पण हवी आहे नि आई पण हवी आहे .. जशी तुला तुझी मुलं हवी आहेत तशी त्याच्या आईला पण म्हातार पणात मुलगा, नातवंडे हवीच असणार ना .. सांग त्याचे कुठे चुकतंय ? "
मिताली " हो पण मी का कॉम्प्रोमाईझ करायचे .. तो म्हणतोय हे इथले घर जे आम्ही रेंट वर राहतो ते सोडून दयायचे आणि त्याच्या घरी कायमचे जायचे ? म्हणजे माझा भरलेला संसार आता मोडायचा आणि आम्ही सगळे इथून तिकडे जायचे .. त्यापेक्षा त्या आमच्याकडे का रहायला येऊ शकत नाहीत ?
मिहीर " हा मुद्दा तुम्ही डिस्कस करून सोडवा.. यामध्ये काहीतरी पॉईंट आहे असे मी म्हणेन .. त्या मागे त्याचे काय म्हणणे आहे हे तू त्याला शांतपणे विचार "
मिहीर " चला मग मी गाडी काढतो आपण त्याच्या घरी जाऊया .. तुला मुलं पण भेटतील.
सायली आणि मिताली ला मिहीर जे करतोय ते बरोबर करतोय कि नाही काहीच कळेना .. मिहीर ला सुद्धा सध्या हेच डोक्यात होते कि मितालीला तिच्या मुलांना भेटवायचं. तिचा जो जीव जळतोय ना तो त्यालाही पाहवत नव्हता..
जेवण झाल्यावर तिघे लगेचच विनय च्या घरी गेले .
विनय च्या दारा बाहेरूनच रिया चा रडण्याचा आवाज येत होता .. " ममा .. मम्मा .. आणि विनय तिला शांत करण्यासाठी त्याच्या जीवाची पराकाष्टा करत होता .. "
मिताली ने दाराची बेल वाजवली .. सासु बाईने दार उघडले .. त्यानं न बघता एक प्रकारे बाजूला करून ती थेट घरात घुसली आणि विनय च्या हातातून रिया ला घेतली .. राज रिया दोघे मितालीला चिकटले .. मिताली रडत रडत दोघं मुलांना कवटाळत होती .. त्यांचे दोघांचे असंख्य पापे घेत होती त्यांना छातीशी धरत होती. पूर्ण दिवाळी चे दहा दिवस तीची लेकरे तिच्या पासून दूर होती .. एक स्त्री म्हणून स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी तिने मुलांना सासरी पाठवली आणि याचा फायदा म्हणा .. किंवा संधी घेऊन विनय तिला आता मुलांना भेटून देत नव्हता .. त्याचा हेतू चांगला होता पण कृती अतिशय हीन दर्जाची होती ..
समोर दिसत असलेला प्रकार इतका हृदय द्रावक होता कि सायली ची सगळी ताकद च गळून पडली .. तिने मिहीर चा हात इतका घट्ट पकडला होता कि तिच्या नखांमुळे आता त्याच्या हातातून रक्तच येईल .. डोळ्यातून राग, दया , करुणा ,, आपल्या बहिणीची लाचारी .. मुलांना तिच्या पासून दूर केल्याचा आक्रोश सगळ्याच भावनांचा उद्रेक होता तो .. एक मिनिट मिहीर चे डोळे पण भरून आले .. त्या दोघांना मितालीची अवस्था बघवतच नव्हती .
मितालीला ना तिच्या कपड्याचे भान होते .. ना स्वतःच्या अस्तित्वाचे भान हते .. आपला भविष्यकाळ किती काळाच्या गर्तेत गेलाय याची जाणीव तिला त्या क्षणी बोचत होती . सायली ला तिच्या बहिणीची जी सारखी काळजी वाटायची त्याची प्रखरता मिहीरला आज जाणवली होती .
मिताली बिचारी हसून .. खेळून सर्वां बरोबर आपलं दुःख कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात साठवून होती .. आज त्या दुःखाला विनय ने उकरले होते .. तिच्या जखमेवर मीठ चोळून चोळून तिला हतबल केले होते .. तिच्यातल्या स्त्री ला तर तो समजूच शकला नाही पण तिच्यातल्या आई ला पण नाही समजू शकला . तिच्या अंतकरणा पर्यंत तो पाहचूच शकला नव्हता .
मिताली उठली विनय कडे गेली .. त्याचा दोन्ही हात हातात घेतले आणि त्याच्या दोन्ही हातांना तिच्या गळ्यावर ठेवले आणि त्याला म्हणाली
मिताली " हे दिवस दाखवण्या पेक्षा मला मारून टाक .. मी स्वतः नाही मरू शकत .. माझ्यातली आई मला हे करायला परवानगी देत नाही .. तू मला मारून टाक .. तुझी मी गुन्हेगार आहे .. मला आता जगायचंच नाहीये .. प्लिज मला मुक्त कर .. मी हरले आता .. अरे कंटाळा आलाय मला या लाचार जीवनाचा .. आपला नवरा आपल्यावर प्रेम करतो का नाही करत या साध्या प्रश्नाचे उत्तर नाहीये माझ्याकडे ..ऐन सणाच्या दिवशी मी बेवारश्या सारखी इकडे तिकडे भटकत होते .. माझ्या लेकरांना .. माझ्या मुलांना सोडून मी दुसऱ्याच्या आनंदात मिसळत होते .. मला एक साधा फोन पण नाही केलास तू विनय .. असे कोणतं पापं केले मी तुझे .. मी कोणाकडे बघून जगू ? मी कोणत्या दिशे कडे बघून जगू ?माझा जगण्याचा एकमेव आधार माझी मुलं तू माझ्यापासून घेऊन निघालास .. प्लिज मला मारून टाक .. मी लिहुन देते माझ्या मृत्यूला मी जवाबदार आहे ..अर्धी तर मी मेलेच आहे .. आता मला पूर्ण मारून टाक..
सायली तिला धरायला गेली " ताई काय बोलतेस तू ? .. अग आम्ही आहोत तुझ्यासाठी .. तू नको काळजी करुस ?आपण शांतपणे बसून मार्ग काढू ? प्लिज तू शांत हो ..."
मिताली भीतीला टेकून शांत बसली .. मनातल साचलेल दुःख .. शब्द .. व्रण एका मागून एक बाहेर पडले .. आणि जखमेची तीव्रता कमी झाली .
विनय आतून पाणी घेऊन आला .. ती त्याच्याकडून पाणी प्यायला तयारच नव्हती .. पण त्याने तिला जबरदस्तीने पाणी पाजले .
विनय ची काय वेगळी अस्वस्था नव्हती .. त्याला पण काय करावे सुचत नव्हते .. त्याने मिताली च्या पुढे लिटरली हात जोडले .. " माझे चुकले .. मुलांवरून तुला कोंडीत पकडण्याची माझी हि सर्वात मोठी चूक होती मला मान्य आहे .. पण तुला परत मिळवण्यासाठी .. खरच सांगतो .. तुला परत मिळवण्यासाठी च हे मी केलय .. असे नाही कि तुला त्रास व्हावा .. तुला हरवण्यासाठी नाही .. मी रिया शपथ घेऊन सांगतो .. जेवढे राज आणि रिया मला प्रिय आहेत त्याही पेक्षा मला तू जास्त महत्वाची आहे .. तुला माझा इतका राग आला होता कि तुला मी नजरेस दिसतच नव्हतो .. माझी प्रत्येक गोष्ट चुकीची वाटायची .. म्हटले आता नाहीतर मी चुकीचाच आहे तर हि पण एक चूक करावी ज्याने तू मला भेटशील .. माझा बाकी काहीच हेतू नव्हता .. माझ्या डोळ्यासमोर माझा संसार उध्वस्थ होत होता .. मला काय करावे .. कसे आणि कुठे ठिगळ लावू तेच कळत नव्हते.. माझे चुकले .. मला माफ कर .. प्लिज मिताली मला माफ कर .. तुला नाही ना राहायचं आई बरोबर चल आपण आताच्या आता जाऊ आपल्या फ्लॅट वर .. तिचं तीच ती बघून घेईल .. मला माझ्या मुलांना तुझी गरज आहे .. चल आपण निघू ..
मिताली ने एक हलक्या हाताने त्याच्या गालावर चापट मारली
मिताली " हीच माझी परीक्षा केलीस का ? तू आधी माझ्या बाबतीत चुकलास आणि आता आई च्या बाबतीत चूक करतोयस .. या म्हातारपणात त्यांना तू एकटं सोडणार आहेस का ? माझी मुलं आठ दिवस माझ्या जवळ नव्हती तर मी जीव द्यायला निघाले तू तुझ्या आईला ५ वर्षांनी भेटायला आलास .. आणि आलास तर आता पुन्हा सोडायला निघालास .. "
विनय आता ओक्स बोक्षी रडू लागला .. " म मी काय करू ? मी तरी ऐकटा कुठे ठिगळं लावू .. तूच सांग .. "
मिताली " आपण आपल्या फ्लॅट वरच रहायचं आणि तिकडे तू आईनं घेऊन चल"
विनय " अग पण हे आपले स्वतःचे घर आहे "
मिताली " नाही .. हे तुझ्या बाबांचे घर आहे .. आपण जेव्हा आपल्या पैशांनी आपले घर घेऊ तेव्हाच ते आपले घर असेल .. ज्या दिवशी तुला आणि मला तुझ्या आई बाबांनी घरातून हाकललं त्या दिवशी माझा ह्या वास्तूशी संबंध तुटलाय .. .. हे घर भाड्याने द्या आणि जे पैसे यातील ये आईनं वापरू दे .. त्याच्या त्यांचा उपयोग होईल .. "
विनय " हो ठीक आहे .. चालेल .. तसे करू .. आणि विनय ने तिला मिठीत घेतले .. आज कितीतरी वषांनी तिला विनय च्या मिठीत सेफ वाटत होतं .. आपलेपण वाटतं होतं .. माया वाटतं होती ..
दोघे एकमेकांच्या मिठीत मन भरून रडले ..
मिहीर ने सायलीला खुणावले .. चल आपलं आता जाऊ ..
सायलीने ने पण मितालीच्या पाठीवर मायने हात फिरवला .. तिला डोळ्यातूनच सांगितले कि काहीही काळजी करू नकोस आम्ही खंबीर पणे तुझ्या पाठीशी आहोत .. राज आणि रिया ला बाय करून सायली आणि मिहीर तिकडून घरी निघाले .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा